ते नव्हं ते हॅम्लेट सक्तीचं काय अनं नवीन झोमंट. ते खालच्या गल्लीचं 'गोट्या' चार दिस झालं रोज हॅम्लेट बगाला कोलापूरला जातंय अनं पसंत पडत नाय म्हणून परत येतंय.
पण भावा या हॅम्लेट सक्तीला आपला अनं आपल्या मंडळाचा जाहीर इरोध हाय. मी म्हणतो गाडी कुणाची...आमची!, पेट्रोल कुणाचं...आमचं!, डोस्क कुणाचं... आमचं!, जीव कुणाचा...आमचा! मग आमच्या जीवाची दुसऱ्यासनी कशाला पाहिजे काळजी. आमचं आम्ही बघू कि. जवा पासणं कळायला लागलं तवापासणं गाडी हाय आमच्या हातात अजून एकदा बी खिरकी उठली नाय गाडीला अनं अंगाला बी. आमचं वाईट व्हावं हये इरोधकास्नी वाटतंय पण आई अंबाबाईचा आशीर्वाद अनं राजांचा वरदहस्त हाय तव्हर आमची गाडी अशीच भुंगाट जाणार. बरं ते हॅम्लेट डोसक्यात अडकवल्यावर मावा कुटन थुकायचा अनं गॉगल कसा घालायचा हे हार्ड प्रश्न हायती. या हॅम्लेट च्या नादात 'पप्या' परवा गडबडीत हॅम्लेट मधेच पिचकारी मारलं. या परसंगला कोण जबाबदार.
आम्ही घरातन बाहेर पडल्यापासनं चौकात येईपर्यंत पाच-पन्नास कार्यकर्त्यासनी हात करायला लागतुय. त्या हॅम्लेटातन कळतंय होय कोण हाय ते. त्यात ह्या बारीला सरपंच निवड डायरेकट् निवडायचा हाय.अशानं कार्यकर्त नाराज हुत्याल.
अनं आमच्या आबांनी सांगितलंय डोसक्यावर कुणाला बी बसू द्यायचं नाय त्यामुळे हॅम्लेट चा विशय कट्. तस बी या निर्णयान मंडळाची पोर खुश नाहीत त्यामुळं अध्यक्ष म्हणून आमचा बी विरोधच.
अनं ते सेप्टी घाला चुलखंडात आम्ही आमच्या घरच्याचं कवा ऐकलं नाय अन हे ऐकायला मोकळं हाय व्हय!
Sunday, 30 July 2017
हेल्मेट चा विषय कट्
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment