"त्या आल्या, त्या खेळल्या, आणि त्यांनी जिकले" ज्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म मानला जातो आणि क्रिकेटर म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी देवापेक्षा कमी नाहीत अशा देशात महिला क्रिकेट बरीच वर्षे उपेक्षित राहिले हे मान्यच करावे लागेल. मिथाली राजच्या महिला ब्रिगेडने महिला वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये धडक मारली आणि चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मधल्या पराभवामुळे दुखावलेला भारतीय फॅन "म्हारी छोरियाँ छोरो से कम हे के" म्हणत महिला क्रिकेटकडे वळाले.
पोरींनी पण करून दाखवले. सुरुवातीच्या सामन्यापासूनच भारतीय टीमने 'दबंग' कामगिरी करत वर्ल्डकप च्या फायनलमध्ये जागा मिळवली. आणि तमाम भारतीयांसाठी पुन्हा एकदा वर्ल्डकपची आशा दाखवली. पण पहाटे एखादे सुंदर स्वप्न पडावे आणि अचानक झोपमोड व्हावी असे काहीसे झाले. फायनल चा घास आपल्या तोंडातून हिरावून नेला आणि आपण फायनल गमावली. आपण फायनल हरलो असलो तरी महिला टीमच्या हिमतीला आणि मेहनतीला दिल से दाद दयायला पाहिजे. शेवटी क्रिकेट हा पण खेळच आहे. हार-जीत तो चलती रहेगी. पण कधी नव्हे ते भारतात महिला क्रिकेट सामने आठवणीने आणि आवर्जुन बघितले गेले. त्याच्यासाठीही प्रार्थना केल्या गेल्या शुभेच्छा दिल्या गेल्या आणि पुरुष संघ सोडून पहिल्याच वेळेला महिला क्रिकेटरची नावे लोकांना माहित झाली. या 11 रणरागिणींणी महिला क्रिकेट ला सिरिअसली घ्यायला आपल्याला भाग पाडले. या टीमने मॅच गवा दी हो पर दिलो को जीता है।
क्रिकेट नंतर सबकी धडकन, आमचा अभिमान, आमचा प्राण, मातीतला खेळ म्हणजे कबड्डी आणि फक्त कबड्डी. 28 तारखेला प्रो-कबड्डीच्या या महायुद्धाला शानदार सुरुवात झाली आहे.138 सामन्याच्या या पाचव्या पर्वाच्या प्रो-कबड्डी मध्ये 12 संघ भिडणार आहेत. प्रत्येक संघाचे 15 सामने होतील आणि एकमेकांशी 3 वेळा भिडतील. या प्रो-कबड्डी मध्ये आपले हॉट-फेव्हरेट संघ असणार ते म्हणजे आपल्या अनुपकुमार ची 'यू-मुम्बा" आणि दीपक हुड्डाची "पुणेरी पलटण". यू-मुम्बा या आधी एक वेळा विजेती व दोन वेळा फायनल खेळली आहे त्यामुळे त्यांचा दबदबा आहे. पण पुणेरी पलटण ला हलक्यात घेऊन चालणार नाही त्यांनी ही गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे आपला आणि आपल्या ग्रुपचा फुल्लसपोर्ट दोन्ही टीमसाठी असणार आहे. शिवाय आपल्या सांगलीचे हिरो शत्रूच्या पकडीवर मात देणारा चतुर 'नितीन मदने', हरणाची चाल आणि वाघाची दहाड असणारा 'काशिलिंग आडके' आणि सचिन शिंगाडे यांच्याही खेळावर लक्ष असणार आहे. काहीही झाले तरी प्रो-कबड्डी यंदा आपलेच राज्य असणार आहे.
या तडक्याबरोबर या आठवड्यात बॉलिवूड चा किंग खान शाहरुख आणि आपल्या अनुष्का वहिनी यांचा "जब हॅरी मेट सेजल" हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा 4 तारखेला येतोय. त्याचे मिनी टिझर, मग ट्रेलर, गाणी यामुळे सध्या चर्चेत आहेच. यातील गाणी ही तोंडात रुळली आहेत. शिवाय शाहरुखचा सिनेमा म्हंटल्यावर चर्चा हि असणारच. इम्तियाज अलीच्या या आधीच्या 'जब वुई मेट', 'कॉकटेल', 'रॉकस्टार' यासारख्या सिनेमाला सर्वांनी पसंती दिली आहे. 'रब ने बना दी जोडी' आणि 'जब तक है जान' यानंतर अनुष्का-शाहरुख जोडी पुन्हा काय जलवा दाखवते ते आपण बघूया या शुक्रवारी.
Sunday, 30 July 2017
दंगल क्रिकेट अन कबड्डीची
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment