Saturday, 29 April 2017

फक्त बाहुबली

बाहुबली, बाहुबली, आणि फक्त बाहुबली. आठ दिवस झाले परीक्षा संपून. परीक्षा सपंल्याचा आनंद, त्यात IPL ची ट्रीट, सुट्टीचे प्लॅंनिंग या सगळ्या गोष्टी असताना गेल्या काही दिवस एक गोष्ट सर्वांच्या डोक्यावर चढून बसलीय आणि ती म्हणजे बाहुबली 2.  जनरली कुठल्याही गोष्टीसाठी पेशन्स न ठेवणारी आमची पिढी बाहुबली 2 साठी मात्र जीव तोडून वाट बघतेय.कारण पण तसंच आहे ना पहिल्या बाहुबली ने  वेड लावले .त्याचाच हा इफेक्ट कि सिक्वेल ची इतक्या उत्कटतेने वाट बघितली जातीय. सध्या सगळीकडे बाहुबली 2 च्या चर्चेचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या सुट्टी असल्याने आणि बाहेर जरा जास्तच ऊन असल्याने चर्चेचे सगळे अड्डे व्हाट्सअँप आणि फेसबुक वर जमतात. त्यात आमच्या ग्रुप ने 'विक्याच्या' कौशल्याच्या जोरावर बाहुबली 2 ची तिकिटे मिळवली त्यामुळे ग्रुप मध्ये आमचा वट जरा जास्तच वाढलाय. आमचा अडमीन तर दररोज न चुकता ग्रुप वर online booking success चा मेसेज टाकून बाकीच्यांना जळवत होता. फेसबुक वर टॅग वॉर करून तिकीट न मिळाल्याची खेचायची चालली होती. आणि फेक स्टोरी चा तर इतका सुळसुळाट झालंय कि आमचा 'सम्या' तर  दररोज एक खरी स्टोरी म्हणून बोगस कहाण्याचा सपाटा लावलाय.
             तिकीट मिळवण्याची ओढ प्रचंड आहे. पहिले शो हाऊसफुल्ल झाल्यानंतर किमान आठवड्यात तरी बुकिंग मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. एरवी "हम जहाँ खडे होते लाईन वहा से शुरू होती है " म्हणणारी गँग सकाळपासून तिकिटांच्या खिडकी बाहेर गपचूप नंबरची वाट बघत उभी होती.
         पण भावांनो इंतजार कि घडिया खत्म 28 ला शुक्रवारी साडेतीन मुहुर्तापैकी एक अक्षय तृतीया च्या शुभ मुहूर्तावर आमच्या ग्रुप ने पहिल्या दिवशी तिकिटांच्या इतक्या दुष्काळात पण "बाहुबली 2" पहिलाच....
         कट्टापाने बाहुबलीला का मारले ? या एका प्रश्नाचे उत्तर मिळावे म्हणून आमच्या सारखे कट्टर चाहते दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा थिएटर मध्ये हा सिनेमा पाहतात त्यावेळी " आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो चार, पाच डोळे अशी आमची अवस्था झाली.  एखाद्या सुपरहिट सिनेमाचा सिक्वेल पहिल्या भागाइतकाच दमदार, क्लास आणि खणखणीत असल्याची उदाहरणे आपल्याकडे फारशी बघायला मिळत नाहीत पण बाहुबली 2 मात्र या सगळ्याला अपवाद ठरला आहे.
             कटप्पाने बाहुबली ला का मारले असेल असे कोडे सगळ्या जगाला घालून डायरेक्टर राजमौली नी बाहुबली- द बिगिनींग संपवला होता. त्यावरून बाहुबली- द कनक्लुजन या सगळ्याची उत्तर देणार हे सहाजिक होते. बाहुबली 2 हा बाहुबली 1 चा पुढचा भाग असला तरी याची बहुतेक स्टोरी मागच्या काळातील आहे. बहुबलीचे वडील अमरेंद्र बाहुबली , माहिष्मती चे होणारे घोषित राजे असतात,  अमरेंद्र व देवसेना( अनुष्का शेट्टी) याची प्रेमकहाणी फुलवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात राज्यात होणारे अंतर्गत राजकारण, भल्लालदेव यांची राजसिंहासनाची महत्वकांक्षा आणि त्यातून घडणारे डावपेची राजकारण अशी सारांश स्टोरी आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण ज्या प्रश्नासाठी गेलो होतो त्याचंही उत्तर मिळते.
        बाहुबली 2 म्हणजे फुल्ल पैसे वसूल सिनेमा. बाहुबली (प्रभास) ची एन्ट्री काटा किर्रर्र.. थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्टयाच.. सिनेमात CGI आणि VFX तंत्रज्ञानाचा वापर अफलातून झालाय. सिनेमातील काही सिन बघताना नकळतच आपल्या तोंडातून ' वा क्या बात है।' हे शब्द सहज निघतात. जे पडद्यावर घडतंय ते इतके भव्य व अफलातून आहे हे पाहून आपण थक्क होतो. मनोरंजनासाठी लागणारे सर्व कन्टेन्ट यात आहेत एक राजा, एक राणी, त्याची प्रेमकहाणी, राजसिंहासनासाठीचे राजकारण, यात होणारे जनतेचे हाल, डोळे दिपवणारे सेट्स, प्रत्येक कलाकाराचा बेस्ट परफॉर्मन्स, खिळवून ठेवणारे सीन्स, जाणदार डायलॉग आणि ज्याची आपण कल्पना करू शकणार नाही असे प्रसंग, सगळं काही larger than life आहे. 'राजामौली जब देता है तो छप्पर फाडके देता है ' हि फीलिंग सिनेमागृहातून बाहेर पडताना नक्की येते.
         पहिल्या सिनेमाच्या गारुडाखाली आम्ही हा सिनेमा पाहिला पण बाहेर पडताना या सिनेमाच वेगळंच वलय घेऊन बाहेर पडतो. आणि पुन्हा एकदा सिनेमा बघायचा हे बाहेर पडायच्या आधीच ठरलय.
       शेवटी बाहुबली 2- द कनक्लुजन च वर्णन  इतकंच कि तो आला... आम्ही पहिला....आणि त्यानं जिंकलं....
जय माहिष्मती....

माझा लेख फिल्मी गॉसिपिंग दैनिक पुढारी मध्ये प्रकाशित....

हुश्श्श.... संपली एकदाची exam.... एखाद्या लढाई वरून परत आल्याची फीलिंग नक्की येते. सर्वांचे नाही म्हणत पण आमच्यासारख्या काही जणांना परीक्षेचा कालावधी हा आणीबाणीपेक्षा कमी नसतो आणि परीक्षा संपल्यावर आनंद हा निकालात डिस्टिकशन मिळाल्याच्या आनंदापेक्षा मोठा असतो. तसं बघायला गेलं तर निकालाची काळजी हा नंतरचा विषय. Result को मारो गोली... आता its calls for celebration. मजा, मस्ती आणि दंगा......
             या सेलेब्रेशन ची सुरुवात पण धडाक्यात होतेय. बाहुबली 2 The conclusion. गेली वर्षभर आपण ज्याची वाट बघत होतो. अमेरिकेचा प्रेसिडेंट कोण होतो? या पेक्षा कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नांची उत्सुकता जास्त होती. Finally त्याचं उत्तर 28 एप्रिल मिळतेय. म्हणजे अगदी 5 दिवसात. Online booking सुरु ही झालंय. आमच्या ग्रुपच्या IT हेड 'विक्याने' तिकीटपण बुक केली. ट्रेलरचा धुमाकूळ आपण पाहिलायच त्यावरून सिनेमा कसा असणार याचा परफेक्ट अंदाज आपल्याला आहेच. भारी ऍक्शन, भारी लोकेशन, वर्ल्ड क्लास टेकनॉलॉजीं, अँकटिंग, म्युजीक या सर्वच आघाड्यावर बाहुबली 2 हिट ठरेल असा विश्वास आहे. पण भारतात कधी नव्हे ते पाहिल्यांदा एखाद्या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट एवढ्या आतुरतेने पहिली गेली आहे. बाहुबलीचा सिक्वेल येणार हे पहिला भाग बघितल्यावरच कळले होते पण तरीही त्याची उत्सुकता इतक्या दिवस ताणून धरण्यात टीम बाहुबली यशस्वी ठरली . आणि ते कसे यशस्वी होतात हे कळेलच 28 एप्रिल ला पण आपला तर फुल्ल सपोर्ट आहे बाहुबली 2 ला.
           Exam संपल्याच्या आनंदाप्रित्यर्थ आमच्या गँगची नेहमीची TTMM ची नास्ता पार्टी. सगळ्यांनी ऑर्डर देऊन झाल्यावर 'सम्या' शेवटी आला.गडबडीत बसत त्याने ऑर्डर दिली "हाफ पावभाजी" वेटर पाण्याचा ग्लास ठेवत एकदम आश्चर्याच्या नजरेने म्हणाला "हाफ पावभाजी नसते रे" सम्या म्हणतोय " काय जमाना आहे इथं 'हाफ गर्लफ्रेंड' मिळते आणि हाफ पावभाजी नाही. चेतन भगतच्या गाजलेल्या बऱ्याच पुस्तकावर चित्रपट निघाले. त्यातलेच एक पुस्तक 'हाफ गर्लफ्रेंड'  या पुस्तकावर याच नावाचा सिनेमा 19 मे ला येतोय. ज्यांनी पुस्तक पूर्ण वाचले असेल त्यांना कहाणी समजली असेल. पण 'दोस्त से ज्यादा, गर्लफ्रेंड से कम' हि सेंट्रल आयडिया. तशी हि कन्सेप्ट आपल्या पचनी पडायला थोडी अवघड आहे पण बघू काय इंटरेस्टिंग आहे ते. अर्जुन आणि श्रद्धा कपूर यांच्या या सिनेमाच्या ट्रेलर ची चर्चा तर आहेच.
               चर्चा तर आणखी एका ट्रेलरची पण आहे. 'सचिन द बिलियन ड्रीमस' ज्यांना बघून क्रिकेटची पिढी मोठी झाली. जो आउट झाल्यावर TV सेट्स बंद करून मैच हारली असे घोषित केले जायचे. क्रिकेट विश्वातील बॅटिंगचे almost सगळे रेकॉर्ड नावावर  करून राज्य करणाऱ्या The legend 'सचिन रमेश तेंडुलकर' या सिनेमाच्या. 26 मे ला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाच्या ट्रेलरने पण धमाल माजवलीय.
           काही पण म्हणा यावर्षी सुट्टीच्या आनंदाला एंटरटेनमेंट ची लॉटरी लागलीय हे मात्र नक्की.....

IPL आणि IPL

परवाच्या पेपरच्या आधी 10 मिनिटे शेवटच्या बाकावरचा राहुल्या त्याच्या पुढच्या बाकावरच्या पव्या ला म्हणतोय कसा "सॅमसन काय खेळतोय नाय?. आता सिनसिअर पव्या ला 'सॅमसंग' ही इलेक्ट्रॉनिक्सची कंपनी फक्त माहित.  म्हणून मला डिवचून पव्या म्हणतोय कि " हा सॅमसन कोण रे? तोपर्यंत शेजारची सायली म्हणते " त्यासाठी पुस्तक सोडून दुसरीकडे पण लक्ष द्यावे लागते". त्यावर पव्या म्हणतो अशा महत्वाच्या वेळी कसं सुचत रे तुम्हाला.....
            पण या सिनसिअर पव्या ला कोण सांगणार IPL पण गंभीर आणि महत्वाचा  विषय आहे. तसही भारतात क्रिकेट हा एक स्वतंत्र धर्मच आहे. आणि त्यात IPL चा हा high voltage धमाका म्हणजे क्या बात..!! 10 वर्षापूर्वी सुरु झालेला क्रिकेट चा हा उत्सव आजही तितकाच लोकप्रिय व कौतुकाचा विषय आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत आणि अगदी सायली सारख्या क्रिकेट हा मुलांचा खेळ मानणाऱ्या मुलींच्यापर्यंत सगळ्यांच्या पसंतीला IPL खरे उतरले आहे. 2008 ला ज्यावेळी IPL ची सुरुवात झाली त्यावेळी ते इतके लोकप्रिय होईल असे फारसे कोणाला वाटले नसावे पण Opening Match   मध्ये मैकलम ने 158 रन धुतल्या होत्या. तो IPL चा ट्रेलर होता आणि त्यानंतरचा सिनेमा आजतागायत सुपरहिट आहे. या 10 वर्षात दुसऱ्या कुठल्या क्रिकेट स्पर्धेपेक्षा एप्रिल आणि मे मध्ये येणाऱ्या IPL ची वाट जास्त प्रेक्षक बघतात. 
              तसं बघायला गेलं तर 'क्या कुछ नही है IPL में... बडे प्लेअरस है, बडे ओनर्स है, लंबे लंबे सिक्स है, बडे बडे विकेट्स है, प्लेअरस् के बीच बॅटल है, ड्रामा है, बॉलीवूड का तडका है, चिअरगर्ल्स का एंटरटेनमेंट है, और क्या चाहिये। सचिन पासून चहल पर्यंत, धोनी पासून स्मिथ पर्यंत आणि शेन वॉर्न पासून जॅक कॅलिस पर्यंत जगभराच्या क्रिकेट विश्वातील प्रत्येक नाव वेगवेगळ्या रोल मध्ये IPL शी जोडले गेले आहे. सध्या सारे क्रिकेट विश्व IPL मध्ये एकवटलेले आहे.
          या वर्षी तर IPL चे 10 वे वर्ष '10 साल आपके नाम' या थीम वर जल्लोष. या वर्षीचे IPL गाजतंय आणि अजून धडाक्यात गाजणार कारण स्मिथ, AB.D, कोहली, धोनी, रैना, रोहित, जहीर, गंभीर, मैकलन, मॅक्सवेल, युवराज, सुनील नारायण, बुमराह, मलिंगा ,उमेश यादव यासारखे क्रिकेटचे जादूगार मैदानात आहेत. IPL मध्ये प्रत्येक टीम ला support करणाऱ्या फॅन ची संख्याही अफाट आहे. हा support प्रांतवार नसून खेळाडूसाठी आणि आपल्या आवडत्या खेळासाठी केला जातो.' आमचा अर्धा ग्रुप फक्त विराट साठी आणि AB.D साठी  RCB ला support करतो'.
          T-20 फक्त बॅट्समन चा खेळ नसून बॅटिंग, बॉलिंग, आणि फिल्डिंगचा overall performance आहे हे IPL ने दाखवून दिले. कारण जेथे 120 बॉल मध्ये 200 रन निघतात, 12 मैच मध्ये 174 सिक्स मारलेत तेथे शुक्रवार च्या दोन मैच मध्ये 2 हॅट्रिक पण बघायला मिळाल्या.
           IPL ने क्रिकेट ला खूप काही दिले. स्थानिक खेळाडूंना international प्लँटफॉर्म दिला. खेळाची संधी दिली आणि यातूनच भारतीय क्रिकेटला भविष्यातले आश्वासक खेळाडू दिले. वृषभ पंत, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, बुमराह या सारखे आश्वासक खेळाडू IPL चे प्रॉडक्ट मानावे लागतील. 'सैराट' मधल्या 'बिटरगाव प्रीमिअर लीग' प्रमाणे आता गावोगावी व शहर स्तरावर अशा प्रीमिअर लीग  भरू लागल्या आहेत व यातून नवीन खेळाडूंना संधी व प्रोत्साहन मिळते हे IPL चे यश आहे.
          बाकी काहीही असो 'IPL का आगाज इतना शानदार है तो अंजाम तो उससे भी शानदार होगा।' 'सत्या' चित्रपटात मनोज वाचपेयी चा एक फेमस डायलॉग होता. मुंबई का किंग कौन?......तसा सध्या एंटरटेनमेंट का किंग कौन?.....IPL सिर्फ IPL.....

शानदार शबाना.

नमस्ते दोस्तांनो....
      कस काय मग.... Entertainment  चा डोस IPL जोरात सुरु झालाय की.... पण या IPL आणि Exam यांच्या मध्ये आपली अवस्था त्या पिजऱ्यात अडकलेल्या उदारासारखी झालीय. IPL रुपी शेंगा दिसतात पण खाता येत नाहीत. आपली सगळी धडपड परीक्षारुपी पिजऱ्यातून बाहेर पडण्यासाठी चाललीय. आणि यातच आपली दमछाक झालीय. आणि त्यातून घरातले तर असे बघतात कि त्यांनी आपला नादच सोडलाय.
            अशा सगळा  आणीबाणीचा प्रसंग असला तरी पिक्चर ला पर्याय नाही. या सगळ्या धामधुमीत कट्ट्यावर तीन चित्रपटाची चर्चा आहे. 'नाम है शबाना', 'पूर्णा' आणि मराठी 'ब्रेव्हहार्ट'. तसे शबाना आणि पूर्णा हे स्त्री शक्तीचे कौतुक करणारे सिनेमे.
            आमच्या ग्रुप मधला विक्या अक्षय कुमारचा जबरा फॅन , त्याला कुणीतरी सांगितले की 'शबाना' हा 'बेबी' सिनेमाचा प्रिक्वेल आहे.म्हणून हा First day First show ला गेला पण येताना शबानाचा म्हणजे तापसी पंन्नूचा फॅन होऊन आला. मग काय चार दिवस जाईल तिथे विक्या शाबनाची स्टोरी सांगत होता. 'नाम है शबाना' हा पूर्ण पणे तापसी वर आधारित सिनेमा. वेन्सडे, स्पेशल 26, बेबी यासारखे हटके चित्रपट देणाऱ्या नीरज पांडे चा सिनेमा, एखाद्या व्यक्तीला घेऊन तिची बॅकस्टोरी सांगण्याचा  नवा प्रयोग, शबाना, तिची आई, तिचे आयुष्य आणि अचानक झालेला बदल या भोवती फिरणारा सिनेमा. यात अधून मधून तापसी बरोबर मनोज वाचपेयी दिसतो. शिवाय अक्षय कुमार अनुपम खेर, डॅनी हे सगळे दिसण्यापूरतेच दिसतात. पूर्णपणे Action पॅक सिनेमा.पहिल्या पासून आपल्याला खिळवून ठेवणारा. व्हायोलिन वर वाजणारी ट्यून अंगावर काटा आणते.संकलन, अभिनय, छायांकन, पार्श्वसंगीत या सर्वच पातळीवर शबाना शानदार आहे.
               असाच रोमांच उभा करणारा दुसरा सिनेमा म्हणजे 'पूर्णा'. यशोशिखराच्या ध्यासाची गोष्ट म्हणजे पूर्णा. तेलंगणाच्या आदिवासी भागातून येऊन वयाच्या 13 व्या वर्षी जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केलेल्या पूर्णा मालावतच्या संघर्षाची सच्ची कहाणी. आदिवासी पाडा ते एव्हरेस्ट असा Larger than life प्रवास  अगदी सध्या पद्धतीने राहुल बोस ने मांडला आहे. राहुल बोस ला आपण गुणी अभिनेता म्हणून ओळखतोच त्याच बरोबर पूर्णाची भूमिका अदिती इनामदारने जगली आहे. बायोपिक असल्याने काही हँप्पनिंग नाही पण यशाची स्टोरी साध्य व वेगळ्या पद्धतीने नक्कीच बघायला मिळते.
       या दोन हिंदी चित्रपटात एक मराठी चित्रपट भाव खातो तो म्हणजे  'ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची' ज्याला चित्रपटातला आणि जगण्यातला आनंद कळतो त्याच्यासाठी ट्रीट. कारखानीस बापलेकाची सत्यकथा. असाध्य रोगाने जखडलेला मुलगा व त्याच्यासाठी धडपडणारा बाप याची कहाणी. अरुण नलावडे व संग्राम समेळ याच्या अभिनयाने रंगलेला 'ब्रेव्हहार्ट'. सिनेमा सत्यकथेवर आधारित असल्याने रंजकता नाही पण तरीही मनाला स्पर्श करणारा आहे. जगण्यावर प्रेम करणाऱ्या जिंदलील लोकांनी पाहायला हवा असा.....
      बाकी काही हि झाला तरी आपला सिनेमाचा नाद आहेच. शिवाय IPL आहे आणि Exam चा हत्ती जाऊन शेपूट राहिलंय So Enjoy......

बाहुबली

परवा सरांनी maths च्या लेक्चर मध्ये प्रश्न विचारला "What is the formula of simple interest". तर ते मागच्या बाकावरचं सम्या जे कायम maths च्या लेक्चर ला झोपणारं गडबडीने उत्तर दिलंय ' P×R×T divided by 100.  हे.. हे... हे..... सर पण चाटच पडले. नंतर आम्हाला कळलं की सम्याची ही अॅक्शन 'बद्रीनाथ की दुल्हनिया' पिक्चर ची रिअॅक्शन होती.
             दहावी शिकलेला पण सावकारी करणाऱ्या श्रीमंत बापाचा मनानं भोळ पण उचापती करणारं पोरगं बद्रीनाथ. स्वतःच्या श्रीमंती व दिसण्यावर अति गर्व असणारा बद्री. याच्या उलट असणारी वैदेही, ठाम, confident, करियर ला महत्व देणारी. सुरुवातीला नाकार आणि मग याच्या प्रेमाची लव्हस्टोरी. फुल्ल बॉलीवूड मसाला चित्रपट.
           वरुण-आलिया ची हिट जोडी, दोघांची प्रचंड energy, झकास background music, रिलीज पूर्वीच गाजलेली अमाल मलिक, तनिष्क बागची, आणि अखिल सचदेव ची कडक गाणी,  त्यावर मसालेदार डायलॉग जे लक्षात राहून सहज वापरता येतील असे. 'काल कॅन्टीन मध्ये गेल्यावर उधारीवर चहा मागितल्यावर कॅन्टीन मालकाचा चेहरा बघून आमच्या ग्रुप चा अँडमिंन सच्या म्हणतो " तुम्हारी मानसिक इस्थिती आज गडबड लग रही है। हम कल आते है।" इतके सहज वापरता येणारे संवाद...... जबरदस्त शूटिंग आणि रोमँटिक स्टोरी, फुल टू मसाला मूवी. डोक्याला शॉट न लावता बघण्याचा सिनेमा...
          पण भावांनो या सगळ्यापेक्षा आत्ता हवा आहे ती बाहुबली 2 ची. नुसता ट्रेलर आलाय तर ही अवस्था पिक्चर ला तर विषयच सोडा.. वर्ल्ड क्लास सेट्स, high class तंत्रज्ञान, जिवंत अॅक्शन, प्रभास चा लुक आणि  कटप्पाने बाहुबली का मारले? या आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे उत्तर मिळणार.. या सर्वामुळे बाहुबली 2 चर्चेत आहे.
        Youtube वर बहुबली 2 चा ट्रेलर धुमाकूळ घालतोय. मागचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढून बाहुबली 2 चा ट्रेलर हिट झालाय. शेवटच्या पेपर होण्याची जेवढी वाट  बघितली नसेल तेवढी वाट बाहुबली 2 ची बघातायत आणि आतापासून 'फर्स्ट डे फर्स्ट शो ' चे प्लॅंनिंग सुरु झालय...
          त्यामुळे सध्या तीनच गोष्टीची चर्चा सुरु आहे Exam, IPL आणि बाहुबली 2........
                                            जय माहिष्मती.

यश...

📝 माणूस अपयशी झाला की एकटाच होतो...
            आणि यशस्वी होतो तो भाऊ-बहीण, मावशी-आत्या, काका-काकी, शेजारी-पाजारी, कुलकर्णी काका, शेजारची आजी, कोपऱ्यावरचा दुकानदार, पेपरवाला, बालवाडीचा दोस्त, शाळा कॉलेज ची इमारत आणि चौकातल्या कुत्र्यां-मांजरींसोबत...

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...