"रोज सुबह उठता हूँ,
खुद के असली चेहरे के साथ
मगर शाम होते होते हररोज
दो-चार चेहरे बदल लेता हूँ।"
खुद के असली चेहरे के साथ
मगर शाम होते होते हररोज
दो-चार चेहरे बदल लेता हूँ।"
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची हीच स्टोरी आहे. कमी-जास्त प्रमाणात आपण ही हेच आयुष्य जगतो. कधी स्वतःसाठी, कधी समोरच्यासाठी, कधी तिसऱ्याच कोणासाठी, तर कधी माहित नसलेल्यासाठीही. असे प्रत्येकासाठी आपण वेगवेगळे चेहरे घेऊन वावरत असतो व जगत असतो हे कधी आपण आपल्या इच्छेने करतो तर कधी आपल्या इच्छेविरुद्ध.....
लहान असताना आपण आपल्या चेहऱ्याशी व वागण्यात प्रामाणिक होतो पण जस-जसे वय वाढत जाईल तसे आपण नवीन चेहरे घेऊन जगायला शिकलो. त्यामुळे आपल्या मनात एक, डोक्यात दुसरे व चेहऱ्यावर तिसरेच हावभाव असतात. समोरच्याला खुश ठेवण्यासाठी व त्याला आवडेल तसे वागण्याच्या प्रयत्नात आपण आपल्या मूळच्या स्वभावाचा गळा दाबलेला असतो. मग फक्त समोरच्याला बरे वाटावे म्हणून आपण मनात नसतानाही मुखवटे घेऊन वावरतो. या वागण्यात आपण आपल्या खऱ्या चेहऱ्याला कधी सर्वांसमोर आणतच नाही. बरं समोरची व्यक्तीही आपण त्याला बरे वाटावे असे वागतो तोपर्यंत आपल्याबद्दल चांगले मत करते. आपण एकदा जरी त्याच्या अपेक्षेपेक्षा विरुद्ध वागलो की आपण त्याच्या दृष्टीने स्वार्थी ठरतो. तसेही आयुष्यात आपण आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्वांच्या अपेक्षा कधीच पूर्ण करू शकणार नाही. मग आपण हा खोटा अट्टाहास कशासाठी करतोय. आपण कितीही चेहरे घेऊन वावरलो तरी 'कही खुशी आणि काही नाराजी' राहणारच. मग आपल्या स्व ला मारून जगासाठी हे बेगडी चेहरे का वापरायचे? त्यापेक्षा कमी लोक खुश राहिले तरी चालतील पण आपला स्वतःचा मूळचा चेहरा वापरायला काय हरकत आहे.
ज्यावेळी आपण आपल्या आयुष्यात मागे वळून पाहतो त्यावेळी आपण वापरलेल्या चेहऱ्यामुळे आपण सर्वांना तर आनंदी ठेवूच शकलो नाही पण आपण स्वतःचा ही आनंद गमावून बसलो आहे
आपल्या प्रत्येकाच्या आत आपले ओरिजनल वर्जन असते. विनाकारण आपण ते अपडेट करण्याच्या नादात आपली ओरीजण्यालिटी गमावतो. त्यामूळे समोरचा खुश होईल पण आपण आपल्या आनंदावर मात्र विरजन घालतो. म्हणून 'दुनिया को मारो गोली' आपल्याला वाटते ते जगूया व आपल्या 'स्व' ला जपुया.
✍ संदीप कोळी.....
9730410154
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment