📝 आज.......
आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे मानतात तर काही जण आणखी एक नवीन वर्ष, नवी संधी आली असे मानतात. खरी गंमत वेगळीच असते काही गेलं ,काही येणार आहे म्हणण्यापेक्षा आहे ते Enjoy करणारा खरा शहाणा ठरतो.
अर्धा ग्लास बघून अर्धा ग्लास रिकामा कि अर्धा ग्लास भरलेला हे ठरवण्यापेक्षा तो ग्लास पिऊन टाकणारा शहाणा ठरतो. तेच आपल्या आयुष्याच्या बाबतीत ठरते कारण भुतकाळ आपल्याला *निराश* करतो तर भविष्यकाळ काळजी करायला लावतो. पण फक्त आज आणि फक्त आजच आपल्याला जगायला, आनंदी राहायला , आनंदी राहायला शिकवतो. भुतकाळ आणि भविष्यकाळ विसरायला लावणारा तो 'आजचा' क्षण असतो. आणि तो 'आजचा' क्षण आपण 'आजच' जगला पाहिजे.
आपण नेहमी ठरवतो, हे करायचे, इकडे जायचे, त्याला भेटायचे, त्याला फोन करायचा, इकडे फिरायला जायचे, हा छंद जोपासायचा. पण हे सर्व प्रत्येक्ष करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपण या सर्वांकडे सोयीस्कर कारणासह अपेक्षित दुर्लक्ष करतो. आणि या सर्वांना योग्य Label लावून बाजूला करतो. कधी सुट्टी नाही, कधी काम जास्त आहे, आत्ता नको नंतर बघू ,असे म्हणून आपण आपल्याच Emotion चा गळा दाबतो. आणि मग आजच्या सारख्या एखाद्या दिवशी एकटे बसून आठवणी काढून निराश होतो.
"So कल को मारो गोली, आज अभी आणि आत्ता " जे करायचे ते आत्ता करू, कुणाला भेटायचे आहे ना आत्ता भेटू , कोणाला फोन करायचा ना आत्ता करू, फिरायला जायचे ना आज निघू. थोडक्यात आपले Emotion control करण्यापेक्षा Express करायला आणि आजच करायला शिकले पाहिजे नाहीतर उद्या तो भुतकाळ होईल आणि आपल्या निराशेचे कारण होईल.
"छोडो कल कि बाते,
कल कि बात पुराणी।
छोडो कल कि बाते
कल कि बात है आनी।
नए आज में लिखेंगे,
हम नई कहाणी।"
आजच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा थोडासा Thoughtful विचार आज सुचला म्हणून आजच......
आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा💐💐💐
🖋 संदीप.....
Right
ReplyDelete