🌈 संयम = विराट कोहली
"सब्र कर बंदे, मुसिबत के दिन भी गुजर जायेंगे।
आज जो तुझ पर हसते है, कल वो तुझे देखते रह जायेंगे।"
What a knock, जब भी पाकिस्तान भीड है, विराट कोहली अकेला ही लढा है, I am your Dad, बाप बाप होता है, King is Always King, अपना किंग अकेला लडा है, असे अनेक स्टेटस आज सर्वांच्या व्हाट्सअप स्टेटस आणि इंस्टा स्टोरी ला आहेत.
पण, अगदी काहीच दिवसांपूर्वी हाच विराट कोहली संपला. तो कसा t20 साठी पात्र नाही. त्याची जागा कशी टीम मध्ये होऊ शकत नाही. तो कसा t20 साठी योग्य राहिला नाही. त्याच्यात क्रिकेट शिल्लक किती? अशा अनेक बातम्या,लेख व कमेंट गेली काही काळ विराटच्या बाबतीत सतत चर्चेत राहिल्या. अगदी काही माजी क्रिकेटपटूनी विराटला मिळणाऱ्या अतिरिक्त संधी बाबत बोट दाखवले होते.
पण, या ठिकाणी हा पण महत्त्वाचा भाग आहे. कारण या सर्व टीका, बातम्या, अफवा याबाबत विराट स्थिर राहिला. त्याने या सर्वामुळे खचून न जाता आपला खेळ उंचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. आपल्या होणाऱ्या चुका टाळल्या व आज त्याने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा आपणच किंग 👑 आहोत हे सिद्ध केले.
या सर्व Bad Patch मध्ये विराटने दाखवलेला सर्वात मोठा गुण म्हणजे संयम होय. विराटकडे प्रचंड क्षमता आहे याबाबत कोणाला शंका नाही. त्याचे खेळाचे ज्ञान व फटके मारण्याची कौशल्य याबाबत त्याचे प्रतिस्पर्धी सुद्धा फॅन आहेत. विराटला गरज होती ती संयमाची व 'आपना टाईम आयेगा' याची वाट पाहण्याची आणि विराटने ते लिलया करून दाखवले.
विराटकडे अजून क्रिकेट किती शिल्लक आहे? या प्रश्नाला त्याने पैकीच्या पैकी मार्क पाडून 'अभी तो मंजिले - ए - सफर मे बहुत कुछ बाकी है, हे सिद्ध केले. गेल्या काही डावापासून तो हे दाखवून देत होता, पण आजच्या भारत- पाक मॅचने त्याने स्वतःची जागतिक क्रिकेट मधील दहशत पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
कधी हार मानू नका. परवाचा दिवस कठीण होता. कालचा आणखीन वाईट होता. पण आजचा दिवस सोनेरी क्षणाने आपली वाट बघत होता, हे विराटच्या संयमाने शिकवले. आपल्याला ही जगण्यातला संयम किती महत्वाचा आहे हे विराट ने जागून दाखवले आहे.
You Are the Boss Man
Virat ❤️
🖋️ संदिप कोळी