Sunday, 14 May 2017

जस्टीन चा जलवा

रंग तरुणाईचा-जस्टीन बीबर

हाय फ्रेंड्स.....
      काय मग सुट्टी मजेत ना ! फुल्ल एन्जॉय ! सुट्टी म्हंटले कि खाणे-पिणे, फिरणे, पोहणे, टी.व्ही बघणे यासारखी सगळी निवांतच कामे....फुल्ल टू मस्ती.....
           दोन -तीन दिवसाच्या उन्हाळी पावसाच्या तडाख्याच्या विश्रांती नंतर  आमचा कट्टा पुन्हा जमला. आता गँग जमली म्हंटल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा आल्याचं त्यात बाहुबली, IPL हे हॉट फेव्हरेट विषय आहेतच की...गप्पा रंगात आल्या होत्या तोच 'परश्या' 'व्हेअर आर यू नाऊ' गुणगुणत आला. आता आपल्या सिनसिअर 'पव्या' ला  परत प्रश्न "हा कोणतं गाणं म्हणतोय रे?" "अरे ते 'जस्टीन बीबर' चे फेमस गाणं आहे." ग्रुप अडमीन 'सच्या' बोलला. आता जस्टीन बीबर कोण? हा भला मोठा प्रश्न 'पव्या' च्या चेहऱ्यावर साफ दिसत होता.
          प्रत्येक ग्रुप मध्ये असतो तसा आमच्याही ग्रुप मध्ये पूर्ण पणे पाश्चात्य संस्कृती अंगीकारलेला थोडक्यात इंग्रजाळलेला 'परशा'. नेहमी परदेशी संगीत, गाणी ऐकणारा, त्याच्या फोन मध्ये हिंदी पेक्षा इंग्रजी गाण्याचा भरणा जास्त.
         आणि त्यात 'जस्टीन बीबर' भारतात येतोय म्हंटल्यावर परशाच्या आनंदाला उधाण आलंय. गेली 8-10 दिवस दररोज जस्टीनचा DP आणि स्टेटस.
आणि असणारच कि कारण पण तसेच आहे ना...
          संपूर्ण जगाचा लाडका कॅनडियन पॉपस्टार 'जस्टीन बीबर' पहिल्यांदा लाइव्ह कॉन्सर्टसाठी भारतात आणि आपल्या मुंबईत आला होता.
           बॉलिवूड कलाकारही जिथे जस्टीन चे चाहते आहेत तिथे तरुणाईची काय कथा! याआधीही त्या त्या काळात ते ते आंतरराष्ट्रीय गायक इथे आले. त्यांनी कार्यक्रम केले आणि त्यांनी जिंकले. अगदी मायकल जॅक्सन पासून रिकी मार्टिन, शकिरा ते कोल्डप्ले पर्यंत आणि आता बीबर.....
              23 वर्षीय जस्टीनकडे सगळं आहे. रंगरूप आहे, प्रसिद्धी आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचे जे तरुणांना आकर्षित करतो तो त्याचा अँटीट्युड. त्याचे बोलणे, त्याचे गाणे, त्याचे चालणे, इतकंच काय तो गप्प बसलेला असतो तरी त्याच्यावरून नजर हटत नाही. रंगरूपापलीकडे त्याचे डोळे बोलतात. त्याच्या चेहऱ्यावरचा गो गेटर अँटीट्युड आणि नजरेतली धमक अख्या तरुणाईला घायाळ करते.
         जस्टीनच्या गाण्याची जादू आपल्याकडच्या तरुणाईवर आहेच. 'यू नो यू लव्ह मी , बेबी, व्हेअर आर यू नाऊ, सॉरी, व्हॉट डु यू मीन, कंपनी ही त्याची प्रसिद्ध गाणी आपल्याही मोबाईल मध्ये सापडतात. पूर्वी मायकल जॅक्सन ची असायची अगदी तशीच. या संगीत प्रकाराचे जगभरात लाखो चाहते आहेत. तसे भारतात हि आहेत. गाण्यातले शब्द कळो न कळो पण त्याच्या चालीवर मात्र डुलायला होते. अर्थात बॉलिवूड संगीताच्या प्रेमात बुडालेल्याना कदाचित आवडणार नाही पण पॉप चा एक स्वतंत्र चाहता वर्ग नक्की आहे.
              जस्टीन बीबर ची चर्चा तर गेली कित्येक दिवस सोशल  मीडियावर  आहे. त्याच्या कॉन्सर्ट, त्यांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या, त्यांची व्यवस्था, त्याची  सिक्युरिटी आणि एखाद्या राजापेक्षाही वरचढ थाटाची. मुंबई च्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर त्याचा 10 मे ला कार्यक्रम झाला. आणि लोक जस्टीन चे दिवाने का आहेत हे त्याने दाखवून दिले. त्याची एन्ट्री, त्याच गाणं, त्याचा स्टेजवरचा वावर सगळं लाजवाब होता. आपल्या गाण्याने त्याने संपूर्ण तरुणाईला थिरकायला लावले हे मात्र नक्की.
           कार्यक्रमाच्या शेवटी 'मी पुन्हा येईन म्हणून" JB चा चाहत्यांना नमस्ते आणि धन्यवाद....

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...