Friday, 26 May 2017

इंटरटेन्मेंटचा धमाका

दोस्तहो नमस्ते.....
         बाहुबली 2 दुसऱ्यांदा बघितला ना, अहो 100 टक्के बघितलाच असणार. "देवसेना को किसी ने हात लगाया तो समझो बाहुबली कि तलवार को हाथ लगाया", "औरत पर हाथ डालनेवाले की उंगलियाँ नही काटते, काटते है उसका गला" हे बाहुबलीचे आणि "जय भवानी " हा कटप्पा चा डायलॉग, बाहुबली आणि देवसेनाची एन्ट्री, सेतूपती चा गळा कापलेला फुल्ल पैसे वसूल सीन यासाठी नक्कीच दुसऱ्या वेळेला बघितला असणार आणि पुन्हा पुन्हा  बघण्यासारखे असे अनेक प्रसंग नक्कीच आहेत. माझं तर फेवरेट "माहिष्मतीचे राष्ट्रगीत" लयचं भारी आणि भारदस्त . त्यामुळे आम्ही पण गँग सह पुन्हा एकदा जय माहिष्मती केलेच.
         शिवाय सोशल मीडियावर म्हणजे व्हाट्सअँप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर बाहुबली 2 चे काही सीन चे कट विडिओ पण व्हायरल झालेत त्याला पण जोरात पसंती आहे. आमचा दोस्त 'विक्या' म्हणतोय त्याच्या लांबच्या दोस्ताकडे म्हणे लॅपटॉप वर बाहुबलीची 2 ची कॉपी आहे. आता हे खरं की अफवा हे विक्या आणि त्याच्या लांबच्या दोस्तालाच माहित. तोपर्यंत आणखी एक वायर आली आहे ती म्हणजे बाहुबली 3 पण येणार आहे म्हणे. म्हणजे पुन्हा एकदा wait , watch आणि धमाका
            शुक्रवारी चेतन भगत च्या 'हाफ गर्लफ्रेंड' या कादंबरीवर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' याच नावाचा सिनेमा आला आहे. चेतन भगत आणि श्रद्धा कपूर याचा डाय-हार्ट फॅन 'सम्या' च्या कृपेमुळे मला आणि 'परश्या' ला हा पिक्चर बघायला मिळाला. प्रत्येकाच्या कॉलेज जीवनात असते तशीच अगदी जवळची माधव आणि रिया ची स्टोरी. खेड्यातला साधा-सुधा नायक आणि शहरातली मॉडर्न नायिका यांच्यातली प्रेमकथा. दोघांचे मस्त कॉलेज लाईफ नंतर प्रेम आणि मग तक्रार..ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांना स्टोरी आधीच कळते. बाकी यातला एक  डायलॉग भारी आहे "हार मत मानो हार को हराना सिखो".याची मैं फिर भी तुझको चाहूंगा'आणि 'तू थोडी देर और ठहर जा' 'बारीश' ही गाणी आधीच चांगलीच वाजतायत. बाहेर येताना हि गाणी आपण गुणगुणतो.
           या सगळ्याच्या नादात IPL कडे थोडं दुर्लक्ष झाले. तशा सगळ्या मॅचेस बघितल्या पण चर्चा जरा थांबलीच. IPL आता रोमांचक मोड वर आले आहे. एक टीम पुणे धोनी भाऊंच्या तडाख्यामुळे पहिल्यांदाच फायनल ला आली आहे .तसं धोनी भाऊंनी CSK चे कॅप्टन असताना 6 वेळा आपली टीम  फायनल ला आणली होती त्याचा फायदा पुणे घेणारच.  शिवाय रोहित दादांनी पण आपली मुंबई इंडियन्स 3 ऱ्यादा फायनल ला आणली आहे. त्यामुळे 'काटे कि टक्कर होणार ने निश्चित'. हे म्हणजे आपल्याच घरात दोन गट पडल्यासारखे आहे.आमच्यातपण कुणाला सपोर्ट यावरून 2 भाग झालेत. Geo ची जाण म्हणून तरी मुंबई इंडियन्स ला पाठिंबा देणारा पण गट आहे. असो कोणीही जिंकले तरी कप आपल्याकडेच राहणार.आता बघू 'आज कौन किस पे भारी पडता है।' आणि कोण कप उचलतो IPL-10 चा.....
            या आठवड्यात  सचिन तेंडुलकरचा 'सचिन अ बिलियन ड्रीमस्' हा ही सिनेमा येतोय त्यामुळे एंटरटेनमेंट ची ट्रीट चालूच राहणार.

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...