ती....
ती ची आणि माझी सोबत
कधीची हे आठवत नाही.
पण ती आणि मी वेगळे
आहोत हे मात्र जाणवत नाही.
सकाळ असो वा दुपार
संध्या असो वा असो निशा
ती आणि मी, आमची
सोबत मात्र अहोरात्र
कधी पुढे कधी पाठी
कधी उजव्या कधी डाव्या
बाजू बदलली जरी
ती बदलत नाही
असणे ती चे नजरेत भरणारे
कधी फक्त जाणीव करणारे
पण ती असते नेहमी सोबत
प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी
संकटात साथ सोडली नाही
सुखात ती मिरवली नाही
पण साऱ्यांनी टाकले जरी
ती ने साथ सोडली नाही
असते ती नेहमी सोबत
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी
ती आणि फक्त माझी ती
सावली...माझी सावली
🖊️निशदीप....
📱9730410154
No comments:
Post a Comment