बाहुबली, बाहुबली, आणि फक्त बाहुबली. आठ दिवस झाले परीक्षा संपून. परीक्षा सपंल्याचा आनंद, त्यात IPL ची ट्रीट, सुट्टीचे प्लॅंनिंग या सगळ्या गोष्टी असताना गेल्या काही दिवस एक गोष्ट सर्वांच्या डोक्यावर चढून बसलीय आणि ती म्हणजे बाहुबली 2. जनरली कुठल्याही गोष्टीसाठी पेशन्स न ठेवणारी आमची पिढी बाहुबली 2 साठी मात्र जीव तोडून वाट बघतेय.कारण पण तसंच आहे ना पहिल्या बाहुबली ने वेड लावले .त्याचाच हा इफेक्ट कि सिक्वेल ची इतक्या उत्कटतेने वाट बघितली जातीय. सध्या सगळीकडे बाहुबली 2 च्या चर्चेचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या सुट्टी असल्याने आणि बाहेर जरा जास्तच ऊन असल्याने चर्चेचे सगळे अड्डे व्हाट्सअँप आणि फेसबुक वर जमतात. त्यात आमच्या ग्रुप ने 'विक्याच्या' कौशल्याच्या जोरावर बाहुबली 2 ची तिकिटे मिळवली त्यामुळे ग्रुप मध्ये आमचा वट जरा जास्तच वाढलाय. आमचा अडमीन तर दररोज न चुकता ग्रुप वर online booking success चा मेसेज टाकून बाकीच्यांना जळवत होता. फेसबुक वर टॅग वॉर करून तिकीट न मिळाल्याची खेचायची चालली होती. आणि फेक स्टोरी चा तर इतका सुळसुळाट झालंय कि आमचा 'सम्या' तर दररोज एक खरी स्टोरी म्हणून बोगस कहाण्याचा सपाटा लावलाय.
तिकीट मिळवण्याची ओढ प्रचंड आहे. पहिले शो हाऊसफुल्ल झाल्यानंतर किमान आठवड्यात तरी बुकिंग मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. एरवी "हम जहाँ खडे होते लाईन वहा से शुरू होती है " म्हणणारी गँग सकाळपासून तिकिटांच्या खिडकी बाहेर गपचूप नंबरची वाट बघत उभी होती.
पण भावांनो इंतजार कि घडिया खत्म 28 ला शुक्रवारी साडेतीन मुहुर्तापैकी एक अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर आमच्या ग्रुप ने पहिल्या दिवशी तिकिटांच्या इतक्या दुष्काळात पण "बाहुबली 2" पहिलाच....
कट्टापाने बाहुबलीला का मारले ? या एका प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून आमच्या सारखे कट्टर चाहते दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा थिएटर मध्ये हा सिनेमा पाहतात त्यावेळी " आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो चार, पाच डोळे अशी आमची अवस्था झाली. एखाद्या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल पहिल्या भागाइतकाच दमदार, क्लास आणि खणखणीत असल्याची उदाहरणे आपल्याकडे फारशी बघायला मिळत नाहीत पण बाहुबली 2 मात्र या सगळ्याला अपवाद ठरला आहे.
कटप्पाने बाहुबली ला का मारले असेल असे कोडे सगळ्या जगाला घालून डायरेक्टर राजमौली नी बाहुबली- द बिगिनींग संपवला होता. त्यावरून बाहुबली- द कनक्लुजन या सगळ्याची उत्तर देणार हे सहाजिक होते. बाहुबली 2 हा बाहुबली 1 चा पुढचा भाग असला तरी याची बहुतेक स्टोरी मागच्या काळातील आहे. बहुबलीचे वडील अमरेंद्र बाहुबली , माहिष्मती चे होणारे घोषित राजे असतात, अमरेंद्र व देवसेना( अनुष्का शेट्टी) याची प्रेमकहाणी फुलवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात होणारे अंतर्गत राजकारण, भल्लालदेव यांची राजसिंहासनाची महत्वकांक्षा आणि त्यातून घडणारे डावपेची राजकारण अशी सारांश स्टोरी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण ज्या प्रश्नासाठी गेलो होतो त्याचंही उत्तर मिळते.
बाहुबली 2 म्हणजे फुल्ल पैसे वसूल सिनेमा. बाहुबली (प्रभास) ची एन्ट्री काटा किर्रर्र.. थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्टयाच.. सिनेमात CGI आणि VFX तंत्रज्ञानाचा वापर अफलातून झालाय. सिनेमातील काही सिन बघताना नकळतच आपल्या तोंडातून ' वा क्या बात है।' हे शब्द सहज निघतात. जे पडद्यावर घडतंय ते इतके भव्य व अफलातून आहे हे पाहून आपण थक्क होतो. मनोरंजनासाठी लागणारे सर्व कन्टेन्ट यात आहेत एक राजा, एक राणी, त्याची प्रेमकहाणी, राजसिंहासनासाठीचे राजकारण, यात होणारे जनतेचे हाल, डोळे दिपवणारे सेट्स, प्रत्येक कलाकाराचा बेस्ट परफॉर्मन्स, खिळवून ठेवणारे सीन्स, जाणदार डायलॉग आणि ज्याची आपण कल्पना करू शकणार नाही असे प्रसंग, सगळं काही larger than life आहे. 'राजामौली जब देता है तो छप्पर फाडके देता है ' हि फीलिंग सिनेमागृहातून बाहेर पडताना नक्की येते.
पहिल्या सिनेमाच्या गारुडाखाली आम्ही हा सिनेमा पाहिला पण बाहेर पडताना या सिनेमाच वेगळंच वलय घेऊन बाहेर पडतो. आणि पुन्हा एकदा सिनेमा बघायचा हे बाहेर पडायच्या आधीच ठरलय.
शेवटी बाहुबली 2- द कनक्लुजन च वर्णन इतकंच कि तो आला... आम्ही पहिला....आणि त्यानं जिंकलं....
जय माहिष्मती....
Saturday, 29 April 2017
फक्त बाहुबली
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment