हाय फ्रेंड्स... जोरात झाली असेल ना विसर्जन मिरवणूक, झालीच असणार आपल्या भावांचा नादच खुळा. आपल्या लाडक्या बाप्पाला शांता, शालू, आणि आला बाबुराव च्या ठेक्यात पुढच्या वर्षी लवकर या च्या आश्वासनावर निरोप दिला. 15 दिवस कसे संपले कळालेच नाही पण आता बॅक टू वर्क. कॉलेज, जॉब फिर से शुरु.
बऱ्याच दिवसानंतर रुटीन पकडायला जरा जड जाते. But there is no other option so सगळ्यांनी आपली पूर्ववत शैली पकडली असेल अशी आशा आहे. मिरवणुकीनंतर हळू हळू आम्ही पूर्वपदावर आलो. कॉलेज कट्टा पुन्हा बहरला. अशाच गप्पा बहरत आल्यावर मधेच 'परशा' बोलला " ते बघ आलीय आली रे", भोळ्या 'पव्या' च्या ते लक्षात आले नाही बिचारा कुठे आहे म्हणून विचारू लागला. "ती बघ आपल्या वर्गातली रे" म्हणत 'सच्या' ने पुन्हा एकदा ' पव्या'चा पचका केला आणि हसायला विषय सापडला.
पण दोस्तांनो हे खरे आहे आपला सिनेमा आपल्या मनावर राज्य करतो किंबहुना पिक्चर हे समाजाचे प्रतिबिंब वगैरे असते सिनेमाची अभिनेत्री म्हणजे तर ' जवा दिलो कि धडकन!' कोणाचा चेहरा गुलाबी, कोणाची आँखे शराबी, कोणाची अदा घायाळ करणारी, कोणाचा साधेपणा वेड लावणारा, कोणाच्या फॅशन चे दिवाने, कोणाच्या रूपावर फिदा तर कोणाच्या अँटिट्युड वर लट्टू. अशा एक ना अनेक कारणांनी या नायिका गारुड करतात. कोणी कितीही नाही म्हणाले तरी प्रत्येकाची एक तरी आवडती अभिनेत्री असते. आपण मनात तयार केलेल्या काल्पनिक इमेज ला सत्यात उतरवण्याचे काम ती नायिका करते. आपल्याला आवडणाऱ्या व आकर्षित करणाऱ्या बाबी आपण तिच्यात पाहतो आणि आपल्या 'ड्रीम गर्ल' च्या साच्यात तिला बसवतो. मग काय तिच्या सर्वच गोष्टी आवडू लागतात.
हे प्रत्येक पिढीत आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा पासून सिनेमा आला तेव्हा पासून नायिका महत्वाच्या आहेतच. मधुबाला, नर्गिस याच्या पासून सुरुवात झाली त्यानंतर हेमा मालिनी, रेखा, जया प्रदा यांनी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी टाकली. त्यानंतर श्रीदेवी, माधुरी, तब्बू, जुही चावला, काजोल, ऐश्वर्या यांनी ही जबाबदारी घेतली. आता प्रियांका, दीपिका, कॅटरिना, करीना, अनुष्का याच्याबरोबर आलिया भट, श्रद्धा कपूर, जॅकलीन फर्नांडिस ते अगदी सनी लिओनी पर्यंत प्रत्येकीने आपल्या अदानी घायाळ केले आहे. याच्याबरोबर दक्षिणेतील अनुष्का, तमन्ना, काजल अग्रवाल, मराठीतील तेजश्री प्रधान, प्रिया बापट, स्पृहा जोशी, वैदेही परशुरामी याही मागे नाहीत.
आपल्या प्रमाणे प्रत्येक जनरेशन मध्ये त्या त्या काळातील नायिका आवडत्या होत्या व आहेत. आपले वडील, काका आजही त्यांच्या तरुणपणातील नायिकेची आठवण आवर्जून काढतात. काळ बदलला व त्या प्रमाणे नायिका व त्याचे दिसणे बदलत गेले. सुरुवातीच्या साडीतील नायिका पंजाबी ड्रेस मध्ये आल्या त्यानंतर जीन्समध्ये व आत्ताची फॅशन तुम्हाला परिचित आहेच की. बरं या नायिकांचा प्रभाव फक्त पुरुष वर्गावर नसून यांची फॅशन, स्टाईल मुलीही कॅरी करतात. एखाद्या अभिनेत्रीची उपमा दिलेली मुलींनाही आवडते.
आमच्या ग्रुप मध्ये परशाला 'आलिया'आवडते. राहुल्या तेलगू नायिकांचा फॅन, विक्याच्या स्टेटस ला मराठी नट्या तर सच्याला हॉलिवूड मध्ये इंटरेस्ट. प्रत्येकाच्या स्टेटस, कव्हर, वॉलपेपर, स्क्रीन सेव्हर ला याचेच फोटो आणि गाणी दिसतील.
असो हे सगळे घडण्यापाठीमागे त्या अभिनेत्रींचे सौन्दर्य, त्यांचा अभिनय, त्यांची फॅशन, त्यांची मेहनत असते कारण असेच कोणाच्या हृदयावर अधिराज्य करणे ही सोपी गोष्ट नाही.
------------------------------------------------------------------
संदीप कोळी
No comments:
Post a Comment