Wednesday, 22 July 2020

अडचणी Problems (कविता)


अडचणी

अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला
उष:कालाला घरटे सोडणाऱ्या पाखराला
परतीची खात्री असतेच असे नाही
धरती रुजणाऱ्या बियाणाला
अंकुरण्याची संधी मिळतेच असे नाही

धो-धो कोसळणाऱ्या पावसाला
उमलणारी कळी दाद देत नाही
स्वच्छंदी बागडणारे फुलपाखरू
अथांग नभाला घाबरत नाही
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला

पंख थकले गरुडाचे म्हणून
उड्डाणाची स्वप्न थकत नाहीत
सावज झाले शिकार म्हणून
जगण्याची इच्छा मरत नाही
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला

एक कोंब खुडला म्हणून
झाड बहरायचे थांबत नाही
दोन वर्ष नदी आटली
म्हणून वाहायचे विसरत नाही
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला

आयुष्याच्या या खेळात प्रत्येकजण
जीव तोडून लढत आहे
तूच मानवा फक्त आपल्या
अडचणी सांगून रडत आहेस
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला

रडणं सोड आणि लढणं शिक
प्रयत्नांना यशाची जोड ठरलेली आहे
अडचणी नसतात कोणाला?
जगण्याच्या प्रवासात प्रत्येकजण
सिद्ध करतो स्वतःला
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
निशदिप 
Sandip.koli35@gmail.com


33 comments:

  1. खूप छान

    ReplyDelete
  2. जमतंय की....भारी👍👌💐




    ReplyDelete
  3. खूपच सुंदर 👌👌👌👍👍

    ReplyDelete
  4. Good poem

    ReplyDelete
  5. अप्रतिम sir

    ReplyDelete
  6. खुप छान कविता लिहिली आहे..जीवन जगण्यातील तत्वज्ञान अगदी शांततेन समजावून सांगणारी उत्कट,उत्कृष्ट कविता।
    उत्तम अस सादरीकरण👌😊..

    ReplyDelete

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...