"सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय? नाय काय?" ऐकलंय ना हे गाणं, असेलच आणि नसेल ऐकलं तर नक्की ऐका. व्हाट्सअप्प, फेसबुक, यूट्युब सगळीकडे आहे. तुम्ही जिथे जाल तिथे नक्की सापडेल शिवाय गल्लीतली चिल्लर, कट्टयावरची पोरं, मुलींचा गलका सगळ्यांच्या तोंडी गुणगुणलं जाणारे एक ढिंचाक सॉग. सध्या तुम्ही कोणतेही सोशल नेटवर्क वर असा तुम्हाला हे शब्द आणि हे गाणं भेटणारच. यूट्युब वर तर 10 लाख लोकांनी हे गाणं बघितले आहे. बच्चे कंपनी पासून थोरा-मोठ्यापर्यंत सर्वाना आवडणारे आणि तितक्याच सहजपणे ओठावर येणारे गाणे. सहज सोपे शब्द आणि तितकेच सहज सोपे संगीत त्यामुळेच सध्या सगळीकडे "सोनू" ची क्रेझ आहे. हि क्रेझ इतकी आहे की " सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?" हे वाक्य टॅगलाईन बनले आहे. अगदी या लाईन वर कित्येक जोकस् सध्या फिरत आहेत. ज्याच्या ग्रुपमध्ये "सोनू" हे नाव किंवा पेटनेम असणारा, असणारी Friend असेल तर त्याच्या नावावरून बोलायला नको इतकी गंमत सुरु आहे. ग्रुप मध्ये काहीही बोलत असताना असा काही प्रसंग आला की "सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय?" हे वाक्य आपसूक येते.
गेली काही वर्षात अशा वेगळ्या धाटणीची बरीच गाणी आली की जी आली आणि त्यांनी जिंकलं, अगदी मनावर अधिराज्य वगैरे केले. धनुष चे "कोलावरी डी" आठवत असेल की, सहज म्हटलेले पण लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर आलेले "ओपन गंगम स्टाईल" हे गाणे. हे गाणे आणि त्यांच्या डान्सची युनिक स्टेप अजूनही भारतीय रोड डान्स मध्ये हमखास दिसते. त्याच बरोबर "शांताबाई" अजूनही सुरु झाले की डान्स चा ठेका धरतो. तसेच "कल्लूळाच पाणी" यासारखी गाणी ज्यांनी लोकांना अगदी वेड लावून सोडले. या गाण्याचा ठराविक असा प्रेक्षक वर्ग नव्हता हि गाणी सर्वांसाठी होती. सर्वाना आवडली.सर्वांनी एकदा तरी पुटपुटली. लहान मुले तर या गाण्यावर सहज ठेका धरतात. मोठ्यांच्या मुरवणुकी, वराती अजूनही याचं गाण्यांनी गाजतात.
पण असे वेड लावणारे काय होते या गाण्यात. या सर्व गाण्याचे कॉमन वैशिष्ट्ये म्हणजे यांचा सहज सोपेपणा आणि वेड लावणारे संगीत, एकदा ऐकल्यावर सहज लक्षात राहणारी सोपी रचना,गाण्यामध्ये असणारी प्रचंड ऊर्जा या सगळ्यामुळे ही गाणी लोकांनी डोक्यावर घेतली.
असाच एक प्रकार हिंदीतही सुरु आहे "ढिंचाक पूजा" . एका साध्या पण स्टायलिश मुलींनी गायलेली हटके गाणी. "सेल्फी मैने ले ली आज","दिलो का शूटर" यासारखी तिची गाणी ऐकली असतील. या ढिंचाक पूजा च्या गाण्याला आणि शब्दाला काहीही आकार-उकार नसताना हि गाणी यूट्युब वर लाखो लोकांनी बघितली आहेत.
अशी बरीच व वेगळ्या प्रकारची गाणी भविष्यात येतील व सर्वाना आवडतील.हे सगळे प्रकार पहिले कि पूर्वी सारखी शांत, अर्थपूर्ण, सुरेख संगीत असणारीच गाणी आवडतील असे नाहीतर हि अशी साधी,सोपी, गद्य रूपातील, ढिंचाक संगीताची व डोक्यात थेट जाणारी गाणी सध्याच्या जनरेशन ची धडकन आहेत.
Saturday, 1 July 2017
ढिंचाक सॉंग्स
Subscribe to:
Post Comments (Atom)
आज : Today
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
🏵️ Leave while you are at the top of the game.....🏆🏏 29 जून हा दिवस समस्त भारतीयांसाठी प्रचंड अभिमानाचा आणि कौतुकाचा ठरला. गेल्या अकरा वर...
-
📝 आज....... आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...
-
📝 जागर स्त्री-शक्तीचा... सर्वप्रथम आजपासून होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा..... 👆पण वरचे चित्र बघितल्...
No comments:
Post a Comment