गेल्या आठवड्यातील प्रसंग, गेल्या शुक्रवारी 'राहुल्या' चा सकाळी साडेसात च्या सुमारास फोन आला "संध्याकाळी बर्थडे पार्टी आहे. दुसरे काही नियोजन करू नको." फोन झाला. मी डोक्याला ताण दिला पण कोणाचा बर्थडे आहे हे लक्षात येईना. मग आपला "भरोसे का साथी" फेसबुक बघितले पण तिथेही कोणत्या जवळच्या मित्राचा बर्थडे दिसेना. मग दुसरा ऑप्शन म्हणून व्हाट्सअँप बघितले. त्यानंतर एकंदर प्रकार लक्षात आला. 7 जुलै म्हणजे "द महेंद्रसिंग धोनी" चा वाढदिवस. फॅन साठी "द माही डे". मग काय संध्याकाळी 'धोनी भाऊ ' च्या समर्थनात जोरात पार्टी झाली. केक वगैरे आणुन 'राहुल्या' आणि 'सच्या' दोघांनी नियोजन केले होते. आमच्या ग्रुप प्रमाणे तुमच्या हि ग्रुप मध्ये ही धोनी चे जबरा फॅन असणारे मित्र आहेतच. ही लोकप्रियता असण्यापाठीमागे धोनीच्या यशाचा चढता आलेख आहे. आपण जेव्हा पासून क्रिकेट समजून घेऊन बघायला सुरुवात केली तेव्हा पासून धोनी आपल्यासाठी एखाद्या हिरो सारखा राहिला. शांत, संयमी, टीमला पुढे नेणारा, हटके निर्णय घेणारा, मॅच ला शेवटच्या बॉल पर्यंत खेचून नेणारा, टीम स्पिरिट वाढवणारा, विकेट किपिंग करताना विविध जादूचे प्रयोग करणारा, क्रिकेटच्या सर्व प्रकारातला यशस्वी कॅप्टन, ICC चे सर्व कप आपल्यात आणणारा, 'कूल धोनी' म्हणजे आपल्यासाठी 'महेंद्र बाहुबलीच' आणि म्हणूनच धोनी भाऊंचा बर्थडे आपल्यासाठी व्हेरी व्हेरी स्पेशल असणारच की.
या आठ्वड्यातला दुसरा हार्ड विषय म्हणजे 'हेल्मेट सक्ती' तसे आम्हाला बाईक कधी कधी तरच मिळते.आणि त्यात हेल्मेट सक्ती म्हणजे आता ती ही मिळणार नाही. तसे आमच्या गँग मध्ये रेग्युलर बाईक वापरणारे हेल्मेट वापरतात. आपल्या सुरक्षतेसाठी ते उत्तम आहे पण आमच्या सारख्या अनियमित आणि मागच्या सीट वर बसणाऱ्यासाठी हेल्मेट सक्ती म्हणजे जरा जास्तच होतंय. सध्या शहरात अट शिथिल केली आहे. पण आपण सुधारणेच्या बाजूने आहोत बघूया "आगे आगे होता है क्या?"
दोस्तांनो आपल्या सर्वाचा लाडका, बहुचर्चित, बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय सुपरहिरो 'स्पायडरमॅन' पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. लहान असताना कार्टून आणि नंतर सिनेमाच्या रूपाने आलेला सुपरहिरो जगभर लोकप्रिय आहे. आम्ही ही पहिला. 'स्पायडरमॅन: होमकमिंग' या तिसऱ्या भागामुळे स्पायडी चा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. पीटर पार्कर ची कथा या तिसऱ्या भागात वेगळ्या संकल्पनेतून मांडली आहे. यात आयर्नमॅन- टोनी स्टार्क याची कथा एकमेकांत गुंफली आहे. या आधीच्या स्पायडी च्या चित्रपटात एका ठराविक शहरापूरता मर्यादित ठेवलेल्या स्पायडी ला आता कुंपणाबाहेरचे जग खुणावत आहे. येणाऱ्या काळात या स्पायडी चे पुढील भाग नक्की येतील.
VIP-2 चा ट्रेलर पहिला का, अरे आपल्या धनुष चा नवा कोरा तेलगू सिनेमा. आणि हो याचे खास आकर्षण म्हणजे काजोल 20 वर्षानंतर पुन्हा तेलगू चित्रपटात दिसणार आहे. होय खरंच...आणि विश्वास बसत नसेल तर यूट्युब बघाच. ट्रेलर जोरात आहे.
या सगळ्या नंतर आणखी एक न्युज आहे. ढिंचाक पूजा चे ऑफिशियल व्हिडीओ यूट्युब ने ऑफिशिअली काढून टाकले. आता ही गुडन्यूज कि बॅडन्यूज हे तुम्हीच ठरवा.
---------------------------------------------------------
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment