Thursday, 12 January 2017

तुम्हीही Club Ninety-nine चे Member आहात काय ?....

तुम्हीही Club Ninety-nine चे Member आहात काय ?....

                               एक जमीनदार असतो. श्रीमंत, भरपूर जमीन, नोकर चाकर दिमतिला, शेत पिकांनी भरलेली, अण घरात धान्याची रास. पण त्याचे उद्दिष्ट मोठे असते त्याला अधिक शेत, उत्पन्न व पैसा हवा असतो.
त्याच्या मोठ्या शेताशेजारी एक अल्पशी शेती असणारा एक गरीब शेतकरी असतो. कसे बसे पोट भरेल इतपत उत्पन्न , आपली पत्नी व मुलगा यांच्या सोबत आनंदात व समाधानात जीवन जगत असतो.
हे पाहून जमीनदाराला थोड़े आश्चर्य अणं हेवा जास्त वाटतो. तो आपल्या लेखनिकाला बोलावतो व घडलेला प्रसंग सांगतो व दोघातील फरकाचे कारण विचारतो. लेखनिक हुशार असतो तो म्हणतो मी सांगितले तर पटणार नाही मी सिद्ध करुन दाखवतो. लेखनिक सांगतो तुम्ही सोन्याच्या 99 नाण्यानी भरलेली थैली गरीब शेतकऱ्यांच्या घरी ठेवा व बघा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
                                सकाळी उठल्यावर त्या गरीब शेतकऱ्याला ती सोन्याची थैली सापड़ते. तो अतिशय आनंदी होतो. त्या थैलीतील नाणी मोजू लागतो. नाणी 99 भरतात त्याला प्रश्न पड़तो 100 वे नाणे गेले कुठे. तो घरात,अंगणात, व आसपास शोधू लागतो पण त्याला काही ते 100 नाणे सापडत नाही. त्याची काळजी वाढते. तो ती थैली घरात कोणालाही न दाखवता जमिनीत पुरुन ठेवतो व त्या ऐका नाण्याचा विचार करतो, त्याचे कामात लक्ष लागत नाही. प्रत्येक ठिकाणी त्याला सोन्याची नाणी दिसू लागतात.
                                  तो शेतकरी आता दुसर्याच्या शेतात काम मागायला जाऊ लागला. तिथेही जास्त काम करू लागला, घरात बायको, मुलगा यांच्या सोबत वेळ घालवण्यापेक्षा अधिक काम करून अधिक पैसे मिळवू लागला, रात्री समाधानाने झोपी जाणारा शेतकरी आता त्या एका सोन्याच्या नाण्याच्या विचारात रात्रभर जागु लागला.
हे सर्व जमीनदार व लेखनिक पाहत होते. यावर लेखनिक म्हणाला, शेतकरी पण आता तुमच्यासारखा Club Ninety-nine चा member झाला आहे. आधी तो सुखी होता आता त्याला त्या 99 नाण्यापेक्षा एका नाण्याचे महत्व अधिक वाटून त्याने आपले सर्व स्वास्थ्य घालवले आहे. पूर्वीचा आनंद, समाधान हे सर्व त्याने 'थोड़ा और चाहिए' साठी घालवले आहे.
                                 या गोष्टीचे तात्पर्य आपल्यालाही कमी-अधिक प्रमाणात लागू होते. 'थोड़ा और''थोड़ा और' करत आपली पण अवस्था त्या शेतकरी व जमीनदारासारखी होते. जीवनाचा आंनद घेण्याऐवजी आपण फ़क्त कमावण्यासाठी जगतो. शिक्षण झाले की नोकरी, नोकरी झाली की घर, गाड़ी, प्लाट, प्रोपर्टी या सगळ्यात इतके गुरफटून जातो की जगण्याच्या खऱ्या आनंदाला विसरतो. आपले मित्र, कुटुंब, छंद, आवडी या सगळ्या गोष्टी option ला जातात आणि आपल्या आयुष्याचे गणित चुकत जाते.सर्व भौतिक सुख असून सुद्धा आपण मात्र आतून समाधानी राहत नाही. मनात सारखी हुरहुर , बोचनी लागून राहते सगळे असूनही आपल्याला कशातच मनापासून आंनद मिळत नाही. सगळ्या गोष्टी फ़क्त दाखवण्यापुरत्या मर्यादित राहतात व आपल्याला मात्र काहीच उपयोगी पडत नाही.
                                 मग शेवटी आपल्याला साक्षात्कार होतो......
" जिंदगी तो जीने के लिए मिली थी,
हमने थोड़ा और थोड़ा और करके गुजार दी।"
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
🖊संदिप.....
9730410154
sandip.koli35@gmail.com

युवक Youth

आज 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस......
                            लाथ मारेल तिथे पाणी काढणाऱ्या वयोगटाचा दिवस, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने कवेत घेऊन फिरणाऱ्या जिंदादिल लोकांचा समूह, कोणालाही न जुमानता आपल्या गोष्टी खऱ्या करणाऱ्यांचा गट, आपल्या कर्तृत्वाने दुनिया को अपने कदमो के निचे लेनेवालो का समूह, प्रत्येक राष्ट्राच्या जडणघडणी मधील महत्वाचा स्तंभ........
                            पण खरंच असे आहे का? आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय सांगते? Each coin has two sides तसे सळसळत्या तरुणाईचे हि दोन पैलू नक्कीच आहेत. एक बाजू समाजाला lead करणारी तर दुसरी बाजू समाजाला विचार करायला लावणारी. तसे बघायला गेले तर ह्या दोन्हीही पैलुला आपल्या सभोवतालचे वातावरणच कारणीभूत ठरते.
                              मी, आपण या तरुणाईचा भाग आहोत. या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे आपल्या समोर समाज चुकीचे आदर्श समोर करतो. आपला समाज विचारापेक्षा पैशाला, आचारापेक्षा दिसण्याला व प्रत्येक्षापेक्षा आभासाला जास्त महत्व देतो. थोडक्यात आपल्या समाजात 'असण्यापेक्षा दिसण्याला' जास्त महत्व आहे. याचा Direct खूप मोठा व विपरीत परिणाम तरुणावर होतोय. त्याच्यामध्येही असण्यापेक्षा दिसण्यावर भर दिला जातोय. तरुणाईने आपल्या सभोवती असे आभासी जग निर्माण केले आहे.
                              "काय भुललासी वरलीया रंगा" असे पटवून सांगणाऱ्या तुकारामाच्या सारख्या जिवंत विचाराच्या पायावर भक्कम समाज उभे राहणे हि काळाची गरज आहे. वैचारिक मूल्याचे अधिष्टान निर्माण करून चांगले आदर्श व त्याचे विचार याची मालिका तरुणासमोर उभी करणे ही काळाची गरज आहे. अल्फेड नोबेल ने 'डायनामाईट' चा शोध चांगल्या हेतूने लावला होता पण प्रत्यक्ष वापर विघातक झाला. त्याप्रमाणे तरुणांच्यात असणाऱ्या Potential चा वापर कसा करायचा हे त्याच्या भोवती असणारे वातावरण, सहवास थोडक्यात समाजावर अवलंबून असते.
                                  म्हणून आजच्या या दिवशी तरुणांना व मनाने तरुण असणाऱ्याना सर्वाना थोड्याशा वैचारिक शुभेच्छा
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदिप कोळी 
9730410154
sandip.koli35@gmail.com

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...