Monday, 27 November 2017

इट्स टाइम फॉर सेलेब्रशन

हाय फ्रेंड्स , सध्या एकदम मज्जा आहे आपली, भारतीय क्रिकेट टीम आणि पाऊस दोघेही दमदार परफॉर्मन्स देत आहेत. कॉलेज, लेक्चर, सबमिशन आणि कधी कधी अभ्यास याही गोष्टी घडत आहेतच.
          पण या सगळ्या गडबडीत दिवाळी आठ दिवसावर आली भावांनो. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांना मारो  गोली इटस टाईम फॉर सेलिब्रेशन. दीपावली म्हणजे सणांचा राजा. दिवाळीची चाहूल लागते ती बाजारपेठा फुलायला लागल्यावर. तसं बघितले तर हल्ली आपली खरेदी वर्षभर सुरूच असते. त्यासाठी कोणत्या सणांचे निमित्त लागत नाही. हे खरे असले तरी दिवाळीची खरेदी मात्र चुकत नाही हे निश्चित. वर्षभर कितीही शॉपिंग केले तरी दिवाळीच्या मौहोल मध्ये केलेल्या खरेदीची बातच न्यारी असते. हे आपण सर्वच मान्य करतो.
           आपल्या सर्वांच्या कॉलेज कट्ट्यावर सध्या खरेदीच्या चर्चेचा जोर वाढतो आहे. ऑनलाइन शॉपिंगची संकल्पना आता आपल्याला नवीन राहिली नाही. आपल्या स्मार्ट फोन मुळे अमेझॉन, फ्लिपकार्ट, जबॉन्ग, मिन्त्रा सारखी ऑनलाइन दुकाने आपल्या खिशात आली आहेत. आमचा 'राहुल्या' आणि 'सच्या' दोघेही त्यावरच असतात. सतत नवीन ऑफर वर लक्ष ठेऊन असतात. लेटेस्ट फॅशन चे कपडे, बूट, मोबाईल , इलेक्ट्रॉनिक वस्तू, यावर आमच्या टीमचे विशेष लक्ष असते. ऑफर आली रे आली कि लगेच खरेदी आणि हो सध्या या सर्व ऑनलाइन शॉपिंग साईट वर जबरदस्त ऑफर आणि डिस्काउंट चालू आहे. याचा भरपूर फायदा आमच्या बरोबर तुम्हीही उठवला असेलच. 
          खरेदी म्हणजे मुलींसाठी एक स्वतंत्र सणच असतो. त्यामुळे या खरेदीत मुली मुलांच्यापेक्षा चार पावले पुढेच आहेत. ड्रेस, इलेक्ट्रॉनिक वस्तूबरोबरच दागिने व गिफ्ट यावर त्याचा भर दिसून येतो. यासाठी ऑनलाइन शॉपिंग करतातच पण त्याच बरोबर मार्केटमध्ये प्रत्येक दुकानात जाऊन दरात कमी-जास्त करून खरेदी करण्यावरही मोठा भर आहे. प्रत्येक वस्तू बघून, पारखून, हाताळून घेण्याची संधी ऑनलाइन मध्ये मिळत नाही म्हणून प्रत्येक्ष मार्केटचा पर्याय निवडला जातो.
         कपडे, बूट, मोबईल, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गिफ्ट आर्टिकलस या वस्तुंना या दिवसात प्रचंड मागणी असते. पण याबरोबर बाकीच्या किरकोळ खरेदीला दिवाळीत महत्व असते. पणत्या, रांगोळी, साबण, सुगंधी तेल, उटणे या हि वस्तूची गणना महत्वाच्या खरेदीमध्ये करावी लागते. आई किंवा ताई बरोबर जाऊन आपल्याला याही वस्तू खरेदी कराव्या लागतात. भारत-चीन ताणलेले संबंध आणि सोशल मीडिया यावरील विविध मेसेजमुळे अनेकांनी यावेळी चायना वस्तुंना जाणीवपूर्वक टाळून मातीच्या पणत्या व आपल्याकडे तयार केलेल्या वस्तू यांची खरेदी केली आहे. 
            प्रत्येक जण आपापल्या परीने व आपापल्या स्टाईल ने खरेदी केली आहे व करत आहे. ऑनलाइन शॉपिंगचा टक्का वाढला असला तरी रस्ते व मार्केटमधील दुकाने गर्दीने तुडुंब भरली आहेत. गर्दीच्या आधी खरेदी करूया म्हणत प्रत्येकाने आत्ताच गर्दी केलेली आहे.
          दिवाळी हा सणच मोठा आहे. त्यामुळे या सणाचा आनंद प्रत्येकजण मोठाच घेतो. आपणही घेऊया आणि हि दिवाळी आनंददायी बनवूया. 

-------------------------------------------------------------------
संदीप कोळी.

No comments:

Post a Comment

मन ही आवरायला घेऊया

           वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...