परवाच्या पेपरच्या आधी 10 मिनिटे शेवटच्या बाकावरचा राहुल्या त्याच्या पुढच्या बाकावरच्या पव्या ला म्हणतोय कसा "सॅमसन काय खेळतोय नाय?. आता सिनसिअर पव्या ला 'सॅमसंग' ही इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी फक्त माहित. म्हणून मला डिवचून पव्या म्हणतोय कि " हा सॅमसन कोण रे? तोपर्यंत शेजारची सायली म्हणते " त्यासाठी पुस्तक सोडून दुसरीकडे पण लक्ष द्यावे लागते". त्यावर पव्या म्हणतो अशा महत्वाच्या वेळी कसं सुचत रे तुम्हाला.....
पण या सिनसिअर पव्या ला कोण सांगणार IPL पण गंभीर आणि महत्वाचा विषय आहे. तसही भारतात क्रिकेट हा एक स्वतंत्र धर्मच आहे. आणि त्यात IPL चा हा high voltage धमाका म्हणजे क्या बात..!! 10 वर्षापूर्वी सुरु झालेला क्रिकेट चा हा उत्सव आजही तितकाच लोकप्रिय व कौतुकाचा विषय आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत आणि अगदी सायली सारख्या क्रिकेट हा मुलांचा खेळ मानणाऱ्या मुलींच्यापर्यंत सगळ्यांच्या पसंतीला IPL खरे उतरले आहे. 2008 ला ज्यावेळी IPL ची सुरुवात झाली त्यावेळी ते इतके लोकप्रिय होईल असे फारसे कोणाला वाटले नसावे पण Opening Match मध्ये मैकलम ने 158 रन धुतल्या होत्या. तो IPL चा ट्रेलर होता आणि त्यानंतरचा सिनेमा आजतागायत सुपरहिट आहे. या 10 वर्षात दुसऱ्या कुठल्या क्रिकेट स्पर्धेपेक्षा एप्रिल आणि मे मध्ये येणाऱ्या IPL ची वाट जास्त प्रेक्षक बघतात.
तसं बघायला गेलं तर 'क्या कुछ नही है IPL में... बडे प्लेअरस है, बडे ओनर्स है, लंबे लंबे सिक्स है, बडे बडे विकेट्स है, प्लेअरस् के बीच बॅटल है, ड्रामा है, बॉलीवूड का तडका है, चिअरगर्ल्स का एंटरटेनमेंट है, और क्या चाहिये। सचिन पासून चहल पर्यंत, धोनी पासून स्मिथ पर्यंत आणि शेन वॉर्न पासून जॅक कॅलिस पर्यंत जगभराच्या क्रिकेट विश्वातील प्रत्येक नाव वेगवेगळ्या रोल मध्ये IPL शी जोडले गेले आहे. सध्या सारे क्रिकेट विश्व IPL मध्ये एकवटलेले आहे.
या वर्षी तर IPL चे 10 वे वर्ष '10 साल आपके नाम' या थीम वर जल्लोष. या वर्षीचे IPL गाजतंय आणि अजून धडाक्यात गाजणार कारण स्मिथ, AB.D, कोहली, धोनी, रैना, रोहित, जहीर, गंभीर, मैकलन, मॅक्सवेल, युवराज, सुनील नारायण, बुमराह, मलिंगा ,उमेश यादव यासारखे क्रिकेटचे जादूगार मैदानात आहेत. IPL मध्ये प्रत्येक टीम ला support करणाऱ्या फॅन ची संख्याही अफाट आहे. हा support प्रांतवार नसून खेळाडूसाठी आणि आपल्या आवडत्या खेळासाठी केला जातो.' आमचा अर्धा ग्रुप फक्त विराट साठी आणि AB.D साठी RCB ला support करतो'.
T-20 फक्त बॅट्समन चा खेळ नसून बॅटिंग, बॉलिंग, आणि फिल्डिंगचा overall performance आहे हे IPL ने दाखवून दिले. कारण जेथे 120 बॉल मध्ये 200 रन निघतात, 12 मैच मध्ये 174 सिक्स मारलेत तेथे शुक्रवार च्या दोन मैच मध्ये 2 हॅट्रिक पण बघायला मिळाल्या.
IPL ने क्रिकेट ला खूप काही दिले. स्थानिक खेळाडूंना international प्लँटफॉर्म दिला. खेळाची संधी दिली आणि यातूनच भारतीय क्रिकेटला भविष्यातले आश्वासक खेळाडू दिले. वृषभ पंत, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, बुमराह या सारखे आश्वासक खेळाडू IPL चे प्रॉडक्ट मानावे लागतील. 'सैराट' मधल्या 'बिटरगाव प्रीमिअर लीग' प्रमाणे आता गावोगावी व शहर स्तरावर अशा प्रीमिअर लीग भरू लागल्या आहेत व यातून नवीन खेळाडूंना संधी व प्रोत्साहन मिळते हे IPL चे यश आहे.
बाकी काहीही असो 'IPL का आगाज इतना शानदार है तो अंजाम तो उससे भी शानदार होगा।' 'सत्या' चित्रपटात मनोज वाचपेयी चा एक फेमस डायलॉग होता. मुंबई का किंग कौन?......तसा सध्या एंटरटेनमेंट का किंग कौन?.....IPL सिर्फ IPL.....
Saturday, 29 April 2017
IPL आणि IPL
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment