Saturday, 17 June 2017

अनलिमिटेड फन

हाय फ्रेंड्स......
       भारत-पाक मॅच बघितली ना! बघितलीच असणार हाय व्होल्टेज मुकाबला आणि तोही रविवारी म्हणजे प्रश्नच नाही. पण बेस्ट पार्ट की आपण मॅच जिंकली. रोहित दादा आणि गब्बर शिखर च्या पायाभरणीवर विराट भाऊ, इंग्लंडचे जावई युवराज पाजी आणि शेवटी हार्दिक ने कळस चढवला. त्यानंतर बॉलरनी आपला करिश्मा  दाखवत आपल्या सेंटिमेन्ट चा विषय असलेली मॅच जिंकली त्याबद्दल विराट भाऊ आणि पलटनचे मंडळाच्या वतीने जाहीर हार्दिक आभार! पण ही मॅच जिंकली तरी श्रीलंकेसमोर मात्र आपण नांगी टाकली. रोहित आणि शिखराच्या जबरदस्त सुरुवातीनंतर धोनी स्टाईल चा तडखा लावून आपला स्कोर 300 च्या गेला. तरीही गोलंदाज मॅच वाचवू शकले नाहीत. असो त्यामुळे "थोडी ख़ुशी थोडा गम" वाल वातावरण आहे पण खेळात हार-जीत आलीच. "और हारकर जितनेवाले को बाजीगर कहते है।" आणि आपली टीम नक्कीच बाजीगर आहे.
              अरे हो! या क्रिकेटच्या गरमागरमीत पिक्चरचा विषय राहूनच गेला. आपला 'विक्या' सैराट मधल्या परशाचा म्हणजे आकाश ठोसर चा फॅन. म्हणून विक्याच्या आग्रहाखातर F. U अर्थात 'फ्रेंडशिप अनलिमिटेड' हा सिनेमा पहिला. कॉलेज, कॉलेज लाईफ, प्रेम, ब्रेकअप, भांडणे, मित्रांच्या गप्पा हा चित्रपटाचा गाभा. गाणी म्हणाल तर "हम आपके है कौन" ला मागे टाकत या F. U मध्ये तब्बल 14 गाणी आहेत पण बाहेर आल्यावर एकही लक्षात राहिले नाही. बाकी वैदेही परशुरामी तेवढीच सगळ्या सिनेमात छान दिसते. पिक्चर म्हणाल तर जुनाच मसाला नवीन तडक्यासह पण तोही नीट बसलेला नाही म्हणजे खूप प्रयत्न करूनही तितका यशस्वी नाही वाटत हा आता तुम्ही परशाचे चाहते असाल तर या एकदा बघून.
            यापेक्षा मला आवडलेला दुसरा सिनेमा तो ही मराठी " मुरांबा". तरुणाईच्या कलांन, प्रौढांच्या दिलांन विचारपूर्वक मुरवलेला मुरांबा.  मुरांब्याच्या संकल्पनेप्रमाणे या चित्रपटाची गुंफण केली आहे. आपली नाती म्हणजे कैरी आणि त्यातले पदार्थ म्हणजे आपल्या जीवनातले चढउतार. रिलेशनशिप , करिअर, संधी, आणि पुणे यांच्या भोवती फिरणारा हा सिनेमा आपल्यात मुरत जातो. उच्चभ्रू कुटुंबातील रिलेशनशिप त्यातून संशय, फोन तपासने आणि मग ब्रेकअप. मग हे सगळे पूर्वपदावर आणण्यासाठी आई- वडिलांचा प्रयत्न, या सर्वांची सुरेख गुंफण.पार्श्वसंगीत सुरेख आहे नक्की बघण्यासारखा मुरांबा.
           या आठवड्यात सुशांतसिंग रजपूत (धोनीवाला) चा "राबता" ही रिलीज झाला आहे. एस.एस. राजमौली च्या बाहुबली नंतर VFX च्या वापराचे मोठ्या प्रमाणावर हिंदीत प्रथमच धाडस करत दोन वेगळ्या संस्कृतीची कथा सांगणारा राबता सध्या चर्चेत आहे. ट्रेलर, स्टोरीची चर्चा आणि गाणी  यामुळे याची उत्सुकता आहेच. हिंदी बरोबर हॉलिवूडच्या पडद्यावर 'द ममी' च्या नव्या अवतारात आणि नव्या भागात अभिनेता टॉम क्रूझ ला पाहणे या आठ्वड्यातली पर्वणीच आहे.
                सध्या बाहुबली आणि सर्व हिंदी मूवी चॅनलमुळे आपण सगळे तामिळ सिनेमाचे फॅन झालो आहोत. त्यातच आर्या फेम टॉलीवूड सुपर स्टार अल्लू अर्जुन च्या दुव्वदा जगन्नधाम (DJ) चा ट्रेलर इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. बाहुबली 2 च्यानंतर या DJ च्या ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहे. ऍक्शन, डान्स, रोमान्स, आणि अल्लू एका ब्राह्मण आचारी आणि स्पेशल एजंटची दुहेरी भूमिका आपल्याला पहायला मिळणार हे ट्रेलर दाखवतो. तुम्ही हि एकदा Youtube वर चेक करा. या सगळ्यामुळे या आठवड्यात 'फन मात्र अनलिमिटेड' आहे.

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...