Saturday, 28 March 2015

मोबाईल वर घेतलेले छायाचित्र .............

 मोबाईल वर घेतलेले छायाचित्र ............... ( झाडे लावा झाडे वाचवा  )

दृष्टीकोन............

दृष्टीकोन............                          
                           प्रत्येकाचा जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगला असतो. आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे आपण वेगवेगळ्या नजरेने पाहतो. म्हनुनच तर कोणाला ग्लास अर्धा भरलेला दिसतो तर कोणाला अर्धा रिकामा .                
                            असो पण प्रत्येक गोष्टी नकारार्थी रहन्यापेक्षा  त्यातून चांगले काहीतरी शोधले पाहिजे हेच सांगणारा हा एक सुन्दर प्रसंग...........                                  
                            सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धाने ......एका लहानग्याला किनार्यावर काहीतरी उचलून समुद्रात फ़ेकताना पाहिलआश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता..न राहावून त्यानं लहानग्याला विचारलं,"समुद्रकिनारी इतके हजारो मासे आहेत,तु कुणा कुणाला वाचवू शकणार आहेस ??..मुठभर मासे वाचवून जगाला असा काय फ़रक पडणार आहे?.
                     "त्या मुलाने आणखी एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,"यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही.पण या माशाला विचारा,"त्याला काय फ़रक पडला ?"   ज्याचा मी नुकताच जीव वाचवला.....                                                                                                                          
                             जीवनही असेच सुंदर आहे फ़क्त दृष्टीकोन सुंदर हवा .                                                                                                                                                                                                                                                                                                                                           संदीप.......


Friday, 27 March 2015

चांगुलपणा......

चांगुलपणा......
          आपल्यातील वाईटपणा दाखवावा लागत नाही
                  तो प्रसंगानुरूप आपोआप डोकावतोच
.                       व आपल्या उपद्रव मूल्याची जाणीव करून देतोच.
                              चांगुलपणा मात्र प्रत्येकवेळी सिद्ध करावा लागतो..
                                     एखादा क्षण जरी आपण आपल्या चांगुलपणाकडे  दुर्लक्ष केले
                                            तरी आपल्याला आपल्या कामाची पुनर्मांडणी करून
                                                        पुन्हा आपला चांगुलपणा सिद्ध करावा लागतो.

निर्णय.......

निर्णय.......        
                         
                               निर्णय या शब्दातच एक करारीपणा आहे. अमुक एका गोष्टीचा, विषयाचा, बाबीचा, आपण निर्णय घेतला असे आपण नेहमी म्हणतो. पण या निर्णय या शब्दाला किती महत्व आहे??  निर्णयावरच तर आयुष्याची कमान उभी असते.
                             आयुष जगत असताना प्रत्येक क्षणाला निर्णय हा घ्यावाच लागतो. आगदी प्रत्येक म्हणजे प्रत्येक क्षणाला जेवताना आधी कोणती भाजी घ्यायची? आज भाजी कोणती करायची? रस्ता पार करताना आत्ता करू कि नंतर? घरातून आत्ताच बाहेर पडायचे कि थोड्या वेळाने बाहेर पडूया? या सर्वात आलाच कि निर्णय. पण आपण याला निर्णय म्हणत नाही आपण फक्त मोठ्ठ काहीतरी ठरवतो त्यावेळीच त्याला निर्णय म्हणतो.
                            माझ्या मताप्रमाणे निर्णय म्हणजे दोन गोष्टीतले, वस्तूतले, ठिकाणातले, चांगले किवा वाईट ठरवणे म्हणजे ' निर्णय '. थोर व्यक्तींनी अनेक व्याख्या केल्या असतील त्या मला माहित नाहीत पण मला इतकेच म्ह्नायचे आहे कि आपल्याला प्रत्येक ठिकाणी निर्णय हा घ्यावाच लागतोच.
             आपण दररोजच्या जीवनात जे काही निर्णय घेतो त्याला आपण ठरवणे आसे म्हणतो. आणि ज्या मोठ्या गोष्टी ठरवतो त्याला निर्णय म्हणतो. 
                                              " प्रत्येकाला निर्णयाच स्वातंत्र्य आहे
                                                            पण निर्णयापासून स्वातंत्र्य नाही."

                         निर्णय घेणे यात पण कौशल्याचा भाग आहे. योग्य वेळेला योग्य निर्णय तुम्हाला यशापर्यंत पोहचवतो. पण तोच चुकीचा निर्णय तुम्हाला अपयशाची फळे चाखायला लावतो. तसे बघायला गेले तर एक चांगली व एक वाईट यातला योग्य निर्णय घेणे त्यामानाने खूप सोपे असते पण दोन चांगल्या तून एकाची निवड करणे हे खरे निर्णयाचे कौशल्य. काही जणांच्या मते एका निर्णयाने त्याचे पूर्ण आयुष बदलून जाते तसेच एका चुकीच्या निर्णयाने तेच आयुष विस्कटून हि जाते.
                         आपण घेतलेला प्रत्येक निर्णय बरोबर येईल आसे नाही पण याचा अर्थ आपण निर्णय घ्यायचाच नाही असे नाही. पण आपण घेतलेला निर्णय बोरोबर येण्यासाठी आपण शक्य ठेवडे प्रयत्न करणे हे आपले काम आहे.
               " कोणताच निर्णय न घेणे हा सुद्धा किती चुकीचा निर्णय आहे "
             आणि म्हणून आपण प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाला निर्णयाच्या जवळ असतोच........ 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संदिप कोळी
9730410154
sandip.koli35@gmail.com

Thursday, 26 March 2015

माझे हस्ताक्षर.....

रंगीत खडूच्या सहाय्याने लिहलेले........



Tuesday, 24 March 2015

'आदर्श तरुण नेमणे आहे'...........

भावानो आणि बहिनिंनो,
               छान वाटतंय न टायटल ! 'आदर्श ' सारखे शब्द आजकाल भारीच वाटतात. पण दोस्तानो आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श उभे करण्याची गरज आहे .
              काही वर्षापूर्वी शाळेत असणार्या मुलांना विचारले , कि मोठेपणी तुम्हाला कोण व्हायचे आहे? तर उत्तरे पण छान मिळायची. थोर व्यक्तीची नवे , त्याचे विचार त्यांच्या तोंडी असायचे. यशवंतराव चव्हान यानी तर मला यशवंतराव चव्हान व्हायचे म्हणून विद्यार्थी दशेतच आपला आदर्श विचार व संकल्प मांडला होता; पण सध्या ..........
          दोस्तोहो, आपल्या तरुण पिढीसमोर सध्या आदर्शच नाहीत. आजच्या मुलांना नाही वाटत छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दुरदुर्ष्टी असावी. विवेकानान्दासारखे विचार असावेत. टिळकांसारखा स्वाभिमान असावा. भगतसिगसारखी देशभक्ती व शौर्य असावे.
          आजच्या तरुणाची अवस्था म्हणजे 'अपने को तो सिर्फ पाणी निकालना है' अशी झाली आहे. त्याच्या दुर्ष्टीने हे आदर्श सध्या काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आताच्या तरुणांना पैसे, मोबाईल, जॉब, बंगला हे सगळे क्विक हव असते. आपल्या आधीच्या पिढीत संस्कार, विचार ,सुसंस्कृतपणा हि व्यक्तीची शिदोरी. या शिदोरीच्या आधारावरच ते जगले. पण आज मात्र हि संकल्पना  बदलली आहे. पैसा हही आताच्या पिढीची महत्वाची शिदोरी झाली आहे. त्याच्यासाठी चांगले विचार, तत्वे, संस्कार, खड्ड्यात गेले तरी चालतील. या सर्व परिस्थितीचे खापर फक्त तरुणांच्या डोक्यावर फोडणे योग्य नाही. त्याला सभोताल्ची परिस्थिती, समाज हाही तितकाच कारणीभूत आहे. समाजाने पैसा, प्रतीष्टेला इतके महत्व दिले आहे कि आजच तरुण गोंधळला आहे. प्रसारमाध्यमे, समाज, सभोवतालची परिस्थिती, यामुळे तरुणाला हि हेच खरे वाटायला लागले आहे. म्हणूनच कि काय डॉक्टर दाभोलकर, कॉम्रेड पानसरे सारख्या चांगल्या विचारांच्या व्यक्तीची हत्या खोट्या प्रतीष्टेसाठी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात होते.
            त्यामुळेच तरुणापुढे चांगल्या विचारांचे व कृतीचे आदर्श मागे पडत आहेत. शाळेत शिकवलेली 'आदर्श' ची व्याख्याच बदलत आहे. म्हणूनच एकंदर तरुणांची आजची परिस्थिती बघता वाटते कि  ' आदर्श तरुण नेमाने आहे'................

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...