परवा सरांनी maths च्या लेक्चर मध्ये प्रश्न विचारला "What is the formula of simple interest". तर ते मागच्या बाकावरचं सम्या जे कायम maths च्या लेक्चर ला झोपणारं गडबडीने उत्तर दिलंय ' P×R×T divided by 100. हे.. हे... हे..... सर पण चाटच पडले. नंतर आम्हाला कळलं की सम्याची ही अॅक्शन 'बद्रीनाथ की दुल्हनिया' पिक्चर ची रिअॅक्शन होती.
दहावी शिकलेला पण सावकारी करणाऱ्या श्रीमंत बापाचा मनानं भोळ पण उचापती करणारं पोरगं बद्रीनाथ. स्वतःच्या श्रीमंती व दिसण्यावर अति गर्व असणारा बद्री. याच्या उलट असणारी वैदेही, ठाम, confident, करियर ला महत्व देणारी. सुरुवातीला नाकार आणि मग याच्या प्रेमाची लव्हस्टोरी. फुल्ल बॉलीवूड मसाला चित्रपट.
वरुण-आलिया ची हिट जोडी, दोघांची प्रचंड energy, झकास background music, रिलीज पूर्वीच गाजलेली अमाल मलिक, तनिष्क बागची, आणि अखिल सचदेव ची कडक गाणी, त्यावर मसालेदार डायलॉग जे लक्षात राहून सहज वापरता येतील असे. 'काल कॅन्टीन मध्ये गेल्यावर उधारीवर चहा मागितल्यावर कॅन्टीन मालकाचा चेहरा बघून आमच्या ग्रुप चा अँडमिंन सच्या म्हणतो " तुम्हारी मानसिक इस्थिती आज गडबड लग रही है। हम कल आते है।" इतके सहज वापरता येणारे संवाद...... जबरदस्त शूटिंग आणि रोमँटिक स्टोरी, फुल टू मसाला मूवी. डोक्याला शॉट न लावता बघण्याचा सिनेमा...
पण भावांनो या सगळ्यापेक्षा आत्ता हवा आहे ती बाहुबली 2 ची. नुसता ट्रेलर आलाय तर ही अवस्था पिक्चर ला तर विषयच सोडा.. वर्ल्ड क्लास सेट्स, high class तंत्रज्ञान, जिवंत अॅक्शन, प्रभास चा लुक आणि कटप्पाने बाहुबली का मारले? या आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे उत्तर मिळणार.. या सर्वामुळे बाहुबली 2 चर्चेत आहे.
Youtube वर बहुबली 2 चा ट्रेलर धुमाकूळ घालतोय. मागचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढून बाहुबली 2 चा ट्रेलर हिट झालाय. शेवटच्या पेपर होण्याची जेवढी वाट बघितली नसेल तेवढी वाट बाहुबली 2 ची बघातायत आणि आतापासून 'फर्स्ट डे फर्स्ट शो ' चे प्लॅंनिंग सुरु झालय...
त्यामुळे सध्या तीनच गोष्टीची चर्चा सुरु आहे Exam, IPL आणि बाहुबली 2........
जय माहिष्मती.
Saturday, 29 April 2017
बाहुबली
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment