Sunday, 25 March 2018

सक्सेस सिक्सर

तो आला, तो खेळला आणि त्यांना जिंकून दाखवलं. निदहास ट्रॉफीचा भारत-बांग्लादेश फायनालचे  म्हणजे फक्त आणि फक्त दिनेश कार्तिक शो. हातातून गेलेली मॅच D.K ने एकट्याच्या जोरावर जिंकून दिली. बांग्लादेशच्या तोंडचा घास अक्षरशः हिसकावून  घेऊन त्यांना नागिण डान्स ही करू न देता मोकळ्या हाताने घरी पाठवले. १२ बॉल मध्ये ३४ धावा हव्या असताना D.K मैदानात आला त्यानंतर सामना फक्त दिनेश कार्तिकसाठीच होता. ८ बॉल मध्ये २ चौकार व ३ षटकारांची आतिषबाजी करत शेवटच्या चेंडूवर छकडा मारत विजय मिळवला.
          दिनेश कार्तिक रातोरात स्टार झाला. पण D.K च्या या मॅच विनिंग खेळीसाठी त्याला तब्बल १३ वर्ष वाट बघावी लागली. कार्तिकचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण २००४ मध्ये 'द महेंद्रसिंग धोनी' च्या आधी झाले. आता तुम्ही म्हणाल महेंद्रसिंग धोनी व D.K याची तुलना कशाला? पण ही तुलना नाही हा फरक आहे यश मिळण्यातला. D.K आणि  M.S  दोघांचे सिलेक्शन 'विकेटकिपर बॅट्समन' या एकाच कॅटेगिरीसाठी झाले होते. यात सिलेक्टरची पहिला चॉईस दिनेश होता पण त्याला खेळात सातत्य टिकवता आले नाही. त्यानंतर धोनी आला. आपल्या खेळाच्या सातत्याने आपले टिम मधले व लोकांच्या मनातले स्थान पक्के केले. यशाची शिखरे भर-भर पार केली. धोनी ज्या गोष्टीला हात लावत होता त्याचे यशात रुपांतर करत होता. धोनी म्हणजे यश हे समीकरण झाले. पण यादरम्यान D.K च्या बाबतीत यश त्याला प्रत्येक वेळी हुलकावणी देत होते. दिनेशचे संघात इनकमिंग-आउटगोईग चालू होते. संघात स्थान टिकवण्यासाठी त्याला धडपड करावी लागत होती. दरम्यान तो रणजी व घरगुती सामन्यात आपला खेळ सुधारत होता. मधल्या काळात असे वाटत होते की जोपर्यंत धोनी आहे तोपर्यंत D.K साठी संघात जागा होणार नाही. पण हे वाटणे मोडीत काढत आपली गुणवत्ता सिद्ध करत धोनी असताना संघात परत आला. कित्येक वर्ष तो टीममध्ये होता पण जो मान त्याला मिळायला हवा होता तो मिळाला नाही मात्र या ८ बॉल ने त्याचे आयुष्य बदलून टाकले. या १३ वर्षात स्वतःला घडवले, वाट पाहिली आणि दाखवून दिले की "कौन कहता है, हिरा यु ही चमकता है  निखर ने के लिये उसे भी तराशना पडत है" 
           आपल्या आयुष्यात असे प्रसंग नेहमी येतात. आपण खूप कष्ट घेतो, मेहनत करतो पण यश आपल्या पदरात पडत नाही. आपण निराश होतो पण D.K च्या स्टोरीतून आपण हे शिकलो की आयुष्यात पूर्णविराम सारखे काही नसतेच असतो तो फक्त स्वल्पविराम प्रत्येक वेळी एक नवी सुरुवात आपली वाट बघत असते. गरज असते  ते आपण उठण्याची आणि सुरुवात करण्याची, आपल्यात बदल करण्याची, आणखी प्रयत्न व मेहनत करण्याची. मोठया यशासाठी संघर्षही मोठाच असतो. आणि "संघर्ष जितना बडा हो जीत उतनी ही शानदार होगी" 
          प्रयत्न, सातत्य, बदल आणि सहनशीलता हि यशाची सूत्रे आहेत. तुमचे आयुष्य बदलण्यासाठी एक क्षण पुरे मात्र  यशाचा तो षटकार मारण्यासाठी कित्येक वर्षे संघर्ष आणि प्रयत्न करावा लागतो. या अपयशाच्या  काळात स्वतःला सावरणे आणि पुन्हा लढायला उभे राहणे हे कौशल्याचे काम असते. अशावेळी आपण पुन्हा पुन्हा स्वतःला बजावले पाहिजे की "शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही.
             "एम.एस धोनी' सिनेमात एक मस्त डायलॉग आहे आयुष्य क्रिकेट मॅच सारखे असते. यात प्रत्येक बॉल वेगळा असतो कधी तो सोडावा लागतो, कधी डिफेंड करावा लागतो, कधी ड्राईव्ह करावा लागतो, कधी डक करावा लागतो तर कधी तो बॉउंडरी च्या बाहेर जातो. फक्त गरज असते ती तो योग्य बॉल येण्याची. शेवटी सबके लिये....  
"कर दिखाईये कुछ  ऐसा की
दुनिया करना चाहे आपके जैसा"
-----------------------------------------------------------
संदीप कोळी 
sandip.koli35gmail.com

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...