गेल्या रविवारी दुपारपर्यंत "फेडरर संपला रे, त्याचा जमाना कधीच गेला रे" म्हणणारे 'विक्या' आणि 'परशा' रविवारी रात्री फेडरर जिंकल्यावर शुभेच्छा देण्यात सर्वात पुढे होते. कारण पण तसे खासच होते ना, तमाम टेनिस चाहत्याचा फेव्हरेट खेळाडू, ग्रास कोर्ट चा अनभिषिक्त सम्राट " रॉजर फेडरर" चा विक्रमी आठवा विम्बल्डन विजय. विम्बल्डन म्हणजे टेनिस विश्वाचा वर्ल्ड कप. हि स्पर्धा खेळणे आणि विम्बल्डन चा कप जिंकणे हे जगातल्या प्रत्येक टेनिस खेळाडूचे स्वप्न असते. अशाच स्वप्नासह स्विझरलँड चा एक खेळाडू टेनिस मध्ये आला.16 वर्षांपूर्वी त्याने त्या वेळच्या महान टेनिसपटू 'पीट सॅम्प्रसला ' पराभूत करून सर्वाना धक्का दिला व त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही व जागतिक टेनिस ला एक सुपरस्टार खेळाडू मिळाला तो म्हणजे "रॉजर फेडरर". गेल्या वर्षीच्या पराभवानंतर फेडरर ने आपला खेळ थांबवला. विश्रांती घेतली. सराव केला. खेळाची तंत्र नव्याने पक्की केली. आपले लाडके विम्बल्डन जेतेपद पटकवण्यासाठी फेडररने फ्रेंच ओपन मधूनही माघार घेतली आणि "सब्र का फल मिठा होता है।" या प्रमाणे हे गोड फळ त्याला विम्बल्डनच्या जेतेपदाच्या मुकुटासह रविवारी मिळाले. आपल्या करियर मधील सर्वोत्तम खेळ करत विम्बल्डन जिंकण्याचा आठवा प्रताप करताना त्याने सर्वाना मागे सोडले आहे. यापूर्वी 2003, 04, 05, 06, 07, 09, 12 आणि या वर्षी अशा तब्बल आठ वेळा फेडररने विम्बल्डनचा मुकुट आपल्या डोक्यावर चढवत विम्बल्डन चा बादशहा म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. या विजयाबरोबर आपली कारकीर्दीतले 29 ग्रँडस्लॅम जिंकले आहे. वयाच्या 35 व्या वर्षी असा उत्कृष्ट खेळ करून यश मिळवल्याबद्दल फेडरर भाऊंना 21 तोफांची सलामी.
या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे सर्वत्र हिरवागार निसर्ग नटला आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे.
असेच आनंदाचे वातावरण असण्याचे आणखी एक कारण म्हणजे "प्रो-कबड्डी लीग". महाराष्ट्राचा लोकप्रिय असणारा अस्सल मातीशी जोडणारा खेळ म्हणजे कबड्डी आणि प्रो-कबड्डी मुळे या आपल्या खेळाला सुगीचे दिवस आले आहेत. अल्पावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठणाऱ्या प्रो-कबड्डी चा यंदा पाचवा सिझन आहे. येत्या 28 जुलै पासून या पाचव्या पर्वाची धमाकेदार सुरुवात होत आहे. IPL च्या धर्तीवर फ्रेन्चयझी पद्धतीने खेळवण्यात येणाऱ्या या खेळात देशातील खेळाडूसह आंतराष्ट्रीय खेळाडूही सहभागी होत आहे. या लीगमुळे आपल्या गावामधील खेळाडूंनाही सोन्याचे भाव आले आहेत. या लीगमध्ये आपल्या सांगलीच्या खेळाडूचे योगदान ही मोलाचे आहे. यंदा 12 संघ आपसात भिडणार आहेत. 12 आठवडे हि जम्बो स्पर्धा चालणार आहे. आपल्यासाठी हि ट्रीट आहे.
या खेळाच्या मोसमात कॉलेज जीवनावर आधारित एक मराठी सिनेमा "बस स्टॉप " शुक्रवारी आला आहे. नावावरून वाटत नसला तरी पूर्ण पणे कॉलेज जीवनावर आधारित असणाऱ्या या सिनेमात भली मोठी मराठीतली स्टारकास्ट आहे. कॉलेज च्या फुल्ल धमाल मस्तीवर आधारित एंटरटेनमेंट सिनेमा.
शेवटी जाता जाता, हेल्मेट घेतले ना, घेतले नसले तर घ्यायला लागतंय!.
Sunday, 30 July 2017
बोलबाला टेनिस, क्रिकेट अन कबड्डीचा
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment