नमस्ते दोस्तांनो....
कस काय मग.... Entertainment चा डोस IPL जोरात सुरु झालाय की.... पण या IPL आणि Exam यांच्या मध्ये आपली अवस्था त्या पिजऱ्यात अडकलेल्या उदारासारखी झालीय. IPL रुपी शेंगा दिसतात पण खाता येत नाहीत. आपली सगळी धडपड परीक्षारुपी पिजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी चाललीय. आणि यातच आपली दमछाक झालीय. आणि त्यातून घरातले तर असे बघतात कि त्यांनी आपला नादच सोडलाय.
अशा सगळा आणीबाणीचा प्रसंग असला तरी पिक्चर ला पर्याय नाही. या सगळ्या धामधुमीत कट्ट्यावर तीन चित्रपटाची चर्चा आहे. 'नाम है शबाना', 'पूर्णा' आणि मराठी 'ब्रेव्हहार्ट'. तसे शबाना आणि पूर्णा हे स्त्री शक्तीचे कौतुक करणारे सिनेमे.
आमच्या ग्रुप मधला विक्या अक्षय कुमारचा जबरा फॅन , त्याला कुणीतरी सांगितले की 'शबाना' हा 'बेबी' सिनेमाचा प्रिक्वेल आहे.म्हणून हा First day First show ला गेला पण येताना शबानाचा म्हणजे तापसी पंन्नूचा फॅन होऊन आला. मग काय चार दिवस जाईल तिथे विक्या शाबनाची स्टोरी सांगत होता. 'नाम है शबाना' हा पूर्ण पणे तापसी वर आधारित सिनेमा. वेन्सडे, स्पेशल 26, बेबी यासारखे हटके चित्रपट देणाऱ्या नीरज पांडे चा सिनेमा, एखाद्या व्यक्तीला घेऊन तिची बॅकस्टोरी सांगण्याचा नवा प्रयोग, शबाना, तिची आई, तिचे आयुष्य आणि अचानक झालेला बदल या भोवती फिरणारा सिनेमा. यात अधून मधून तापसी बरोबर मनोज वाचपेयी दिसतो. शिवाय अक्षय कुमार अनुपम खेर, डॅनी हे सगळे दिसण्यापूरतेच दिसतात. पूर्णपणे Action पॅक सिनेमा.पहिल्या पासून आपल्याला खिळवून ठेवणारा. व्हायोलिन वर वाजणारी ट्यून अंगावर काटा आणते.संकलन, अभिनय, छायांकन, पार्श्वसंगीत या सर्वच पातळीवर शबाना शानदार आहे.
असाच रोमांच उभा करणारा दुसरा सिनेमा म्हणजे 'पूर्णा'. यशोशिखराच्या ध्यासाची गोष्ट म्हणजे पूर्णा. तेलंगणाच्या आदिवासी भागातून येऊन वयाच्या 13 व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केलेल्या पूर्णा मालावतच्या संघर्षाची सच्ची कहाणी. आदिवासी पाडा ते एव्हरेस्ट असा Larger than life प्रवास अगदी सध्या पद्धतीने राहुल बोस ने मांडला आहे. राहुल बोस ला आपण गुणी अभिनेता म्हणून ओळखतोच त्याच बरोबर पूर्णाची भूमिका अदिती इनामदारने जगली आहे. बायोपिक असल्याने काही हँप्पनिंग नाही पण यशाची स्टोरी साध्य व वेगळ्या पद्धतीने नक्कीच बघायला मिळते.
या दोन हिंदी चित्रपटात एक मराठी चित्रपट भाव खातो तो म्हणजे 'ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची' ज्याला चित्रपटातला आणि जगण्यातला आनंद कळतो त्याच्यासाठी ट्रीट. कारखानीस बापलेकाची सत्यकथा. असाध्य रोगाने जखडलेला मुलगा व त्याच्यासाठी धडपडणारा बाप याची कहाणी. अरुण नलावडे व संग्राम समेळ याच्या अभिनयाने रंगलेला 'ब्रेव्हहार्ट'. सिनेमा सत्यकथेवर आधारित असल्याने रंजकता नाही पण तरीही मनाला स्पर्श करणारा आहे. जगण्यावर प्रेम करणाऱ्या जिंदलील लोकांनी पाहायला हवा असा.....
बाकी काही हि झाला तरी आपला सिनेमाचा नाद आहेच. शिवाय IPL आहे आणि Exam चा हत्ती जाऊन शेपूट राहिलंय So Enjoy......
Saturday, 29 April 2017
शानदार शबाना.
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment