नमस्ते दोस्तहो,..... सध्या ना आपल्याकडे काय आणि कधी फेमस होईल हे सांगता येत नाही आता हेच बघा ना, ओ हसिना जुल्फो वाली..... आय एम अ डिस्को डान्सर.....चुरा के दिल मेरा गोरिया चली..... पापा कहते है बडा नाम करेगा...... मला काय म्हणायचे आहे ते बर्याच जणांच्या लक्षात आले असेल आणि अजून लक्षात आले नसेल तर मी 'माईम थ्रू टाईम' संकल्पनेबद्दल बोलतोय, एस 'माईम थ्रू टाईम'.....
पूर्वी आपल्याकडे खेळाचे वेड होते मग टीव्ही आला व खेळ कमी झाले. सगळे टीव्हीसमोर गालाला हात लावून बसू लागले नंतर मोबाईल आला आणि गालावर हात मोबाईलच्या स्क्रीनवर फिरू लागला. आता आपण तासनतास मोबाईलच्या संपर्कात असतो. त्यामुळे 'कधी वाटते की नेट फ्री आहे का आपण'. असो सध्या सोशल मीडिया हा आपल्या मनोरंजनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यात मनोरंजन म्हंटले की युट्युब सर्वात वर येते. वेगवेगळे व्हिडिओ, वेब सिरीज, ट्रेलर, गाणी यांच्या माध्यमातून आपण बराच वेळा तिकडे असतो. यात मराठीपणा थोडा कमी आहे. पण सध्या ती कसर भरून काढली जात आहे आणि ही भर म्हणजे 'माईम थ्रू टाईम' मराठीतला पहिला भन्नाट प्रयोग १७ लुक्स, १५ जबरदस्त गाणी, ५१ कॉस्ट्यूम्स आणि पाच मिनिटाचा व्हिडिओ.
'माईम थ्रू टाईम' ही संकल्पना तशी जुनीच पण मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतोय. आधी इंग्रजी, हिंदी, पंजाबी, मल्याळी, तेलगू अशा अनेक भाषांमधून या प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. व ते प्रचंड लोकप्रियही झाले आहेत. मराठीत हा प्रयोग 'मुखवटे ए.सी.जे.एन' या यूट्यूब चैनल आपल्यासाठी शेअर केला आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर शेअर केलेला हा विडिओ आत्तापर्यंत जवळपास दोन लाख लोकांनी पाहिला आहे. पाच मिनिटाच्या या व्हिडिओ मध्ये १५ गाण्यांचा काही भाग घेण्यात आला आहे. यामध्ये मराठीतील अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा चव्हाण, चारू देसले यांनी काम केले आहे. व्हिडिओत या१७ वेगवेगळ्या लुक्स मधे दिसतात. हे सगळे शूटिंग फक्त कार मध्ये करण्यात आली आहे ही याची खासियत.
'माईम थ्रू टाइम'कार व्हिडिओमध्ये ऐरणीच्या देवा... आश्विनी येणा... दिसला ग बाई दिसला... ऐका दाजीबा.... आता वाजले की बारा.... ही दोस्ती तुटायची नाय.... कोंबडी पळाली... डोळ्यात काजळ... नवीन पोपट हा... हृदयी वसंत फुलताना... मै जिंदगी का साथ... मस्तीची पिचकारी... जय जय महाराष्ट्र पासून ते अलीकडच्या अगदी तुझ्या रूपाच पडले चांदणं.. झिंगाट पर्यंत प्रत्येक जनरेशनमध्ये गाजलेली व प्रत्येक जनरेशनला आवडणाऱ्या गाण्यांचा एकत्रित तडका या व्हिडिओ मधून आपल्याला बघायला मिळतोय.
विडिओ हटके असल्यामुळे सध्या तो प्रचंड व्हायरल होत आहे. विशेषतः तरुणांमध्ये याची प्रचंड क्रेझ आहे. फेसबुक, व्हाट्सअप्प यावरही हा व्हिडिओ सध्या फिरत आहे. सोशल मीडिया, युट्युब वर सतत नवीन ट्रेण्डिंग शोधणाऱ्यांनी तो आधीच चेक आऊट केला असेल. तुम्ही ही अजून बघितला नसेल तर मराठीतला हा एक वेगळा आणि भन्नाट प्रयोग बघायला हरकत नाही. हा प्रयोग बघितल्यावर तो तुम्हाला नक्की आवडेल. मराठीतल्या कलाकारांचा हा प्रयत्न नक्कीच वेगळा आणि कौतुकास्पद आहे.
-----------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
Monday, 2 April 2018
माईम थ्रू टाईम' ची धमाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
nice writting
ReplyDelete