गुरुपौर्णिमा
आदरणीय गुरुवर्य...
गुरु, कोणाला म्हणणार आपण गुरु? आपलं जगणं घडवणारा.....पावलांना बळ देणारा, कठीण वाटेवर मुद्दाम नेऊन सोडणारा...... पण गुरु म्हणजे आधाराची कुबड़ी नव्हे, हात पसरुन मदत मागत बसण्याची जागा नव्हे......तो जगायला शिकवतो, तो लढ़ायला शिकवतो.....त्यांनी पाठीवर हात ठेऊन नुसतं म्हंटल तरी अंगात दहा हत्तीच् बळ येतं.......आणि मनाच्या गाभाऱ्यात चैतन्याचा संचार होऊन प्रेरणाना उधान येत......
गुरु कोठे भेटावा...... आपल्याच
माणसात... आपल्याच सभोवती....
दोन देशात युद्धाची तयारी सुरु असते.समोरच्या देशातील सैनिकाची युद्धाची
तयारी बघुन सैनिक आपल्या सेनापतीला विनंती करतात की आपण नाही जिंकू शकणार त्याच्या
विरोधात. सेनापती नाईलाजाने आपले मत राजा समोर मांडतो. राजा विचारात पडतो. अशा पेच प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी राजा आपल्या गुरुचे
मार्गदर्शन घेतात. गुरुआज्ञेप्रमाणे राजा आपल्या सर्व सैनिकाना घेऊन गुरुकड़े
जातात. गुरु सर्व सैनिकांकडे बाघतात व सर्वाना उद्देशून सांगतात की आपल्या अडचणी
मला माहित आहेत फ़क्त आपण एकदा देवाचा कौल घेऊया मग आपण लढाई करायची की नाही ते
ठरवू. देऊळात थोडा वेळ घालवून गुरु बाहेर येतात व सांगतात की कौल आपल्या बाजूने
आहे. आपणच जिकणाऱ.......सैनिक जोमने लढतात व बलाढ्य शत्रुची दाणादाण उडवतात.
जिंकल्यावर राजा गुरुला भेटायला जातो व विजयाचे गुपित विचारतो. या वर गुरु स्मित
हास्य करुण म्हणतात की मला तरी कुठे माहित होत मी फ़क्त प्रेरणा दिली त्याचा
आत्मविश्वास वाढवला. लढाई तर तुम्हीच जिंकली तुमच्या कर्तुत्वावर.......
आपण
ही माझ्या आयुष्यात असेच आलात. आपली भेटही अशाच एका वळणावर झाली. आपण मला वाट
दाखवली. विचारांची पद्धति शिकवलीत. आपण मला प्रश्नाच्या गर्दीत सोडलतं. उत्तरे माहित
असूनही ती मला शोधायला लावलीत. विचाराच्या विशाल जगात आपण मला स्वतंत्र पायवाट
शोधायला शिकवलीत. प्रसंगी आधार दिलात व जबाबदारीही. ठेच लागून पडलो तर आधारही आपणच
दिलात व पुन्हा उठून मार्ग चालण्याचे बळ ही आपणच दिलेत. वाटेत अडचणी आहेत, धोके आहेत म्हणून मागे न फिरता धेय्या पर्यंत चालायचे हे ही आपणच शिकवलत.
स्वतःचे निर्णय स्वतः घेऊन स्वताच्या मनासारखे जगायला आपण शिकवलत. कष्ट करूनही
आनंदात जगायला आपण शिकवलत.
जग बदलले, काळ बदलला, वेळ बदलली तरी आपले मोल कमी होणार नाही.
कोणतेही यश एकट्याच नसतं. आयुष्यात प्रत्येक वळणावर भेटणाऱ्याकडून काही ना काही
चांगल घ्यावे हे आपण शिकवलंत.
म्हणून
गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी आपल्या ऋणात राहून आपल्यविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सुवर्णयोग........
आपल्याला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.....
-------------------------------------------------------------------------------------------------------
संदिप....
9730410154
sandipkoli35@gmail.com
छानच संदिप
ReplyDeletethank you
Deleteखूप छान बोधपर कथा....👌
ReplyDelete