देवालाही आधार नसतो.......
( एक बोलके छायाचित्र)
हे ऐकायला थोड विचित्र वाटतय ना की जो सर्वांचा निर्माता आहे. सर्व सृष्टिवर ज्याचे वर्चस्व आहे. असे आपण मानतो त्या देवालाच आधार नाही.
माणसाच्या बाबतीत ही गोष्ट बर्याचदा घडते. वृद्धापकाळात वयस्कर आपल्या माणसांची आम्हा सुशिक्षितांना अड़चन व्हायला लागते . ज्यानी लहानपना पासून एक रुपयाच्या चॉकलेट पासून ते गाड़ी ,घर यापर्यंत हौस पुरवली त्याच्यासाठी 100 रुपयांच्या गोळ्या घेणे आपल्याला कटकटीच वाटू लागते. आपला सगला हट्ट पुरवनार्याची त्याच्याच घरात आपल्याला त्यांची अड़चन वाटू लागते.
पण देवाचीही....... हो कदाचित वरचे छायाचित्र तेच सांगत असावे म्हणजे देवालाही वय असते. व ते वय झाल्यावर घरात त्याच्यासाठी ही जागा राहत नाही व शेवटी अशा एखाद्या झाडाच्या मुळाशी त्यांना आणून ठेवले जाते . घरात देवाला घेउन येताना अगदी मनोभावे आपण आणतो. पूजा अर्चा करतो व कालांतराने फोटो जुना झाल्यावर असे होते.
पण खरच देव जुना होतो??? खरच देवालाही आधार नसतो???
संदीप......
Saturday, 27 May 2017
देवालाही आधार नसतो.......
Friday, 26 May 2017
आम्ही नियम पाळत नाही.....
📝 अमास्नी कि नाय नियम-बियम पाळायला अजिबात आवडत नसतय. मुळात असल्या फालतू गोष्टी आंम्ही पळतच नाहय....
आम्ही सडकवरच्या सिग्नला जरी उभ असलो तरी झेब्रा क्रोसिंग च्या पुढं किमान पाच फूट तरी आमची गाडी असतीया आण ते सिग्नल चा दिवा हिरवा व्हायच्या 5-6 सेकंड राहिल्यावरच आम्ही गाडी घेऊन भुंगाट जातोय.
आता ह्यो 5-6 सेकंड चा येळ वाचवुन आम्ही कुठला जिल्ह्यातला वर्ल्ड फेमस प्रश्न सोडवतोय हे आम्हाणी विचारायचं नाय. ते फकस्त आमच्या देवालाच ठाव.
आण बाकी नियम-बियम पाळून-बिळून कुठं देश महासत्ता हुतुय व्हय. सब झूठ, सगळ्या अंधश्रद्धा कुठच्या.....
जय हो....
संदीप....
आम्हाला स्वच्छता आवडत नाही......
📝 पहिल्यापासन आम्हास्नी ना एस.टी, गाडी च्या खिडकीतन चिप्स खाऊन झालेला कागद, केळाचं साल, भडांगाचं रिकामं कागद, पेप्सीबीचं कागद बाहेर फेकायची भारी हौस. मग ते कुटं घाटात असणा नाहीतर शरात असणा. तेच्या बी पेक्षा भारी टॅलेंट आमच्यात हाय अनं ते म्हंजी आम्ही भर रस्त्यात चालत्या कार गाडीचा दरवाजा हळूच उघडून पिचकारी मारायचं. तसं बी असलं भयानक टॅलेंट जगाच्या पाठीवर फकस्त आमच्यातच. उगच नाही भारत टॅलेंटची खाण.
जिन्यातन उतरताना कोपऱ्यातली पिचकारी, नाट्यघर, सिनेमाची टाकीत बसायच्या सीट खाली केलेली घाण, एस.टी, रेल्वे सगळीकडे आम्ही असल्या लई करामती केल्याती. अ हं अन ते भी कुणाला भिऊन नाय तर दाबात.....
अन अशीच आमची परगती राहिली तर आपल्या परधान सेवकांच्या स्वप्नां परमानं ते स्वच्छ भारत अभियान का काय ते 2019 काय आम्ही ठरवलं तर अजून बरीच साल हून बी देणार नाय.
