सगळं ‘मी’ च करायला हवे
एक दिवस उजाडतो. आपल्या समोर
कामाचा डोंगर अचानक उभा राहतो. हे काम करू, का ते काम करू का ते करू, सगळा गोंधळ
उडतो. क्रम ठरवायला गेलो तर सर्वच कामे
महत्वाची वाटू लागतात. मग कोणते काम प्राधान्याने करायचे व कोणते नंतर करायचे हेच
लवकर ठरत नाही.
मनाचा
गोंधळ उडतो. धावपळ व्हायला लागते. हे करू कि ते करू यात कोणतेच काम धड्से होत
नाही. प्रथम कोणते काम करायचे हे ठरवायला
व आपले काम तर ठरतच नाही व आपले काम न
ठरता आपला बराच वेळ फक्त ठरवण्यात जातोय हेच समजायला बराच वेळ जातो.
तसे
बघायला गेले तर हा सर्व पसारा व कामाचा डोंगर आपणच उभा केलेला असतो. फक्त
त्या-त्या वेळी आपल्या कामाचा योग्य पाठपुरावा करून काम पूर्ण न केल्यामुळे ती
कामे आपल्या पुढे ब्रह्म म्हणून अचानक उभी राहतात आणि मग आपल्याला त्याचा त्रास
होतो.
मुळातच प्रत्येक गोष्ट आपल्या साठीच आहे , प्रत्येक
वेळी ती आपणच करायला हवी व आपल्यालाच मिळायला पाहिजे. कदाचित या सर्वाचा एकत्रित
परिणामातून अनेक प्रश्न निर्माण होत असतील. बहुतेक वेळा आपल्या अतिमहत्वकांक्षेचा हा
त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो व आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.
आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला
हवी. निसर्गाचा एक अंतिम नियम आहे. आपण नव्हतो त्यावेळीही जगाच्या सर्व क्रिया
सुरळीत सुरु होत्या, सध्या आपण काहीही
केले नाही तरीहि हे सर्व सुरळीत असणार आहे व उद्या आपण नसल्यावरही हे सुरूच राहणार
आहे.
फक्त आपला एक मोठा गैरसमज आहे कि “सगळं
मी च करायला हवे.”
कदाचित हाच आपल्या समोरील
प्रश्न व हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकेल!!!
संदिप कोळी
Right
ReplyDelete