निर्णय.......
निर्णय या शब्दातच एक करारीपणा आहे. अमुक एका गोष्टीचा, विषयाचा, बाबीचा, आपण निर्णय घेतला असे आपण नेहमी म्हणतो. पण या निर्णय या शब्दाला किती महत्व आहे?? निर्णयावरच तर आयुष्याची कमान उभी असते.
आयुष जगत असताना प्रत्येक क्षणाला निर्णय हा घ्यावाच लागतो. आगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षणाला जेवताना आधी कोणती भाजी घ्यायची? आज भाजी कोणती करायची? रस्ता पार करताना आत्ता करू कि नंतर? घरातून आत्ताच बाहेर पडायचे कि थोड्या वेळाने बाहेर पडूया? या सर्वात आलाच कि निर्णय. पण आपण याला निर्णय म्हणत नाही आपण फक्त मोठ्ठ काहीतरी ठरवतो त्यावेळीच त्याला निर्णय म्हणतो.
माझ्या मताप्रमाणे निर्णय म्हणजे दोन गोष्टीतले, वस्तूतले, ठिकाणातले, चांगले किवा वाईट ठरवणे म्हणजे ' निर्णय '. थोर व्यक्तींनी अनेक व्याख्या केल्या असतील त्या मला माहित नाहीत पण मला इतकेच म्ह्नायचे आहे कि आपल्याला प्रत्येक ठिकाणी निर्णय हा घ्यावाच लागतोच.
आपण दररोजच्या जीवनात जे काही निर्णय घेतो त्याला आपण ठरवणे आसे म्हणतो. आणि ज्या मोठ्या गोष्टी ठरवतो त्याला निर्णय म्हणतो.
" प्रत्येकाला निर्णयाच स्वातंत्र्य आहे
पण निर्णयापासून स्वातंत्र्य नाही."
निर्णय घेणे यात पण कौशल्याचा भाग आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय तुम्हाला यशापर्यंत पोहचवतो. पण तोच चुकीचा निर्णय तुम्हाला अपयशाची फळे चाखायला लावतो. तसे बघायला गेले तर एक चांगली व एक वाईट यातला योग्य निर्णय घेणे त्यामानाने खूप सोपे असते पण दोन चांगल्या तून एकाची निवड करणे हे खरे निर्णयाचे कौशल्य. काही जणांच्या मते एका निर्णयाने त्याचे पूर्ण आयुष बदलून जाते तसेच एका चुकीच्या निर्णयाने तेच आयुष विस्कटून हि जाते.
आपण घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर येईल आसे नाही पण याचा अर्थ आपण निर्णय घ्यायचाच नाही असे नाही. पण आपण घेतलेला निर्णय बोरोबर येण्यासाठी आपण शक्य ठेवडे प्रयत्न करणे हे आपले काम आहे.
" कोणताच निर्णय न घेणे हा सुद्धा किती चुकीचा निर्णय आहे "
आणि म्हणून आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला निर्णयाच्या जवळ असतोच........

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदिप कोळी
9730410154
No comments:
Post a Comment