तसा आमचा या स्वच्छ भारत ला इरोध नाय हाय पण काय पण झालं तरी आम्ही आमचं टॅलेंट बी वेस्ट जाऊ देणार नाय.....
जय हो.....
🖋 संदीप.....
इंटरटेन्मेंटचा धमाका
दोस्तहो नमस्ते.....
बाहुबली 2 दुसऱ्यांदा बघितला ना, अहो 100 टक्के बघितलाच असणार. "देवसेना को किसी ने हात लगाया तो समझो बाहुबली कि तलवार को हाथ लगाया", "औरत पर हाथ डालनेवाले की उंगलियाँ नही काटते, काटते है उसका गला" हे बाहुबलीचे आणि "जय भवानी " हा कटप्पा चा डायलॉग, बाहुबली आणि देवसेनाची एन्ट्री, सेतूपती चा गळा कापलेला फुल्ल पैसे वसूल सीन यासाठी नक्कीच दुसऱ्या वेळेला बघितला असणार आणि पुन्हा पुन्हा बघण्यासारखे असे अनेक प्रसंग नक्कीच आहेत. माझं तर फेवरेट "माहिष्मतीचे राष्ट्रगीत" लयचं भारी आणि भारदस्त . त्यामुळे आम्ही पण गँग सह पुन्हा एकदा जय माहिष्मती केलेच.
शिवाय सोशल मीडियावर म्हणजे व्हाट्सअँप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर बाहुबली 2 चे काही सीन चे कट विडिओ पण व्हायरल झालेत त्याला पण जोरात पसंती आहे. आमचा दोस्त 'विक्या' म्हणतोय त्याच्या लांबच्या दोस्ताकडे म्हणे लॅपटॉप वर बाहुबलीची 2 ची कॉपी आहे. आता हे खरं की अफवा हे विक्या आणि त्याच्या लांबच्या दोस्तालाच माहित. तोपर्यंत आणखी एक वायर आली आहे ती म्हणजे बाहुबली 3 पण येणार आहे म्हणे. म्हणजे पुन्हा एकदा wait , watch आणि धमाका
शुक्रवारी चेतन भगत च्या 'हाफ गर्लफ्रेंड' या कादंबरीवर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' याच नावाचा सिनेमा आला आहे. चेतन भगत आणि श्रद्धा कपूर याचा डाय-हार्ट फॅन 'सम्या' च्या कृपेमुळे मला आणि 'परश्या' ला हा पिक्चर बघायला मिळाला. प्रत्येकाच्या कॉलेज जीवनात असते तशीच अगदी जवळची माधव आणि रिया ची स्टोरी. खेड्यातला साधा-सुधा नायक आणि शहरातली मॉडर्न नायिका यांच्यातली प्रेमकथा. दोघांचे मस्त कॉलेज लाईफ नंतर प्रेम आणि मग तक्रार..ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांना स्टोरी आधीच कळते. बाकी यातला एक डायलॉग भारी आहे "हार मत मानो हार को हराना सिखो".याची मैं फिर भी तुझको चाहूंगा'आणि 'तू थोडी देर और ठहर जा' 'बारीश' ही गाणी आधीच चांगलीच वाजतायत. बाहेर येताना हि गाणी आपण गुणगुणतो.
या सगळ्याच्या नादात IPL कडे थोडं दुर्लक्ष झाले. तशा सगळ्या मॅचेस बघितल्या पण चर्चा जरा थांबलीच. IPL आता रोमांचक मोड वर आले आहे. एक टीम पुणे धोनी भाऊंच्या तडाख्यामुळे पहिल्यांदाच फायनल ला आली आहे .तसं धोनी भाऊंनी CSK चे कॅप्टन असताना 6 वेळा आपली टीम फायनल ला आणली होती त्याचा फायदा पुणे घेणारच. शिवाय रोहित दादांनी पण आपली मुंबई इंडियन्स 3 ऱ्यादा फायनल ला आणली आहे. त्यामुळे 'काटे कि टक्कर होणार ने निश्चित'. हे म्हणजे आपल्याच घरात दोन गट पडल्यासारखे आहे.आमच्यातपण कुणाला सपोर्ट यावरून 2 भाग झालेत. Geo ची जाण म्हणून तरी मुंबई इंडियन्स ला पाठिंबा देणारा पण गट आहे. असो कोणीही जिंकले तरी कप आपल्याकडेच राहणार.आता बघू 'आज कौन किस पे भारी पडता है।' आणि कोण कप उचलतो IPL-10 चा.....
या आठवड्यात सचिन तेंडुलकरचा 'सचिन अ बिलियन ड्रीमस्' हा ही सिनेमा येतोय त्यामुळे एंटरटेनमेंट ची ट्रीट चालूच राहणार.
Sunday, 14 May 2017
जस्टीन चा जलवा
रंग तरुणाईचा-जस्टीन बीबर
हाय फ्रेंड्स.....
काय मग सुट्टी मजेत ना ! फुल्ल एन्जॉय ! सुट्टी म्हंटले कि खाणे-पिणे, फिरणे, पोहणे, टी.व्ही बघणे यासारखी सगळी निवांतच कामे....फुल्ल टू मस्ती.....
दोन -तीन दिवसाच्या उन्हाळी पावसाच्या तडाख्याच्या विश्रांती नंतर आमचा कट्टा पुन्हा जमला. आता गँग जमली म्हंटल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा आल्याचं त्यात बाहुबली, IPL हे हॉट फेव्हरेट विषय आहेतच की...गप्पा रंगात आल्या होत्या तोच 'परश्या' 'व्हेअर आर यू नाऊ' गुणगुणत आला. आता आपल्या सिनसिअर 'पव्या' ला परत प्रश्न "हा कोणतं गाणं म्हणतोय रे?" "अरे ते 'जस्टीन बीबर' चे फेमस गाणं आहे." ग्रुप अडमीन 'सच्या' बोलला. आता जस्टीन बीबर कोण? हा भला मोठा प्रश्न 'पव्या' च्या चेहऱ्यावर साफ दिसत होता.
प्रत्येक ग्रुप मध्ये असतो तसा आमच्याही ग्रुप मध्ये पूर्ण पणे पाश्चात्य संस्कृती अंगीकारलेला थोडक्यात इंग्रजाळलेला 'परशा'. नेहमी परदेशी संगीत, गाणी ऐकणारा, त्याच्या फोन मध्ये हिंदी पेक्षा इंग्रजी गाण्याचा भरणा जास्त.
आणि त्यात 'जस्टीन बीबर' भारतात येतोय म्हंटल्यावर परशाच्या आनंदाला उधाण आलंय. गेली 8-10 दिवस दररोज जस्टीनचा DP आणि स्टेटस.
आणि असणारच कि कारण पण तसेच आहे ना...
संपूर्ण जगाचा लाडका कॅनडियन पॉपस्टार 'जस्टीन बीबर' पहिल्यांदा लाइव्ह कॉन्सर्टसाठी भारतात आणि आपल्या मुंबईत आला होता.
बॉलिवूड कलाकारही जिथे जस्टीन चे चाहते आहेत तिथे तरुणाईची काय कथा! याआधीही त्या त्या काळात ते ते आंतरराष्ट्रीय गायक इथे आले. त्यांनी कार्यक्रम केले आणि त्यांनी जिंकले. अगदी मायकल जॅक्सन पासून रिकी मार्टिन, शकिरा ते कोल्डप्ले पर्यंत आणि आता बीबर.....
23 वर्षीय जस्टीनकडे सगळं आहे. रंगरूप आहे, प्रसिद्धी आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचे जे तरुणांना आकर्षित करतो तो त्याचा अँटीट्युड. त्याचे बोलणे, त्याचे गाणे, त्याचे चालणे, इतकंच काय तो गप्प बसलेला असतो तरी त्याच्यावरून नजर हटत नाही. रंगरूपापलीकडे त्याचे डोळे बोलतात. त्याच्या चेहऱ्यावरचा गो गेटर अँटीट्युड आणि नजरेतली धमक अख्या तरुणाईला घायाळ करते.
जस्टीनच्या गाण्याची जादू आपल्याकडच्या तरुणाईवर आहेच. 'यू नो यू लव्ह मी , बेबी, व्हेअर आर यू नाऊ, सॉरी, व्हॉट डु यू मीन, कंपनी ही त्याची प्रसिद्ध गाणी आपल्याही मोबाईल मध्ये सापडतात. पूर्वी मायकल जॅक्सन ची असायची अगदी तशीच. या संगीत प्रकाराचे जगभरात लाखो चाहते आहेत. तसे भारतात हि आहेत. गाण्यातले शब्द कळो न कळो पण त्याच्या चालीवर मात्र डुलायला होते. अर्थात बॉलिवूड संगीताच्या प्रेमात बुडालेल्याना कदाचित आवडणार नाही पण पॉप चा एक स्वतंत्र चाहता वर्ग नक्की आहे.
जस्टीन बीबर ची चर्चा तर गेली कित्येक दिवस सोशल मीडियावर आहे. त्याच्या कॉन्सर्ट, त्यांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या, त्यांची व्यवस्था, त्याची सिक्युरिटी आणि एखाद्या राजापेक्षाही वरचढ थाटाची. मुंबई च्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर त्याचा 10 मे ला कार्यक्रम झाला. आणि लोक जस्टीन चे दिवाने का आहेत हे त्याने दाखवून दिले. त्याची एन्ट्री, त्याच गाणं, त्याचा स्टेजवरचा वावर सगळं लाजवाब होता. आपल्या गाण्याने त्याने संपूर्ण तरुणाईला थिरकायला लावले हे मात्र नक्की.
कार्यक्रमाच्या शेवटी 'मी पुन्हा येईन म्हणून" JB चा चाहत्यांना नमस्ते आणि धन्यवाद....
Saturday, 29 April 2017
फक्त बाहुबली
बाहुबली, बाहुबली, आणि फक्त बाहुबली. आठ दिवस झाले परीक्षा संपून. परीक्षा सपंल्याचा आनंद, त्यात IPL ची ट्रीट, सुट्टीचे प्लॅंनिंग या सगळ्या गोष्टी असताना गेल्या काही दिवस एक गोष्ट सर्वांच्या डोक्यावर चढून बसलीय आणि ती म्हणजे बाहुबली 2. जनरली कुठल्याही गोष्टीसाठी पेशन्स न ठेवणारी आमची पिढी बाहुबली 2 साठी मात्र जीव तोडून वाट बघतेय.कारण पण तसंच आहे ना पहिल्या बाहुबली ने वेड लावले .त्याचाच हा इफेक्ट कि सिक्वेल ची इतक्या उत्कटतेने वाट बघितली जातीय. सध्या सगळीकडे बाहुबली 2 च्या चर्चेचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या सुट्टी असल्याने आणि बाहेर जरा जास्तच ऊन असल्याने चर्चेचे सगळे अड्डे व्हाट्सअँप आणि फेसबुक वर जमतात. त्यात आमच्या ग्रुप ने 'विक्याच्या' कौशल्याच्या जोरावर बाहुबली 2 ची तिकिटे मिळवली त्यामुळे ग्रुप मध्ये आमचा वट जरा जास्तच वाढलाय. आमचा अडमीन तर दररोज न चुकता ग्रुप वर online booking success चा मेसेज टाकून बाकीच्यांना जळवत होता. फेसबुक वर टॅग वॉर करून तिकीट न मिळाल्याची खेचायची चालली होती. आणि फेक स्टोरी चा तर इतका सुळसुळाट झालंय कि आमचा 'सम्या' तर दररोज एक खरी स्टोरी म्हणून बोगस कहाण्याचा सपाटा लावलाय.
तिकीट मिळवण्याची ओढ प्रचंड आहे. पहिले शो हाऊसफुल्ल झाल्यानंतर किमान आठवड्यात तरी बुकिंग मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. एरवी "हम जहाँ खडे होते लाईन वहा से शुरू होती है " म्हणणारी गँग सकाळपासून तिकिटांच्या खिडकी बाहेर गपचूप नंबरची वाट बघत उभी होती.
पण भावांनो इंतजार कि घडिया खत्म 28 ला शुक्रवारी साडेतीन मुहुर्तापैकी एक अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर आमच्या ग्रुप ने पहिल्या दिवशी तिकिटांच्या इतक्या दुष्काळात पण "बाहुबली 2" पहिलाच....
