Monday, 19 September 2016

फ्रेंडशिप डे Friendship Day

फ्रेंडशिप डे....


           " रफ्तार कुछ जिंदगी की यू बनाये रखी हैहमने..कि

दुश्मन भले आगे निकल जाए पर दोस्त कोई पिछे ना छुटेगा"


                      ' मैत्री' दोनच अक्षरे..... पण उजळणी करायला घेतली तर शब्दाच्या मर्यादा स्पष्ट जाणवतील असं नातं.... पण नातही नाही म्हणता येणार कारण नात्यासारख नियम आणि अटी लागु असे Tag नसतात या मैत्रीला.... त्यामुळे मैत्री ही मैत्रीच No Sorry No Thank you म्हणनारी पण प्रत्यक्षात त्याच्या शिवाय एक दिवस ही न घालवणारी. 
                    आपल्या जन्माबरोबर अनेक गोष्टी आपल्याला प्राप्त होतात. नातीही त्यातलीच एक बाब. पण ती आपण नाही निवडु शकत मात्र मैत्री ही मात्र आपल्याला मिळालेली देणगी  म्हणावी लागेल कारण त्यातला प्रत्येक Choice आपला असतो. आपला मित्र/ मैत्रीण कोण असावे हे मात्र आपणच ठरवतो. 
               सुदामा ने कृष्ण से पुछा दोस्तीका असली मतलब क्या है ? कृष्ण ने हंसकर कहा जहाँ मतलबहोता है, वहाँ दोस्ती कहाँ होती है !
               मैत्रीला नात्याच बंधन नसते ना वयाचे बंधन नसते. मैत्री कोणाची, कोणाशी व कधी व्हावी याचे जगात काही नियम वा बंधने नाहीत. अटी आणि नियमांच्या पायावर मैत्रीची इमारत कधी उभी राहत नाही हे नातं अलगद उमलनारे व जीवनाचा अविभाज्य भाग बनणार.  
            सॉक्रेटिसची गोष्ट आपण नक्की वाचली असेल ' ट्रिपल फ़िल्टर ची'
                        सॉक्रेटिसकड़े एक व्यक्ति आला व त्यांना सांगू लागला. तुम्हाला माहित आहे काय तुमच्या जिगरी दोस्ताबद्दल आज मी काय ऐकलय ते........ सॉक्रेटिस म्हणाले एक मिनिट थांब तू मला जे काही सांगणार आहेस त्या पूर्वी मी एक टेस्ट घेऊ इच्छितो. तू मला माझ्या मित्रा्बद्दल सांगत आहेस तेहि मला माहित नसलेले कदाचित् तुझा हेतु चांगला असेल पण मला त्या गोष्टि पडताळून बघू दे म्हणजे योग्य गोष्ट माझ्या हाती लागेल आणि ही टेस्ट आहे ट्रिपल फ़िल्टर टेस्ट....... पहिल्या टेस्ट च नाव आहे सत्य..... तू जे मला सांगणार आहेस ते 100% सत्य आहे त्याची तुला खात्री आहे काय? ..... गृहस्थ म्हणाला नाही... ख़र तर ते फ़क्त माझ्या कानावर आले आहे......... सॉक्रेटिस म्हणाला ठीक आहे दूसरी टेस्ट आहे चांगुलपणा.... माझ्या मित्रबद्दल जी गोष्ट तुला मला सांगायची आहे ती चांगली आहे काय? गृहस्थ म्हणाला नाही मी तर...... यावर सॉक्रेटिस म्हणाला तू मला माहिती सांगावीस की नाही यासाठी आणखी एक टेस्ट आहे तिसरी.... तिच नाव आहे उपयोगिता....  माझ्या मित्राबद्दल सांगणाऱ्या गोष्टीचा मला काही फायदा आहे का? ....... नाही 100% नाही तो गृहस्थ उत्तरला.....
                     यावर सॉक्रेटिसने दिलेले उत्तर खूप सुंदर आहे. तो म्हणाला माझ्या मित्राबद्दल जे सांगणार आहेस त्याच्या सत्यतेबद्दल तुला खात्री नाहीती गोष्ट चांगली नाही व तिचा मला काही उपयोग नाही तर ते मला कशासाठी सांगतोस.....
          मैत्री अशी असते ' दुनिया से निराली दुनिया से अलग' व्याख्येत न बसनारी पण प्रत्येकाला आपलिशी करणारी.....


   ' Friendship doesn't happen with special people.
People become special after becoming friends'


                         मग मैत्री काय असते कट्टयावरच्या गप्पा मैत्री असते..... कॉलेज मधे चहाच्या टपरीवर कटिंग साठी पैसे देण्यासाठी लावलेले नंबर मैत्री असते...... आठ बिस्किट 5 जणात भांडून वाटून घेणे मैत्री असते..... कॉलेज च्या बस स्टॉप वर बसून तासभर गप्पा मारणे मैत्री असते..... मिसकॉल देणे व घेणे मैत्री असते...... कॉलेज मधे ठरलेल्या जागी बसने मैत्री असते...... पुढच्या बाकावर बसलेल्या मित्राने केलेला जोक मागे न सांगता जोरात हसने मैत्री असते..... पेपरला जाताना भावा खरच अभ्यास झाला नाही असे म्हणणारा मित्र पेपर झाल्यावर ज्या वेळी म्हणतो या वर्षी विषय राहतोय त्यावेळी तू पास तर हो मग दाखवतो असे म्हणनारी मैत्री असते......
                       सुखात सोबत असते पण अडचणीत व दुःखात भक्कमपणे उभी राहते ती मैत्री असते..... प्रत्येक गोष्टीत आपले मत नोदवनारी मैत्री असते.....यशात आपल्याला खांद्यावर घेऊन फिरते तर अपयशात आधाराचा खांदा बनते ती मैत्री असते...... सरळ वाटेने जाताना सोबत चालते ती मैत्री असते मात्र वाट वाकड़ी झाल्यावर आपल्याला आपल्या चुकीची जाणीव करुण देते ती मैत्री असते...... मैत्री म्हणजे आधाराची कुबड़ी नव्हे तर जगण्याची सोबत असते......
                      Friendship day च्या नावावर कितीही मतभेद असले , आरड़ाओरड़ा केला तरी आपल्या जगण्याला उत्सवाचे कोंदण हवे असते आणि असे काही खास क्षण जगण्याला उभारी देतात...अशाच जीवाभावाच्या  मित्रासाठी जे सोबत आहेत, तर ज्याची सोबत काळाच्या पड़दयामुळे दुरावलेल्या तर काही अंतराच्या दुराव्यात अड़कलेल्या व काही कामच्या नादात व्यस्त झालेल्या अशा सर्व मित्राच्या गोड़ आठवणीसाठी व मैत्रिसाठी......

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी

9730410154

sandip.koli35@gmail.com




12 comments:

  1. प्रत्येकाच्या मनातील मैत्री खूप छान मांडली आहे

    ReplyDelete
  2. "मैत्री "जगण्याचा "आत्मा "आहे.मैत्री बद्दल विचार छान मांडलात.

    ReplyDelete
  3. मैत्रीचं गोड नातं .....अगदी गोड शब्दात....

    ReplyDelete
  4. Happy Friendship Day

    ReplyDelete

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...