📝 माय मराठी, माझी मराठी
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
"जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
या ओळींचा गोडवा जितका तितकाच आपल्या मातृभाषेचा गोडवा..... ज्ञानोबांच्या शब्दात
"माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।"
अशी अमृताशी पैजा घेणारा गोडवा असणारी आपली मातृभाषा मराठी. आज २७ फेब्रुवारी ज्ञानपीठ विजेते वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन अर्थात मराठी राजभाषा दिवस.....
इतर भाषा अवगत असूनही बोलताना जाणीवपूर्वक मराठीचा वापर करणाऱ्यांसाठी मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
आपल्या नुकत्याच बोलायला शिकलेले व शिकणाऱ्या पाल्याला इंग्रजी शब्दाची ओळख करून देणाऱ्यांनाही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.......
एका साध्या वाक्यात विनाकारण एक-दोन इतर भाषेतील शब्द वापरून आपला वरचा दर्जा दाखवणार्यांना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा......
मराठी भाषा टिकली पाहिजे असे मनापासून वाटणार्या पण आपल्या मुलांना मात्र इंग्रजी माध्यमात शिकवणाऱ्याना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा......
मोबाईल मध्ये मराठी भाषा असतानाही मराठी संदेश इंग्रजीमध्ये लिहून पाठवणाऱ्यांना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
आपला मोबाईल नंबर, वस्तूंची किंमत सांगताना इंग्रजीत अंक आठवून सांगणाऱ्याना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
आपली सही इंग्रजीत करून मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या मराठी बांधवाना ही मराठी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.....
आपला इतर भाषांना विरोध नाही. प्रत्येक भाषेची वेगळी संस्कृती, समृद्धता आहे. त्याचा आदर आपण केलाच पाहिजे. पण सध्या मराठी सोडून इतर भाषा बोलण्यावर मराठी माणसाचा जोर आहे. यामुळे आपणच आपली सुंदर भाषा दुर्लक्षित करतोय. मराठीत पण सुंदर बोली भाषा आहेत मालवणी, कोकणी, अहिराणी, कोल्हापुरी, पुणेरी, विदर्भ, यासारख्या महाराष्ट्राच्या विविध प्रांतात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेची आपली स्वतंत्र गोडी व नावीन्य आहे. ते आपण जपले पाहिजे. ग्रामीण भाषा बोलले म्हणून कोणी गावंढळ होत नाही तो आपण केलेला गोड गैरसमज आहे.
आपण बोलताना शक्य तेवढ्या मराठी शब्दचावापर करायला हवा हा आता पर्यायच नसेल तर इतर भाषेतील शब्द वापरणे क्रमप्राप्त ठरते.
असो..... मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या व मराठीचा अभिमान असणाऱ्या आपल्या सर्वांना आजच्या राजभाषा मराठी दिनाच्या मराठीतून खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदीप कोळी
973041015
sandikoli35@gmail. com