Saturday, 3 June 2017

उत्सुकता हाय व्होल्टेज मुकाबल्याची

आपल्या नेहमीच्या मैदानावर आमचा क्रिकेटचा डाव....आता आपल्याकडील ग्राउंड वर सामना म्हणजे आपल्या बरोबर 8-10 टीम एकावेळेेला खेळायला. इतक्यात एक भारी वाक्य ऐकू आले. " हे बघ भावा, चॅम्पियन ट्रॉफी नाही जिंकली तरी चालेल पण पाकिस्तान बरोबरची मॅच जिंकायलाच पाहिजे." हि वाक्य होती चड्डीतल्या पोरांची.ही चिंटू गँग भारत- पाकिस्तान मॅचची चर्चा करत होती. आणि चर्चा तर होणारच ना भारत-पाकिस्तान सामना म्हणजे 'सोने पे सुहागा'।
             आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे मिनी वर्ल्ड कप. जागतिक क्रमवारीतल्या पहिल्या आठ संघाची स्पर्धा.आठ संघाची दोन गटात विभागणी , दोन्ही गटातले पहिले दोन-दोन संघात सेमी फायनल आणि मग फायनल. अगदी छोटा आणि सोपा फॉरमॅट खच्चून अठरा दिवसात स्पर्धा संपते. त्यामुळे ही लोकप्रिय आहे. या वर्षी हि स्पर्धा गेल्यावेळीच्या उपविजेच्या इंग्लंड च्या 'रन'भूमीत संपन्न होत आहेत.
           चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 1 जून ला पण खरा मुकाबला 4 जून ला च भारत-पाकिस्तान दरम्यान. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या High Voltage मुकाबल्याला अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे या सामन्याची व निकालाची उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यामध्ये शिगेला पोहचली आहे. सामना जरी आज होणार असला तरी याची चर्चा आणि उत्सुकता वेळापत्रक जाहीर झाल्यापासून आहे. या स्पर्धेची जाहिरात करतानाही स्पोर्ट्स चॅनल नी भारत-पाक सामन्यावरच भर दिला आहे. "मौका-मौका" च्या व्हिडीओ नी तर यू-ट्यूब आणि इतर सोशल मीडियावर अक्षरशः थैमान घातले आहे. गुगलच्या डुडल वर ही क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. क्रिएटिव्ह आणि मजेशीरपणे डुडल तयार केले आहे. जोक्स च तर विचारू नका. लोक इतकी क्रिएटिव्हिटी आणतात कोठून हा कौतुकाचा विषय आहे. कधी चुकून सोशल मीडिया वर जर युद्ध झाले तर मला नाही वाटत आपल्या देशातल्या पोरांच्यापुढे कोणी टिकेल.
             आजच्या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांशी खेळतील त्यावेळी खेळाडू इतकाच तणाव दोन्ही देशातल्या प्रेक्षकाच्यावरही असेल. तस ही 2015 च्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाकिस्तानला हरवल्यानंतर पहिल्यांदाच वन-डे त हे संघ आमने-सामने येत आहेत.
       गतविजेता भारत या स्पर्धेचा "डार्क हॉर्स" आहेच. पाकिस्तानचा संघ पूर्वीसारखा नाही. शोएब मलिक आणि उमर अकमल सोडले तर बाकीच्यांची नावे पण अनेकांना माहित नाहीत. पण इथं नावाचं करायचे काय भारत-पाक मॅच म्हंटले की विषय संपला! तो राष्ट्रीय देशभक्तीचा मुद्दा होतो आणि होणारच.
       तशी वादाची ठिणगी पाकिस्तान कडून आधिच पडली आहे. त्याचा तो बॉलर जुनेद खान ने मीडिया समोर "विराट ला काय मी सहज गुंडाळेन" म्हणून 'बोलंदाजी' करून माईंड गेम खेळला आहे. भारताने शाब्दिक चकमक केली नसली तरी पहिल्या दोन सराव सामन्यात न्यूझीलंड आणि बांग्लादेश चे हाल करून सोडले आहे. यातून पाकिस्तान ने धडा घेतला असेल नाहीतर घोडा मैदान लांब नाही. बघू कोण बाजी मारते ते. आज पुन्हा टीव्ही फुटतील आणि मौका-मौका कधीच येणार नाही.
       सरते शेवटी निकाल काहीही लागला तरी आज रात्री सामन्यानंतर आफ्रिदी आणि फॅमिलीची आठवण  मात्र नेटकऱ्याकडून 100 टक्के काढली  जाईल.
       पाऊस घेऊन मान्सून अजून पोहचला नसला तरी क्रिकेटचा मान्सून आला रे....

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...