आमचा दोस्त 'राहुल्या' गेल्या रविवार पासून दुःखात आहे आणि कारण काय तुम्हाला पण माहीत आहेच की टीम इंडिया चा चॅम्पियनस् ट्रॉफीच्या फायनल मध्ये झालेला पराभव. सर्वांनी 'राहुल्याला' समजावले पण त्याला राग आणि दुःख दोन्हीही कमी होत नाही. फायनल ची मॅच आणि तेही पाकिस्तानकडून हा धक्काच त्याला सहन झालेला नाही. सतत चिडचिड, आदळआपट आणि सोशल मीडियावर त्याची Reaction लगातार चालू आहे. त्यात 'अज्या' आणि 'परशा' दोघेही त्याच्या बाजूने. भारताचा पराभव हा आपल्या सर्वांच्या जिव्हारी लागलेला असला तरी शेवटी खेळ हा खेळ आहे. कोणीतरी जिंकणार व एक हरणार हा आता पाकिस्तान कडून हारणे हे थोडे अपचनी पडणारे असले तरी आता त्याचा काही फायदा नाही. 'एक बुरे सपने कि तरह उसे भूलकर' आपण काहीही झाले तरी आपल्या चॅम्पियन्स ला सपोर्ट करायलाच पाहिजे. तसेही आपल्या हॉकी टीम ने पाकिस्तान ला 7-1 ने धूळ चाटवत क्रिकेट चा बदला घेतलाच आहे. खेळ हा खेळ भावनेने घेऊन टीम इंडिया वेस्टइंडिज दौऱ्यात आपला दबदबा पुन्हा निर्माण करेल यात शंका नाही.
मित्रहो सुट्टी संपली, फिरसे कॉलेज शुरू. लहानपणीसारखी सुट्टीची मजा नसली तरी दररोजच्या रुटीन मधून थोडा चेंज म्हणून सुट्टी हि हवीच असतेच. बच्चे कंपनी आणि हायस्कूल च्या भावांची शाळा 15 जून लाच सुरु झाली. तुमची हि कॉलेज कमी जास्त फरकाने सुरु झाली असतील किंवा लवकरच सुरू होतील. शाळेत असताना पहिल्या आठवड्यात मारावी वाटणारी दांडी कॉलेज च्या वर्षात मात्र हरवलेली दिसते. कॉलेज सुरु होणार म्हणजे आपली गँग खुश आहे. 'फिर से दिल, दोस्ती, दुनियादारी. ऍडमिशन चा गोंधळ , लेक्चर चे शेशन, प्रॅक्टिकल चा धडाका, असाइंमेन्ट ची ट्रीट, कॉलेज चा कट्टा, कट्टयावरची धमाल, कॅन्टीनचे नवे खाते, नवी उधारी, नवीन वर्षाचे नवे फंडे आणि नवे जुगाड, कॉलेज से फिर से बंक, फॅशन का नया फंडा, दोस्तो के संग फिर सुनेहरे लमहे, पुराणी जीन्स और ढेर सारे नये सपने. या सगळ्या सोबत नवीन वर्षाची सुरुवात होत आहे.
या एक्साईटमेंट मध्ये आपल्या सलमान भाईजान चा ईद ला नेहमी ठरल्या प्रमाणे नवा कोरा "ट्यूबलाईट" या शुक्रवारी आलाय. गेल्या दोन महिन्यांपासून "ट्यूबलाईट" ची चर्चा सुरु आहे. रेडिओ हे गाणे जोरात सुरु आहे. सलमान भाई चा सिनेमा म्हणून आम्ही हि पहिला. मिलिटरी, भारत-चीन युद्ध व दोन भाऊ याची कथा. ट्यूबलाईट म्हणजे भाईजान. बाकी मसाला, इमोशन आहेच. सिनेमात निसर्गाच्या सुरेख फ्रेम्स वापरून त्याची जादू दाखवली आहे असंच म्हणावं लागेल. अनपेक्षित भाग म्हणजे शाहरुखची पाहुण्या कलाकाराची भूमिका. ज्या प्रेक्षकांनी ‘लिटिल बॉय’ हा चित्रपट पाहिला आहे, त्यांच्यासाठी या ‘ट्युबलाइट’चा उजेड फारसा नवा नाही. चित्रपटाच्या शेवटापर्यंत पोहोचता पोहोचता आपल्याला अंदाज येतो आणि कुठेतरी उजळलेलं हे कथानक काहीसं झाकोळलं जातं असंच म्हणावं लागेल. आपल्याला सलमान ला दबंग स्टाईल मधेच बघायला आवडते हे मात्र नक्की.
