फिवर क्रिकेटचा.....
आमच्या Bio च्या सरांनी एका पक्षाची गंमत सांगितली होती. तो पक्षी मासा पकडला कि हवेत वर टाकतो व चोच उघडून झेलून खातो ही त्याची पद्धत पण बऱ्याच वेळा मासा वर टाकला की इतर समुद्र पक्षी तो वरच्या वर हवेतच पकडून नेतात.आणि वर टाकणाऱ्याची चोच रिकामी. या रिकाम्या चोचीच्या पक्षासारखी अवस्था IPL फायनल मध्ये पुण्याच्या टीमची झाली .टप्प्यात आलेला विजय मुंबईने अक्षरशः हिसकावून घेतला. "तोंडचा घास हिरावून घेणे" या वाक्यप्रचाराचा अर्थासह वाक्यात उपयोग 'स्मिथ भाऊ' च्या कायमचा लक्षात राहील. मात्र कौतुक 'रोहित दादाचं' 3 वेळा IPL जिंकून कप आपल्यातच ठेवल्याबद्दल मंडळाकडून जाहीर आभार!!. तसही पुणे आणि मुंबई, कोणीही जिंकले असते तरी कप महाराष्ट्रातच राहणार होता. खरंच गमतीचा भाग सोडला तर काय मॅच झाली! मागच्या IPL मध्ये खालून एक-दोन वर असणारी पुणे फायनल खेळेल असेल कधीच वाटले नव्हते. त्यातही मुंबईला एकाच स्पर्धेत तीन वेळा हरवेल याची सूतराम शक्यता देखील नव्हती.पण शेवटी फायनल गमावली तरी लोकांची मन मात्र पुण्याने जिंकली. फुल्ल मसाला मॅच. काय होते अन् काय नाही शेवटपर्यंत सस्पेन्स कायम. या सर्वात क्रिकेटचं जिंकले हे मात्र नक्की. आमच्यात 'सच्या','राहुल्या'आणि 'सम्या' मुंबईचे कट्टर समर्थक. मुंबई जिंकल्यापासून सोशल मीडिया वर पुण्याबद्दल जोकचा सपाटा लावलाय. यात चितळे बंधू, 1ते 4 सुट्टी, मिसळपाव, शनिवारवाडा याही गोष्टी सुटल्या नाहीत. चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते याचा प्रत्येय मुंबईला मिळाला . जिओ च्या कृपेमुळे लोकांची दुआ असर कर गयी शायद असे म्हणावे लागेल पण खरे आभार त्या "आजीचे" जिच्या प्रार्थनेनेच मुंबई जिंकली.
क्रिकेटची सोपी व्याख्या सांगायची असेल तर- "सचिन" बस नाम ही काफी है। या आपल्या लाडक्या "द सचिन" चा Biography सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. आता इतर कोणताही क्रिकेटर आवडत असला तरी सचिनचा फॅन नाही असा माणूस सापडणे अवघड त्यामुळे आम्ही 'सह ग्रुप सह मित्रपरिवार' 'सचिन द बिलियन ड्रीमस ' पाहिला. सचिनच्या क्रिकेट आयुष्याची Journey एका वेगळ्या अंदाजात आणि नव्याने पाहण्याचा सुरेख अनुभव. शून्यातून सुरु झालेला सचिन ते क्रिकेटचा बादशाह हा प्रवास पडद्यावर जिवंत होतो. अथक मेहनत आणि खेळावर नितांत प्रेम करणाऱ्या सचिनचं 22 यार्डाच्या मैदानावरचे 24 वर्षाचे आयुष्य मोठ्या पडद्यावर एकसाथ पाहणे हा आमच्या पिढीसाठी सुवर्णयोगच आहे. तुम्ही सचिनचे चाहते असा नाहीतर नसा तरीही सिनेमा बघताना थिएटरमध्ये एकदा तरी सचिन.....सचिन......असे ओरडायला भाग पडतोच.
आपल्या देशात क्रिकेट हा फक्त खेळ नसून तो धर्म आहे. आणि मैच भारत -पाकिस्तान याच्या दरम्यान असेल तर तो मुद्दा आणखीनच सेन्सिटिव्ह होतो. 4 जून चॅम्पियन ट्रॉफी ची भारताची पहिली मॅच आणि तीही पाकिस्तान बरोबर म्हणजे ही मैच वर्ल्ड कप फायनल पेक्षा कमी नाही. IPL मुळे आपण कितीही प्रांतवादी झालो असलो तरी 'बात जब देश कि आती है ' तो No objection.
गेला आठवडयात IPL फायनल आणि या आठवड्यात सचिन आणि भारत-पाक मॅच त्यामुळे हे नक्की कि "ये क्रिकेट का जादू है मित्रा". एकंदरीत सध्या सगळीकडे क्रिकेट फिवर सर चढकर बोल रहा है।
Tuesday, 30 May 2017
क्रिकेट फिवर
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment