Tuesday, 30 May 2017

आरसा....

वेळ सकाळी........
     एके ठिकाणी उभा होतो. शेजारी काही मुलाच्या गप्पा सुरु होत्या. थोडा वेळात त्यांच्या गप्पांचा ओघ लक्षात घेता त्याच्या बोलण्याचा विषय समजला.
      बोलणे सुरु होते आपल्याला कोणासारखे व्हायचे.... पण ते जगण्याच्या पद्धतित नव्हे ......तर हुबेहूब त्यांच्यासारखे जगायचे . थोडा वेळाने ती मूले  निघून गेली...
      पण त्यांच्या बोलन्यातुन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे " प्रत्येकाला दुसर्याचे जीवन जगायचे आहे"
      आदर्श जरुर असावेत....कशासाठी तर त्यांचे गुण घ्यावे.....त्याच्या यशाची प्रेरणा घ्यावी ....यशस्वी जीवनाचे तंत्र शिकवे यासाठी......
     पण एखाद्याचे जीवन जगने हे जरा आतिच होतय ना... प्रत्येक जण स्वतंत्र आहे . प्रत्येकाच्या जगण्याची तत्वे वेगळी आहेत.आणि त्याच पद्धतीने जगले पाहिजे दुसर्याचे आयुष्य चोरून जगने??? 
       पण आपल्या सर्वाना हे आवडते. आपण नकळत पणे कधी ना कधी दुसर्याचे आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोच......ती आपली सवय बनली आहे.
संदीप.....

क्रिकेट फिवर

फिवर क्रिकेटचा.....
आमच्या Bio च्या सरांनी एका पक्षाची गंमत सांगितली होती. तो पक्षी मासा पकडला कि हवेत वर टाकतो व चोच उघडून झेलून खातो ही त्याची पद्धत पण बऱ्याच वेळा मासा वर टाकला की इतर समुद्र पक्षी तो वरच्या वर हवेतच पकडून नेतात.आणि वर टाकणाऱ्याची चोच रिकामी. या रिकाम्या चोचीच्या पक्षासारखी अवस्था IPL फायनल मध्ये पुण्याच्या टीमची झाली .टप्प्यात आलेला विजय मुंबईने अक्षरशः हिसकावून घेतला. "तोंडचा घास हिरावून घेणे" या वाक्यप्रचाराचा अर्थासह वाक्यात उपयोग 'स्मिथ भाऊ' च्या कायमचा लक्षात राहील. मात्र कौतुक 'रोहित दादाचं' 3 वेळा IPL जिंकून कप आपल्यातच ठेवल्याबद्दल मंडळाकडून जाहीर आभार!!. तसही पुणे आणि मुंबई, कोणीही जिंकले असते तरी कप महाराष्ट्रातच राहणार होता. खरंच गमतीचा भाग सोडला तर काय मॅच झाली! मागच्या IPL मध्ये खालून एक-दोन वर असणारी पुणे फायनल खेळेल असेल कधीच वाटले नव्हते. त्यातही मुंबईला  एकाच स्पर्धेत तीन वेळा हरवेल याची सूतराम शक्यता देखील नव्हती.पण शेवटी फायनल गमावली तरी लोकांची मन मात्र पुण्याने जिंकली. फुल्ल मसाला मॅच. काय होते अन् काय नाही शेवटपर्यंत सस्पेन्स कायम. या सर्वात क्रिकेटचं जिंकले हे मात्र नक्की. आमच्यात  'सच्या','राहुल्या'आणि 'सम्या' मुंबईचे कट्टर समर्थक. मुंबई जिंकल्यापासून सोशल मीडिया वर पुण्याबद्दल जोकचा सपाटा लावलाय. यात चितळे बंधू, 1ते 4 सुट्टी, मिसळपाव, शनिवारवाडा याही गोष्टी सुटल्या नाहीत. चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळते याचा प्रत्येय मुंबईला मिळाला . जिओ च्या कृपेमुळे लोकांची दुआ असर कर गयी शायद असे म्हणावे लागेल पण खरे आभार त्या "आजीचे" जिच्या प्रार्थनेनेच मुंबई जिंकली.
               क्रिकेटची सोपी व्याख्या सांगायची असेल तर- "सचिन" बस नाम ही काफी है। या आपल्या लाडक्या "द सचिन" चा Biography सिनेमा शुक्रवारी रिलीज झाला. आता इतर कोणताही क्रिकेटर आवडत असला तरी सचिनचा फॅन नाही असा माणूस सापडणे अवघड त्यामुळे आम्ही 'सह ग्रुप सह मित्रपरिवार' 'सचिन द बिलियन ड्रीमस ' पाहिला. सचिनच्या क्रिकेट आयुष्याची Journey एका वेगळ्या अंदाजात आणि नव्याने पाहण्याचा सुरेख अनुभव. शून्यातून सुरु झालेला सचिन ते क्रिकेटचा बादशाह हा प्रवास पडद्यावर जिवंत होतो. अथक मेहनत आणि खेळावर नितांत प्रेम करणाऱ्या सचिनचं 22 यार्डाच्या मैदानावरचे 24 वर्षाचे आयुष्य मोठ्या पडद्यावर एकसाथ पाहणे हा आमच्या पिढीसाठी सुवर्णयोगच आहे. तुम्ही सचिनचे चाहते असा नाहीतर नसा तरीही सिनेमा बघताना थिएटरमध्ये एकदा तरी सचिन.....सचिन......असे ओरडायला भाग पडतोच.
          आपल्या देशात क्रिकेट हा फक्त खेळ नसून तो धर्म आहे. आणि मैच भारत -पाकिस्तान याच्या दरम्यान असेल तर तो मुद्दा आणखीनच सेन्सिटिव्ह होतो. 4 जून चॅम्पियन ट्रॉफी ची भारताची पहिली मॅच आणि तीही पाकिस्तान बरोबर म्हणजे ही मैच वर्ल्ड कप फायनल पेक्षा कमी नाही. IPL मुळे आपण कितीही प्रांतवादी झालो असलो तरी 'बात जब देश कि आती है ' तो No objection.
             गेला आठवडयात IPL फायनल आणि या आठवड्यात सचिन आणि भारत-पाक मॅच त्यामुळे हे नक्की कि "ये क्रिकेट का जादू है मित्रा". एकंदरीत सध्या सगळीकडे क्रिकेट फिवर सर चढकर बोल रहा है।

Saturday, 27 May 2017

गंमत...

📝नदीच्या पुराच्या पाण्यातील सर्वात जास्त गमंतीचा भाग कोणता असेल तर तो त्या पाण्यात गाड़ी धुणाऱ्याचा.....
गाड़ी असे धुतात की असा पुर पुन्हा होने नाही....
आणि अशी गाड़ी पुन्हा धुनें नहीं....😜😜
संदिप....

शेवटचा दिस...

📝 आज.......
      आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे मानतात तर काही जण आणखी एक नवीन वर्ष, नवी संधी आली असे मानतात. खरी गंमत वेगळीच असते काही गेलं ,काही येणार आहे म्हणण्यापेक्षा आहे ते Enjoy करणारा खरा शहाणा ठरतो.
          अर्धा ग्लास बघून अर्धा ग्लास रिकामा कि अर्धा ग्लास भरलेला हे ठरवण्यापेक्षा तो ग्लास पिऊन टाकणारा शहाणा ठरतो. तेच आपल्या आयुष्याच्या बाबतीत ठरते कारण भुतकाळ आपल्याला *निराश* करतो तर भविष्यकाळ काळजी करायला लावतो. पण फक्त आज आणि फक्त आजच आपल्याला जगायला, आनंदी राहायला , आनंदी राहायला शिकवतो. भुतकाळ आणि भविष्यकाळ विसरायला लावणारा तो 'आजचा' क्षण असतो. आणि तो 'आजचा' क्षण आपण 'आजच' जगला पाहिजे.
          आपण नेहमी ठरवतो, हे करायचे, इकडे जायचे, त्याला भेटायचे, त्याला फोन करायचा, इकडे फिरायला जायचे, हा छंद जोपासायचा. पण हे सर्व प्रत्येक्ष करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपण या सर्वांकडे सोयीस्कर कारणासह अपेक्षित दुर्लक्ष करतो. आणि या सर्वांना योग्य Label  लावून बाजूला करतो. कधी सुट्टी नाही, कधी काम जास्त आहे, आत्ता नको नंतर बघू ,असे म्हणून आपण आपल्याच Emotion चा गळा दाबतो. आणि मग आजच्या सारख्या एखाद्या दिवशी एकटे बसून आठवणी काढून निराश होतो.
         "So कल को मारो गोली, आज अभी आणि आत्ता " जे करायचे ते आत्ता करू, कुणाला भेटायचे आहे ना आत्ता भेटू , कोणाला फोन करायचा ना आत्ता करू, फिरायला जायचे ना आज निघू. थोडक्यात आपले Emotion control करण्यापेक्षा Express करायला आणि आजच करायला शिकले पाहिजे नाहीतर उद्या तो भुतकाळ होईल आणि आपल्या निराशेचे कारण होईल.
               "छोडो कल कि बाते,
                कल कि बात पुराणी।
                छोडो कल कि बाते
                कल कि बात है आनी।
                नए आज में लिखेंगे,
                 हम नई कहाणी।"
           आजच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा थोडासा Thoughtful विचार आज सुचला म्हणून आजच......

आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा💐💐💐
🖋 संदीप.....

शेवटचा दिस...

📝 आज.......
      आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे मानतात तर काही जण आणखी एक नवीन वर्ष, नवी संधी आली असे मानतात. खरी गंमत वेगळीच असते काही गेलं ,काही येणार आहे म्हणण्यापेक्षा आहे ते Enjoy करणारा खरा शहाणा ठरतो.
          अर्धा ग्लास बघून अर्धा ग्लास रिकामा कि अर्धा ग्लास भरलेला हे ठरवण्यापेक्षा तो ग्लास पिऊन टाकणारा शहाणा ठरतो. तेच आपल्या आयुष्याच्या बाबतीत ठरते कारण भुतकाळ आपल्याला *निराश* करतो तर भविष्यकाळ काळजी करायला लावतो. पण फक्त आज आणि फक्त आजच आपल्याला जगायला, आनंदी राहायला , आनंदी राहायला शिकवतो. भुतकाळ आणि भविष्यकाळ विसरायला लावणारा तो 'आजचा' क्षण असतो. आणि तो 'आजचा' क्षण आपण 'आजच' जगला पाहिजे.
          आपण नेहमी ठरवतो, हे करायचे, इकडे जायचे, त्याला भेटायचे, त्याला फोन करायचा, इकडे फिरायला जायचे, हा छंद जोपासायचा. पण हे सर्व प्रत्येक्ष करायची वेळ येते त्यावेळी मात्र आपण या सर्वांकडे सोयीस्कर कारणासह अपेक्षित दुर्लक्ष करतो. आणि या सर्वांना योग्य Label  लावून बाजूला करतो. कधी सुट्टी नाही, कधी काम जास्त आहे, आत्ता नको नंतर बघू ,असे म्हणून आपण आपल्याच Emotion चा गळा दाबतो. आणि मग आजच्या सारख्या एखाद्या दिवशी एकटे बसून आठवणी काढून निराश होतो.
         "So कल को मारो गोली, आज अभी आणि आत्ता " जे करायचे ते आत्ता करू, कुणाला भेटायचे आहे ना आत्ता भेटू , कोणाला फोन करायचा ना आत्ता करू, फिरायला जायचे ना आज निघू. थोडक्यात आपले Emotion control करण्यापेक्षा Express करायला आणि आजच करायला शिकले पाहिजे नाहीतर उद्या तो भुतकाळ होईल आणि आपल्या निराशेचे कारण होईल.
               "छोडो कल कि बाते,
                कल कि बात पुराणी।
                छोडो कल कि बाते
                कल कि बात है आनी।
                नए आज में लिखेंगे,
                 हम नई कहाणी।"
           आजच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा थोडासा Thoughtful विचार आज सुचला म्हणून आजच......

आपल्याला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा💐💐💐
🖋 संदीप.....

देवालाही आधार नसतो.......

देवालाही आधार नसतो.......
   ( एक बोलके छायाचित्र) 
    हे ऐकायला थोड विचित्र वाटतय ना की जो सर्वांचा निर्माता आहे. सर्व सृष्टिवर ज्याचे वर्चस्व  आहे. असे आपण मानतो त्या देवालाच आधार नाही.
     माणसाच्या बाबतीत ही गोष्ट बर्याचदा घडते. वृद्धापकाळात वयस्कर आपल्या माणसांची आम्हा सुशिक्षितांना अड़चन व्हायला लागते . ज्यानी लहानपना पासून एक रुपयाच्या चॉकलेट पासून ते गाड़ी ,घर यापर्यंत हौस पुरवली त्याच्यासाठी 100 रुपयांच्या गोळ्या घेणे आपल्याला कटकटीच वाटू लागते. आपला सगला हट्ट पुरवनार्याची त्याच्याच घरात आपल्याला त्यांची अड़चन वाटू लागते.
     पण देवाचीही....... हो कदाचित वरचे छायाचित्र तेच सांगत असावे म्हणजे देवालाही वय असते. व ते वय झाल्यावर घरात त्याच्यासाठी ही जागा राहत नाही व शेवटी अशा एखाद्या झाडाच्या मुळाशी त्यांना आणून ठेवले जाते . घरात देवाला घेउन येताना अगदी मनोभावे आपण आणतो. पूजा अर्चा करतो व कालांतराने फोटो जुना झाल्यावर असे होते.
     पण खरच देव जुना होतो??? खरच देवालाही आधार नसतो???
संदीप......

Friday, 26 May 2017

आम्ही नियम पाळत नाही.....

📝 अमास्नी कि नाय नियम-बियम पाळायला अजिबात आवडत नसतय. मुळात असल्या फालतू गोष्टी आंम्ही पळतच नाहय....
           आम्ही सडकवरच्या सिग्नला जरी उभ असलो तरी झेब्रा क्रोसिंग च्या पुढं किमान पाच फूट तरी आमची गाडी असतीया आण ते सिग्नल चा दिवा हिरवा व्हायच्या 5-6 सेकंड राहिल्यावरच आम्ही गाडी घेऊन भुंगाट जातोय.
           आता ह्यो 5-6 सेकंड चा येळ वाचवुन आम्ही कुठला जिल्ह्यातला वर्ल्ड फेमस प्रश्न सोडवतोय हे आम्हाणी विचारायचं नाय. ते फकस्त आमच्या देवालाच ठाव.
            आण बाकी नियम-बियम पाळून-बिळून कुठं देश महासत्ता हुतुय व्हय. सब झूठ, सगळ्या अंधश्रद्धा कुठच्या.....
जय हो....
संदीप....

आम्हाला स्वच्छता आवडत नाही......

📝 पहिल्यापासन आम्हास्नी ना एस.टी, गाडी च्या खिडकीतन  चिप्स खाऊन झालेला कागद, केळाचं साल, भडांगाचं रिकामं कागद, पेप्सीबीचं कागद बाहेर फेकायची भारी हौस. मग ते कुटं घाटात असणा नाहीतर शरात असणा. तेच्या बी पेक्षा भारी टॅलेंट आमच्यात हाय अनं ते म्हंजी आम्ही भर रस्त्यात चालत्या कार गाडीचा दरवाजा हळूच उघडून पिचकारी मारायचं.  तसं बी असलं भयानक टॅलेंट जगाच्या पाठीवर फकस्त आमच्यातच. उगच नाही भारत टॅलेंटची खाण.
      जिन्यातन उतरताना कोपऱ्यातली पिचकारी, नाट्यघर, सिनेमाची टाकीत बसायच्या सीट खाली केलेली घाण, एस.टी, रेल्वे सगळीकडे आम्ही असल्या लई करामती केल्याती. अ हं अन ते भी कुणाला भिऊन नाय तर दाबात.....
           अन अशीच आमची परगती राहिली तर आपल्या परधान सेवकांच्या स्वप्नां परमानं ते स्वच्छ भारत अभियान का काय ते 2019 काय आम्ही ठरवलं तर अजून बरीच साल हून बी देणार नाय.
          तसा आमचा या स्वच्छ भारत ला इरोध नाय हाय पण काय पण झालं तरी आम्ही आमचं टॅलेंट बी वेस्ट जाऊ देणार नाय.....
जय हो.....
🖋 संदीप.....

इंटरटेन्मेंटचा धमाका

दोस्तहो नमस्ते.....
         बाहुबली 2 दुसऱ्यांदा बघितला ना, अहो 100 टक्के बघितलाच असणार. "देवसेना को किसी ने हात लगाया तो समझो बाहुबली कि तलवार को हाथ लगाया", "औरत पर हाथ डालनेवाले की उंगलियाँ नही काटते, काटते है उसका गला" हे बाहुबलीचे आणि "जय भवानी " हा कटप्पा चा डायलॉग, बाहुबली आणि देवसेनाची एन्ट्री, सेतूपती चा गळा कापलेला फुल्ल पैसे वसूल सीन यासाठी नक्कीच दुसऱ्या वेळेला बघितला असणार आणि पुन्हा पुन्हा  बघण्यासारखे असे अनेक प्रसंग नक्कीच आहेत. माझं तर फेवरेट "माहिष्मतीचे राष्ट्रगीत" लयचं भारी आणि भारदस्त . त्यामुळे आम्ही पण गँग सह पुन्हा एकदा जय माहिष्मती केलेच.
         शिवाय सोशल मीडियावर म्हणजे व्हाट्सअँप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक वर बाहुबली 2 चे काही सीन चे कट विडिओ पण व्हायरल झालेत त्याला पण जोरात पसंती आहे. आमचा दोस्त 'विक्या' म्हणतोय त्याच्या लांबच्या दोस्ताकडे म्हणे लॅपटॉप वर बाहुबलीची 2 ची कॉपी आहे. आता हे खरं की अफवा हे विक्या आणि त्याच्या लांबच्या दोस्तालाच माहित. तोपर्यंत आणखी एक वायर आली आहे ती म्हणजे बाहुबली 3 पण येणार आहे म्हणे. म्हणजे पुन्हा एकदा wait , watch आणि धमाका
            शुक्रवारी चेतन भगत च्या 'हाफ गर्लफ्रेंड' या कादंबरीवर आधारित 'हाफ गर्लफ्रेंड' याच नावाचा सिनेमा आला आहे. चेतन भगत आणि श्रद्धा कपूर याचा डाय-हार्ट फॅन 'सम्या' च्या कृपेमुळे मला आणि 'परश्या' ला हा पिक्चर बघायला मिळाला. प्रत्येकाच्या कॉलेज जीवनात असते तशीच अगदी जवळची माधव आणि रिया ची स्टोरी. खेड्यातला साधा-सुधा नायक आणि शहरातली मॉडर्न नायिका यांच्यातली प्रेमकथा. दोघांचे मस्त कॉलेज लाईफ नंतर प्रेम आणि मग तक्रार..ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे त्यांना स्टोरी आधीच कळते. बाकी यातला एक  डायलॉग भारी आहे "हार मत मानो हार को हराना सिखो".याची मैं फिर भी तुझको चाहूंगा'आणि 'तू थोडी देर और ठहर जा' 'बारीश' ही गाणी आधीच चांगलीच वाजतायत. बाहेर येताना हि गाणी आपण गुणगुणतो.
           या सगळ्याच्या नादात IPL कडे थोडं दुर्लक्ष झाले. तशा सगळ्या मॅचेस बघितल्या पण चर्चा जरा थांबलीच. IPL आता रोमांचक मोड वर आले आहे. एक टीम पुणे धोनी भाऊंच्या तडाख्यामुळे पहिल्यांदाच फायनल ला आली आहे .तसं धोनी भाऊंनी CSK चे कॅप्टन असताना 6 वेळा आपली टीम  फायनल ला आणली होती त्याचा फायदा पुणे घेणारच.  शिवाय रोहित दादांनी पण आपली मुंबई इंडियन्स 3 ऱ्यादा फायनल ला आणली आहे. त्यामुळे 'काटे कि टक्कर होणार ने निश्चित'. हे म्हणजे आपल्याच घरात दोन गट पडल्यासारखे आहे.आमच्यातपण कुणाला सपोर्ट यावरून 2 भाग झालेत. Geo ची जाण म्हणून तरी मुंबई इंडियन्स ला पाठिंबा देणारा पण गट आहे. असो कोणीही जिंकले तरी कप आपल्याकडेच राहणार.आता बघू 'आज कौन किस पे भारी पडता है।' आणि कोण कप उचलतो IPL-10 चा.....
            या आठवड्यात  सचिन तेंडुलकरचा 'सचिन अ बिलियन ड्रीमस्' हा ही सिनेमा येतोय त्यामुळे एंटरटेनमेंट ची ट्रीट चालूच राहणार.

Sunday, 14 May 2017

जस्टीन चा जलवा

रंग तरुणाईचा-जस्टीन बीबर

हाय फ्रेंड्स.....
      काय मग सुट्टी मजेत ना ! फुल्ल एन्जॉय ! सुट्टी म्हंटले कि खाणे-पिणे, फिरणे, पोहणे, टी.व्ही बघणे यासारखी सगळी निवांतच कामे....फुल्ल टू मस्ती.....
           दोन -तीन दिवसाच्या उन्हाळी पावसाच्या तडाख्याच्या विश्रांती नंतर  आमचा कट्टा पुन्हा जमला. आता गँग जमली म्हंटल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा आल्याचं त्यात बाहुबली, IPL हे हॉट फेव्हरेट विषय आहेतच की...गप्पा रंगात आल्या होत्या तोच 'परश्या' 'व्हेअर आर यू नाऊ' गुणगुणत आला. आता आपल्या सिनसिअर 'पव्या' ला  परत प्रश्न "हा कोणतं गाणं म्हणतोय रे?" "अरे ते 'जस्टीन बीबर' चे फेमस गाणं आहे." ग्रुप अडमीन 'सच्या' बोलला. आता जस्टीन बीबर कोण? हा भला मोठा प्रश्न 'पव्या' च्या चेहऱ्यावर साफ दिसत होता.
          प्रत्येक ग्रुप मध्ये असतो तसा आमच्याही ग्रुप मध्ये पूर्ण पणे पाश्चात्य संस्कृती अंगीकारलेला थोडक्यात इंग्रजाळलेला 'परशा'. नेहमी परदेशी संगीत, गाणी ऐकणारा, त्याच्या फोन मध्ये हिंदी पेक्षा इंग्रजी गाण्याचा भरणा जास्त.
         आणि त्यात 'जस्टीन बीबर' भारतात येतोय म्हंटल्यावर परशाच्या आनंदाला उधाण आलंय. गेली 8-10 दिवस दररोज जस्टीनचा DP आणि स्टेटस.
आणि असणारच कि कारण पण तसेच आहे ना...
          संपूर्ण जगाचा लाडका कॅनडियन पॉपस्टार 'जस्टीन बीबर' पहिल्यांदा लाइव्ह कॉन्सर्टसाठी भारतात आणि आपल्या मुंबईत आला होता.
           बॉलिवूड कलाकारही जिथे जस्टीन चे चाहते आहेत तिथे तरुणाईची काय कथा! याआधीही त्या त्या काळात ते ते आंतरराष्ट्रीय गायक इथे आले. त्यांनी कार्यक्रम केले आणि त्यांनी जिंकले. अगदी मायकल जॅक्सन पासून रिकी मार्टिन, शकिरा ते कोल्डप्ले पर्यंत आणि आता बीबर.....
              23 वर्षीय जस्टीनकडे सगळं आहे. रंगरूप आहे, प्रसिद्धी आहे आणि सगळ्यात जास्त महत्वाचे जे तरुणांना आकर्षित करतो तो त्याचा अँटीट्युड. त्याचे बोलणे, त्याचे गाणे, त्याचे चालणे, इतकंच काय तो गप्प बसलेला असतो तरी त्याच्यावरून नजर हटत नाही. रंगरूपापलीकडे त्याचे डोळे बोलतात. त्याच्या चेहऱ्यावरचा गो गेटर अँटीट्युड आणि नजरेतली धमक अख्या तरुणाईला घायाळ करते.
         जस्टीनच्या गाण्याची जादू आपल्याकडच्या तरुणाईवर आहेच. 'यू नो यू लव्ह मी , बेबी, व्हेअर आर यू नाऊ, सॉरी, व्हॉट डु यू मीन, कंपनी ही त्याची प्रसिद्ध गाणी आपल्याही मोबाईल मध्ये सापडतात. पूर्वी मायकल जॅक्सन ची असायची अगदी तशीच. या संगीत प्रकाराचे जगभरात लाखो चाहते आहेत. तसे भारतात हि आहेत. गाण्यातले शब्द कळो न कळो पण त्याच्या चालीवर मात्र डुलायला होते. अर्थात बॉलिवूड संगीताच्या प्रेमात बुडालेल्याना कदाचित आवडणार नाही पण पॉप चा एक स्वतंत्र चाहता वर्ग नक्की आहे.
              जस्टीन बीबर ची चर्चा तर गेली कित्येक दिवस सोशल  मीडियावर  आहे. त्याच्या कॉन्सर्ट, त्यांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या, त्यांची व्यवस्था, त्याची  सिक्युरिटी आणि एखाद्या राजापेक्षाही वरचढ थाटाची. मुंबई च्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर त्याचा 10 मे ला कार्यक्रम झाला. आणि लोक जस्टीन चे दिवाने का आहेत हे त्याने दाखवून दिले. त्याची एन्ट्री, त्याच गाणं, त्याचा स्टेजवरचा वावर सगळं लाजवाब होता. आपल्या गाण्याने त्याने संपूर्ण तरुणाईला थिरकायला लावले हे मात्र नक्की.
           कार्यक्रमाच्या शेवटी 'मी पुन्हा येईन म्हणून" JB चा चाहत्यांना नमस्ते आणि धन्यवाद....

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...