भावानो आणि बहिनिंनो,
छान वाटतंय न टायटल ! 'आदर्श ' सारखे शब्द आजकाल भारीच वाटतात. पण दोस्तानो आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श उभे करण्याची गरज आहे .
काही वर्षापूर्वी शाळेत असणार्या मुलांना विचारले , कि मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे? तर उत्तरे पण छान मिळायची. थोर व्यक्तीची नवे , त्याचे विचार त्यांच्या तोंडी असायचे. यशवंतराव चव्हान यानी तर मला यशवंतराव चव्हान व्हायचे म्हणून विद्यार्थी दशेतच आपला आदर्श विचार व संकल्प मांडला होता; पण सध्या ..........
दोस्तोहो, आपल्या तरुण पिढीसमोर सध्या आदर्शच नाहीत. आजच्या मुलांना नाही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दुरदुर्ष्टी असावी. विवेकानान्दासारखे विचार असावेत. टिळकांसारखा स्वाभिमान असावा. भगतसिगसारखी देशभक्ती व शौर्य असावे.
आजच्या तरुणाची अवस्था म्हणजे 'अपने को तो सिर्फ पाणी निकालना है' अशी झाली आहे. त्याच्या दुर्ष्टीने हे आदर्श सध्या काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आताच्या तरुणांना पैसे, मोबाईल, जॉब, बंगला हे सगळे क्विक हव असते. आपल्या आधीच्या पिढीत संस्कार, विचार ,सुसंस्कृतपणा हि व्यक्तीची शिदोरी. या शिदोरीच्या आधारावरच ते जगले. पण आज मात्र हि संकल्पना बदलली आहे. पैसा हही आताच्या पिढीची महत्वाची शिदोरी झाली आहे. त्याच्यासाठी चांगले विचार, तत्वे, संस्कार, खड्ड्यात गेले तरी चालतील. या सर्व परिस्थितीचे खापर फक्त तरुणांच्या डोक्यावर फोडणे योग्य नाही. त्याला सभोताल्ची परिस्थिती, समाज हाही तितकाच कारणीभूत आहे. समाजाने पैसा, प्रतीष्टेला इतके महत्व दिले आहे कि आजच तरुण गोंधळला आहे. प्रसारमाध्यमे, समाज, सभोवतालची परिस्थिती, यामुळे तरुणाला हि हेच खरे वाटायला लागले आहे. म्हणूनच कि काय डॉक्टर दाभोलकर, कॉम्रेड पानसरे सारख्या चांगल्या विचारांच्या व्यक्तीची हत्या खोट्या प्रतीष्टेसाठी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात होते.
त्यामुळेच तरुणापुढे चांगल्या विचारांचे व कृतीचे आदर्श मागे पडत आहेत. शाळेत शिकवलेली 'आदर्श' ची व्याख्याच बदलत आहे. म्हणूनच एकंदर तरुणांची आजची परिस्थिती बघता वाटते कि ' आदर्श तरुण नेमाने आहे'................

No comments:
Post a Comment