"किताबे झाँँकती है बंद अलमारी की शिशे से
मोबाईल की इस लत में एक झलक के लिये बेकरार है।"
ज्यांनी विचार व आचार समृद्ध केले, आयुष्याला ज्ञानाचा मार्ग दाखवला अशा पुस्तकांसाठी. अज्ञानाच्या अंधारात माहितीची ज्योत तेवत ठेवून ज्ञानाचा उजेड पडणारी पुस्तकेे, माणसाला पशु तून वेगळे करून वैचारिक पातळीवर उच्च बनवणारी पुस्तके, झेप घेणाऱ्या प्रत्येक पंखांना ज्ञानाच बळ देणारी पुस्तके, रंगहीन वाटणाऱ्या जीवनात सप्तरंगी उधळण करणारी पुस्तके, जगण्याच्या दुनियादारीत वाचणाऱ्याला शहाणे बनवणारी पुस्तके, काळाचा विशाल सागरातून घेऊन जाणारी जहाजे म्हणजे पुस्तके, आदर्श वाटणाऱ्या दुनियेत सच्ची मैत्री जपणारी पुस्तके, कोणत्याही अपेक्षेशिवाय ज्ञानाचा झरा अखंड खळखळणारी पुस्तके, सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला विचारांच्या व माहितीच्या लेण्यांणी वृद्धिंगत करणारी पुस्तके, कितीही कठीण प्रसंगात स्वतःवरचा विश्वास ढळू न देणारी पुस्तके, लहानांपासून-वृद्धापर्यंत सर्वांना आपल्या प्रेमात पडणारी पुस्तके, तुमच्यातील एकलव्याला धनुर्धारी एकलव्य बनवणारी पुस्तके, निर्जीव अक्षरांच्या माध्यमातून व्यक्तीच्या विचारांना सजीव करणारी पुस्तके, माणूस नावाच्या लोखंडाला आपल्या परिसस्पर्शाने सुवर्णमय बनवणारी पुस्तके......
आज 23 एप्रिल जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिनही म्हणजेच जागतिक पुस्तक दिन..
मोबाइलच्या जमान्यात कपाटात ठेवलेल्या पुस्तकावरील प्रेम थोडं कमी झालं असलं तरी वाचन हा आपल्यापैकी अनेकांचा आवडता छंद आहे. इ-बुक, Pdf, ब्लॉग्स, मेसेज या ना-त्या रुपाने आपलं वाचन सुरू असते.
कोरोनाच्या या संकटात, लॉक-डाउनच्या या संधीचा फायदा उठवत पुन्हा एकदा आपण पुस्तकाच्या प्रेमात पडून पुस्तकांवर आपला हक्क दाखवला पाहिजे. ज्ञानाच्या महायज्ञात वाचन हाच धर्म आहे. हीच पुस्तके आपल्या जीवनाचा भाग असावीत आणि वाचन हा दिनचर्येचा भाग याच शुभेच्छा....
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा......
©संदिप
📱9730410154
वाचाल तर वाचाल 👌👍👍
ReplyDeleteजबरदस्त लेखन
DeleteThank you
Delete