कट्टापाने बाहुबलीला का मारले ? या एका प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून आमच्या सारखे कट्टर चाहते दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा थिएटर मध्ये हा सिनेमा पाहतात त्यावेळी " आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो चार, पाच डोळे अशी आमची अवस्था झाली. एखाद्या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल पहिल्या भागाइतकाच दमदार, क्लास आणि खणखणीत असल्याची उदाहरणे आपल्याकडे फारशी बघायला मिळत नाहीत पण बाहुबली 2 मात्र या सगळ्याला अपवाद ठरला आहे.
कटप्पाने बाहुबली ला का मारले असेल असे कोडे सगळ्या जगाला घालून डायरेक्टर राजमौली नी बाहुबली- द बिगिनींग संपवला होता. त्यावरून बाहुबली- द कनक्लुजन या सगळ्याची उत्तर देणार हे सहाजिक होते. बाहुबली 2 हा बाहुबली 1 चा पुढचा भाग असला तरी याची बहुतेक स्टोरी मागच्या काळातील आहे. बहुबलीचे वडील अमरेंद्र बाहुबली , माहिष्मती चे होणारे घोषित राजे असतात, अमरेंद्र व देवसेना( अनुष्का शेट्टी) याची प्रेमकहाणी फुलवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात होणारे अंतर्गत राजकारण, भल्लालदेव यांची राजसिंहासनाची महत्वकांक्षा आणि त्यातून घडणारे डावपेची राजकारण अशी सारांश स्टोरी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण ज्या प्रश्नासाठी गेलो होतो त्याचंही उत्तर मिळते.
बाहुबली 2 म्हणजे फुल्ल पैसे वसूल सिनेमा. बाहुबली (प्रभास) ची एन्ट्री काटा किर्रर्र.. थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्टयाच.. सिनेमात CGI आणि VFX तंत्रज्ञानाचा वापर अफलातून झालाय. सिनेमातील काही सिन बघताना नकळतच आपल्या तोंडातून ' वा क्या बात है।' हे शब्द सहज निघतात. जे पडद्यावर घडतंय ते इतके भव्य व अफलातून आहे हे पाहून आपण थक्क होतो. मनोरंजनासाठी लागणारे सर्व कन्टेन्ट यात आहेत एक राजा, एक राणी, त्याची प्रेमकहाणी, राजसिंहासनासाठीचे राजकारण, यात होणारे जनतेचे हाल, डोळे दिपवणारे सेट्स, प्रत्येक कलाकाराचा बेस्ट परफॉर्मन्स, खिळवून ठेवणारे सीन्स, जाणदार डायलॉग आणि ज्याची आपण कल्पना करू शकणार नाही असे प्रसंग, सगळं काही larger than life आहे. 'राजामौली जब देता है तो छप्पर फाडके देता है ' हि फीलिंग सिनेमागृहातून बाहेर पडताना नक्की येते.
पहिल्या सिनेमाच्या गारुडाखाली आम्ही हा सिनेमा पाहिला पण बाहेर पडताना या सिनेमाच वेगळंच वलय घेऊन बाहेर पडतो. आणि पुन्हा एकदा सिनेमा बघायचा हे बाहेर पडायच्या आधीच ठरलय.
शेवटी बाहुबली 2- द कनक्लुजन च वर्णन इतकंच कि तो आला... आम्ही पहिला....आणि त्यानं जिंकलं....
जय माहिष्मती....
माझा लेख फिल्मी गॉसिपिंग दैनिक पुढारी मध्ये प्रकाशित....
हुश्श्श.... संपली एकदाची exam.... एखाद्या लढाई वरून परत आल्याची फीलिंग नक्की येते. सर्वांचे नाही म्हणत पण आमच्यासारख्या काही जणांना परीक्षेचा कालावधी हा आणीबाणीपेक्षा कमी नसतो आणि परीक्षा संपल्यावर आनंद हा निकालात डिस्टिकशन मिळाल्याच्या आनंदापेक्षा मोठा असतो. तसं बघायला गेलं तर निकालाची काळजी हा नंतरचा विषय. Result को मारो गोली... आता its calls for celebration. मजा, मस्ती आणि दंगा......
या सेलेब्रेशन ची सुरुवात पण धडाक्यात होतेय. बाहुबली 2 The conclusion. गेली वर्षभर आपण ज्याची वाट बघत होतो. अमेरिकेचा प्रेसिडेंट कोण होतो? या पेक्षा कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नांची उत्सुकता जास्त होती. Finally त्याचं उत्तर 28 एप्रिल मिळतेय. म्हणजे अगदी 5 दिवसात. Online booking सुरु ही झालंय. आमच्या ग्रुपच्या IT हेड 'विक्याने' तिकीटपण बुक केली. ट्रेलरचा धुमाकूळ आपण पाहिलायच त्यावरून सिनेमा कसा असणार याचा परफेक्ट अंदाज आपल्याला आहेच. भारी ऍक्शन, भारी लोकेशन, वर्ल्ड क्लास टेकनॉलॉजीं, अँकटिंग, म्युजीक या सर्वच आघाड्यावर बाहुबली 2 हिट ठरेल असा विश्वास आहे. पण भारतात कधी नव्हे ते पाहिल्यांदा एखाद्या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट एवढ्या आतुरतेने पहिली गेली आहे. बाहुबलीचा सिक्वेल येणार हे पहिला भाग बघितल्यावरच कळले होते पण तरीही त्याची उत्सुकता इतक्या दिवस ताणून धरण्यात टीम बाहुबली यशस्वी ठरली . आणि ते कसे यशस्वी होतात हे कळेलच 28 एप्रिल ला पण आपला तर फुल्ल सपोर्ट आहे बाहुबली 2 ला.
Exam संपल्याच्या आनंदाप्रित्यर्थ आमच्या गँगची नेहमीची TTMM ची नास्ता पार्टी. सगळ्यांनी ऑर्डर देऊन झाल्यावर 'सम्या' शेवटी आला.गडबडीत बसत त्याने ऑर्डर दिली "हाफ पावभाजी" वेटर पाण्याचा ग्लास ठेवत एकदम आश्चर्याच्या नजरेने म्हणाला "हाफ पावभाजी नसते रे" सम्या म्हणतोय " काय जमाना आहे इथं 'हाफ गर्लफ्रेंड' मिळते आणि हाफ पावभाजी नाही. चेतन भगतच्या गाजलेल्या बऱ्याच पुस्तकावर चित्रपट निघाले. त्यातलेच एक पुस्तक 'हाफ गर्लफ्रेंड' या पुस्तकावर याच नावाचा सिनेमा 19 मे ला येतोय. ज्यांनी पुस्तक पूर्ण वाचले असेल त्यांना कहाणी समजली असेल. पण 'दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम' हि सेंट्रल आयडिया. तशी हि कन्सेप्ट आपल्या पचनी पडायला थोडी अवघड आहे पण बघू काय इंटरेस्टिंग आहे ते. अर्जुन आणि श्रद्धा कपूर यांच्या या सिनेमाच्या ट्रेलर ची चर्चा तर आहेच.
चर्चा तर आणखी एका ट्रेलरची पण आहे. 'सचिन द बिलियन ड्रीमस' ज्यांना बघून क्रिकेटची पिढी मोठी झाली. जो आउट झाल्यावर TV सेट्स बंद करून मैच हारली असे घोषित केले जायचे. क्रिकेट विश्वातील बॅटिंगचे almost सगळे रेकॉर्ड नावावर करून राज्य करणाऱ्या The legend 'सचिन रमेश तेंडुलकर' या सिनेमाच्या. 26 मे ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या ट्रेलरने पण धमाल माजवलीय.
काही पण म्हणा यावर्षी सुट्टीच्या आनंदाला एंटरटेनमेंट ची लॉटरी लागलीय हे मात्र नक्की.....
🎭मुखवटे...
नवरात्री व दसऱ्याच्या निमित्ताने सर्व परिसर गलबलून गेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या सणाच्या निमित्ताने आपल्या भक्तीचा ठसा देवाच्या मा...
-
गुरुपौर्णिमा आदरणीय गुरुवर्य ..... . गुरु , कोणाला म्हणणार आपण गुरु ? आपलं जगणं घडवणारा.....पावलांना बळ देणार...
-
नवरात्री व दसऱ्याच्या निमित्ताने सर्व परिसर गलबलून गेला आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने या सणाच्या निमित्ताने आपल्या भक्तीचा ठसा देवाच्या मा...
-
फ्रेंडशिप डे.... " रफ्तार कुछ जिंदगी की यू बनाये रखी हैहमने..कि दुश्मन भले आगे निकल जाए पर दोस्त कोई पिछे ना छुटेगा...