Saturday, 24 June 2017
टीम इंडिया ची ट्यूबलाईट
Sunday, 18 June 2017
फिर से मौका..मौका
Yes फायनल मध्ये... चॅम्पियन्स ट्रॉफी बघताय ना... बघतच असणार. गुरुवारची मॅच पण बघितली असेल. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 च्या फायनल मध्ये भारताने घासून नाही तर ठासून प्रवेश केला. मॅचच्या आधी खूप जड जातील असे वाटणाऱ्या बांगलादेश च्या 'शेरांना' घरचा रस्ता दाखवत सेमी फायनल च्या या सामन्यात भारत 'सव्वाशेर' ठरला. कोहली भाऊंच्या विराट ब्रिगेड ने जबरा खेळ केला. सुरुवातीला बॉलर, फिल्डर नी व नंतर रोहित, शिखर आणि विराटच्या तुफान फटक्यांनी बांग्लादेशची टीम सावरलीच नाही आणि विजय त्याच्या हातातून सुटून भारताच्या पारड्यात कधी आला हे बांग्लादेशला कळलेच नाही. स्वतःला फक्त वाघ म्हणून घेऊन कोणी वाघ होत नसते त्यासाठी वाघाची दहशत मैदानात सिद्ध करावी लागते हे दाखवून देत बांग्लादेश के 'शेरो' को भारत कि विराट सेना ने एक फटके में ढेर कर दिया. भारताच्या या विजयाने बांग्लादेशचे उतावळे चाहते हि तोंडावर पडले.
आणि आपण फायनल मध्ये आलो याचा अर्थ हाच कि "फिर से मौका...मौका.... आज भारत-पाकिस्तान फायनल. तब्बल 10 वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान आयसीसी स्पर्धेच्या फायनल मध्ये पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. या पूर्वी 2007 मध्ये T20 च्या पहिल्या वर्ल्ड कप मध्ये हे दोन्ही संघ एकत्र आले होते. त्या वेळी भारत-पाक लीग मॅच मध्ये बॉल आउट या प्रकाराने मास्टरमाईंड धोनीने पाकिस्तान ला पटकले होते व त्यानंतर फायनलच्या वेळी पुन्हा एकदा धोनी भाऊंच्या मास्टर प्लॅन ने पाकिस्तानच्या तोंडचा वर्ल्ड कप चा घास हिसकावून घेतला होता. या घटनेला 10 वर्ष झाली या 10 वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे दोन्ही टीम मध्ये खूप बदल झाले आहेत. भारताची टीम सगळया बाबतीत सध्या खूप मजबूत आहे. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग या तिन्ही क्षेत्रात भारताची कामगिरी सरस आहे आणि हे टीम इंडिया ने आपल्या सगळ्या मॅच मध्ये दाखवून दिले आहे. पाकिस्तान फायनल ला पोहचले असले तर त्याचा फायनल पर्यंतचा प्रवास अडखळत झाला आहे. शिवाय या स्पर्धेत लीग मॅच मध्ये भारताने मोठ्या फरकाने पाकिस्तानला पाणी पाजले होते.
आज रविवार आणि त्यात हा महामुकाबला होत आहे. क्रिकेटच्या चाहत्यांसाठी व आपल्यासाठी हि खूप मोठी ट्रीट तर आहेच. नेट वॉर तर पाकिस्तान फायनल ला आल्यापासून सुरु झालीच आहे. जोक वाचून पोट दुखायला होते.सगळ्या बाजूने या सामन्याला रंगत आणण्याचे काम सुरु आहे. आजच्या या महामुकाबल्यात कळेलच "कौन किस पे भारी पडता है।" पण हा संडे मात्र सुपर संडे होणार शिवाय योगायोग पण बघा 18 तारखेला "फादर्स डे" पण आहे आणि या दिवशी वडिलांना गिफ्ट हे द्यावेच लागणार.
Saturday, 17 June 2017
अनलिमिटेड फन
हाय फ्रेंड्स......
भारत-पाक मॅच बघितली ना! बघितलीच असणार हाय व्होल्टेज मुकाबला आणि तोही रविवारी म्हणजे प्रश्नच नाही. पण बेस्ट पार्ट की आपण मॅच जिंकली. रोहित दादा आणि गब्बर शिखर च्या पायाभरणीवर विराट भाऊ, इंग्लंडचे जावई युवराज पाजी आणि शेवटी हार्दिक ने कळस चढवला. त्यानंतर बॉलरनी आपला करिश्मा दाखवत आपल्या सेंटिमेन्ट चा विषय असलेली मॅच जिंकली त्याबद्दल विराट भाऊ आणि पलटनचे मंडळाच्या वतीने जाहीर हार्दिक आभार! पण ही मॅच जिंकली तरी श्रीलंकेसमोर मात्र आपण नांगी टाकली. रोहित आणि शिखराच्या जबरदस्त सुरुवातीनंतर धोनी स्टाईल चा तडखा लावून आपला स्कोर 300 च्या गेला. तरीही गोलंदाज मॅच वाचवू शकले नाहीत. असो त्यामुळे "थोडी ख़ुशी थोडा गम" वाल वातावरण आहे पण खेळात हार-जीत आलीच. "और हारकर जितनेवाले को बाजीगर कहते है।" आणि आपली टीम नक्कीच बाजीगर आहे.
अरे हो! या क्रिकेटच्या गरमागरमीत पिक्चरचा विषय राहूनच गेला. आपला 'विक्या' सैराट मधल्या परशाचा म्हणजे आकाश ठोसर चा फॅन. म्हणून विक्याच्या आग्रहाखातर F. U अर्थात 'फ्रेंडशिप अनलिमिटेड' हा सिनेमा पहिला. कॉलेज, कॉलेज लाईफ, प्रेम, ब्रेकअप, भांडणे, मित्रांच्या गप्पा हा चित्रपटाचा गाभा. गाणी म्हणाल तर "हम आपके है कौन" ला मागे टाकत या F. U मध्ये तब्बल 14 गाणी आहेत पण बाहेर आल्यावर एकही लक्षात राहिले नाही. बाकी वैदेही परशुरामी तेवढीच सगळ्या सिनेमात छान दिसते. पिक्चर म्हणाल तर जुनाच मसाला नवीन तडक्यासह पण तोही नीट बसलेला नाही म्हणजे खूप प्रयत्न करूनही तितका यशस्वी नाही वाटत हा आता तुम्ही परशाचे चाहते असाल तर या एकदा बघून.
यापेक्षा मला आवडलेला दुसरा सिनेमा तो ही मराठी " मुरांबा". तरुणाईच्या कलांन, प्रौढांच्या दिलांन विचारपूर्वक मुरवलेला मुरांबा. मुरांब्याच्या संकल्पनेप्रमाणे या चित्रपटाची गुंफण केली आहे. आपली नाती म्हणजे कैरी आणि त्यातले पदार्थ म्हणजे आपल्या जीवनातले चढउतार. रिलेशनशिप , करिअर, संधी, आणि पुणे यांच्या भोवती फिरणारा हा सिनेमा आपल्यात मुरत जातो. उच्चभ्रू कुटुंबातील रिलेशनशिप त्यातून संशय, फोन तपासने आणि मग ब्रेकअप. मग हे सगळे पूर्वपदावर आणण्यासाठी आई- वडिलांचा प्रयत्न, या सर्वांची सुरेख गुंफण.पार्श्वसंगीत सुरेख आहे नक्की बघण्यासारखा मुरांबा.
या आठवड्यात सुशांतसिंग रजपूत (धोनीवाला) चा "राबता" ही रिलीज झाला आहे. एस.एस. राजमौली च्या बाहुबली नंतर VFX च्या वापराचे मोठ्या प्रमाणावर हिंदीत प्रथमच धाडस करत दोन वेगळ्या संस्कृतीची कथा सांगणारा राबता सध्या चर्चेत आहे. ट्रेलर, स्टोरीची चर्चा आणि गाणी यामुळे याची उत्सुकता आहेच. हिंदी बरोबर हॉलिवूडच्या पडद्यावर 'द ममी' च्या नव्या अवतारात आणि नव्या भागात अभिनेता टॉम क्रूझ ला पाहणे या आठ्वड्यातली पर्वणीच आहे.
सध्या बाहुबली आणि सर्व हिंदी मूवी चॅनलमुळे आपण सगळे तामिळ सिनेमाचे फॅन झालो आहोत. त्यातच आर्या फेम टॉलीवूड सुपर स्टार अल्लू अर्जुन च्या दुव्वदा जगन्नधाम (DJ) चा ट्रेलर इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय. बाहुबली 2 च्यानंतर या DJ च्या ट्रेलरला सर्वाधिक व्ह्यूज मिळाले आहे. ऍक्शन, डान्स, रोमान्स, आणि अल्लू एका ब्राह्मण आचारी आणि स्पेशल एजंटची दुहेरी भूमिका आपल्याला पहायला मिळणार हे ट्रेलर दाखवतो. तुम्ही हि एकदा Youtube वर चेक करा. या सगळ्यामुळे या आठवड्यात 'फन मात्र अनलिमिटेड' आहे.
Saturday, 3 June 2017
उत्सुकता हाय व्होल्टेज मुकाबल्याची
आपल्या नेहमीच्या मैदानावर आमचा क्रिकेटचा डाव....आता आपल्याकडील ग्राउंड वर सामना म्हणजे आपल्या बरोबर 8-10 टीम एकावेळेेला खेळायला. इतक्यात एक भारी वाक्य ऐकू आले. " हे बघ भावा, चॅम्पियन ट्रॉफी नाही जिंकली तरी चालेल पण पाकिस्तान बरोबरची मॅच जिंकायलाच पाहिजे." हि वाक्य होती चड्डीतल्या पोरांची.ही चिंटू गँग भारत- पाकिस्तान मॅचची चर्चा करत होती. आणि चर्चा तर होणारच ना भारत-पाकिस्तान सामना म्हणजे 'सोने पे सुहागा'।
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे मिनी वर्ल्ड कप. जागतिक क्रमवारीतल्या पहिल्या आठ संघाची स्पर्धा.आठ संघाची दोन गटात विभागणी , दोन्ही गटातले पहिले दोन-दोन संघात सेमी फायनल आणि मग फायनल. अगदी छोटा आणि सोपा फॉरमॅट खच्चून अठरा दिवसात स्पर्धा संपते. त्यामुळे ही लोकप्रिय आहे. या वर्षी हि स्पर्धा गेल्यावेळीच्या उपविजेच्या इंग्लंड च्या 'रन'भूमीत संपन्न होत आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात 1 जून ला पण खरा मुकाबला 4 जून ला च भारत-पाकिस्तान दरम्यान. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या या High Voltage मुकाबल्याला अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे या सामन्याची व निकालाची उत्सुकता दोन्ही देशांच्या चाहत्यामध्ये शिगेला पोहचली आहे. सामना जरी आज होणार असला तरी याची चर्चा आणि उत्सुकता वेळापत्रक जाहीर झाल्यापासून आहे. या स्पर्धेची जाहिरात करतानाही स्पोर्ट्स चॅनल नी भारत-पाक सामन्यावरच भर दिला आहे. "मौका-मौका" च्या व्हिडीओ नी तर यू-ट्यूब आणि इतर सोशल मीडियावर अक्षरशः थैमान घातले आहे. गुगलच्या डुडल वर ही क्रिकेटचा फिव्हर चढला आहे. क्रिएटिव्ह आणि मजेशीरपणे डुडल तयार केले आहे. जोक्स च तर विचारू नका. लोक इतकी क्रिएटिव्हिटी आणतात कोठून हा कौतुकाचा विषय आहे. कधी चुकून सोशल मीडिया वर जर युद्ध झाले तर मला नाही वाटत आपल्या देशातल्या पोरांच्यापुढे कोणी टिकेल.
आजच्या मॅच मध्ये दोन्ही संघ एकमेकांशी खेळतील त्यावेळी खेळाडू इतकाच तणाव दोन्ही देशातल्या प्रेक्षकाच्यावरही असेल. तस ही 2015 च्या वर्ल्ड कप मध्ये आपण पाकिस्तानला हरवल्यानंतर पहिल्यांदाच वन-डे त हे संघ आमने-सामने येत आहेत.
गतविजेता भारत या स्पर्धेचा "डार्क हॉर्स" आहेच. पाकिस्तानचा संघ पूर्वीसारखा नाही. शोएब मलिक आणि उमर अकमल सोडले तर बाकीच्यांची नावे पण अनेकांना माहित नाहीत. पण इथं नावाचं करायचे काय भारत-पाक मॅच म्हंटले की विषय संपला! तो राष्ट्रीय देशभक्तीचा मुद्दा होतो आणि होणारच.
तशी वादाची ठिणगी पाकिस्तान कडून आधिच पडली आहे. त्याचा तो बॉलर जुनेद खान ने मीडिया समोर "विराट ला काय मी सहज गुंडाळेन" म्हणून 'बोलंदाजी' करून माईंड गेम खेळला आहे. भारताने शाब्दिक चकमक केली नसली तरी पहिल्या दोन सराव सामन्यात न्यूझीलंड आणि बांग्लादेश चे हाल करून सोडले आहे. यातून पाकिस्तान ने धडा घेतला असेल नाहीतर घोडा मैदान लांब नाही. बघू कोण बाजी मारते ते. आज पुन्हा टीव्ही फुटतील आणि मौका-मौका कधीच येणार नाही.
सरते शेवटी निकाल काहीही लागला तरी आज रात्री सामन्यानंतर आफ्रिदी आणि फॅमिलीची आठवण मात्र नेटकऱ्याकडून 100 टक्के काढली जाईल.
पाऊस घेऊन मान्सून अजून पोहचला नसला तरी क्रिकेटचा मान्सून आला रे....
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...