Monday, 27 November 2017

दिवाळीची सुट्टी फुल्ल ऑन मस्ती

          दिवाळी  तोंडावर आली, आली म्हणता अगदी संपली सुद्धा.एवढा मोठा वर्षाचा सण म्हणजे तयारी हि जोराची आलीच कीं. अगदी  सर्वाच्या आधी सुरुवात करून हि सणात सुद्धा आपली खरेदी सुरु होती अशीच बऱ्याच  जणांची अवस्था होती. त्यामुळे अजूनही हे राहिले, ते विसरले म्हणून बाजारपेठांच्या वाऱ्या शेवटी पर्यंत सुरूच होत्या. यावर्षी पावसाने थोडा गोंधळ घातलेला होता पण त्यानेही माघार घेत आपल्या आनंदाला मोकळीक दिली. आजी, आई ने केलेल्या रुचकर आणि स्वादिष्ट फराळावर कित्तेक हात मारून झाले आहेत. ताईने हि त्या फराळात नकळत का होईना थोडाफार हातभार लावला होता. बाकी आकाशकंदील, लाईटची सजावट यात आपण आपले कौशल्य दाखवून बाबांना इंप्रेस केले आहे. एकंदर काय सर्वत्र दिवाळीचा फिव्हर आणि धमाल सर्वांनी अनुभवली आहे.
           फटाके मुक्त दिवाळी मुळे कही ख़ुशी, कही गम चा मौहोल होता पण असो सणवार असले कि वातावरणात एकदम पॉझिटिव्ह वेव्हज असतात. शाळा, कॉलेज ना सुट्टी सुरु आहे. काही ऑफिसना सुट्टी आहे काहींनी सुट्टी वाढवून घेतली आहे. बच्चे कंपनी किल्ला व त्याची देखभाल करण्यात व्यस्त होती. तीही आता फ्री झाली आहेत.
            वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा, भाऊबीज सगळे दिवस अगदी आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरे केले दिवाळीत येणाऱ्या  प्रत्येक दिवसाच्या सणाबरोबर महत्वाची असते ती "दिवाळीची सुट्टी". उन्हाळ्याच्या नंतर  मध्यावर येणारी मोठी सुट्टी. त्यामुळे सणांबरोबर सुट्टीचेही नियोजन महत्त्वाचे असते. सुट्टी असल्यामुळे घरातले सगळे एकत्र येतात हि सर्वात आनंदाची गोष्ट असते. याबरोबर आपण मित्र, नातेवाईक यांच्याकडे जातो-येतो हि एक महत्वाची बाब असते. लहानांसारखे मामांच्या, मावशीच्या गावाला जाण्यात आजही तितकाच उत्साह असतो आणि तो या सुट्टीमुळे पूर्ण करता येतो. आपल्या जवळच्या माणसांना भेटण्याचा आनंद काही औरच असतो. याबरोबर फॅमिली व मित्र मंडळी याच्या बरोबर ट्रिप चे नियोजन सुरु असेल किंवा झालेही असेल. निसर्गसौदर्याने नटलेला कोकण, महाबळेश्वर,ताडोबा यासारखी ठिकाणेही फायनल झाली असतील. काही मित्रमंडळींच्या डोक्यात गोवा हि घोळत असेल. एस. टी च्या संपामुळे थोडा गोंधळ झाला होता पण तोही आता मिटला आहे.   
          याशिवाय सुट्टीत काही जणांचे काही हटके प्लॅनस् असतील आवडीची पुस्तके वाचणे, आईला मदत करणे, समाजकार्यात भाग घेणे, एखादा कौश्यल्याचा भाग पूर्ण करणे, काही छोटे क्लास करणे, काही महत्वाची राहिलेली कामे पूर्ण करणे याही गोष्टी काही जणांच्या सुट्टीचा भाग असतील. 
          प्रत्येकाला असणारी सुट्टी कमी जास्त असली तरी असेल त्या सुट्टीत काय करायचे या विचाराचे चक्र मात्र प्रत्येकाच्या डोक्यात सुरु असेल दीपावलीच्या या सुट्टीच्या निमित्ताने प्रत्येक जण आपला शक्य तेवढा वेळ आपल्या माणसाच्या बरोबर व  चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी नक्की धडपडतोय व आपण तो चांगल्या प्रकारे साजरा हि करूया. 
       
------------------------------------------------------------------
संदीप कोळी

No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...