जागतिक पर्यावरण दिन......
आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन.....
मागची एक जुनी आठवण आजच्या
पर्यावरण दिनानिमित......
सुट्टीत बाहेर
गेलो होतो. नेहमीचच कोकण.... रस्त्याच्या कडेला गुरे चरवायला आलेल्या आजी जवळ
थांबलो. थोड़ी विश्रांती व थोड्या गप्पा मारायच्या म्हणून..... थोडा वेळ गप्पा
झाल्यावर सहज विचारले " "आजी पावसचं कस यंदा"........
आजी पण तिच्या
शैलीत म्हणते " कसं म्हंजी बाबा पड़ायला पहिजीच की..... तुमी शेरातली माणस आणि
त्यात पगारवाली मग काय तुमासनी न्हाइ लागत खर आमासनी पाऊस पहिजेच की" आता
यावर काय म्हणायचे म्हणून मी म्हणालो "आजी आमी बी पानीच पितोय की " आणि
नंतर निघालो.
पण खरच पाऊस जसा
शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे तस तो आपल्या सर्वाच्याही आहे फ़क्त आपण
त्यावर प्रत्यक्ष अवलंबून नसल्याने पिण्याच्या व घरगुती वापराव्यतिरिक्त पाणी
आपल्याला फारसे लागत नाही.
पण त्या
वाक्याचे मला फार अप्रूप वाटले. जेवढया आतुरतेने आपण 7 व्या वेतन आयोगाची वाट पहिली त्याहीपेक्षा कित्येक पटीने
ग्रामीण भागातील लोक ज्याचा Direct संबंध शेती, गुरे यांच्याशी आहे त्या पाऊसाची वाट पहतायत.
झाड़ लावले
पाहिजे जगवली पाहिजे याचे संदेश आपण गेली आठवडाभर व आजतर
जास्तच सामाजिक भान दाखवत शेयर करतोय पण प्रत्यक्षात कृति किती झाली हे खूप
महत्तवाचे....
माझ्या एका झाड़ने
खूप मोठा फरक पडणार नाही पण आपल्या सगळ्याच्या एका एका झाडाने नक्कीच खूप मोठा फरक
पडेल..... त्या अजीच्या डोळ्यात अपल्याकडून आपल्याकडून काही अपेक्षा दिसल्या नाहीत
पण तिच्या बोलक्या डोळ्यात उद्याची काळजी नक्कीच दिसत होती....
आपण so called
सुशिक्षित लोकांनी निदान "ती उद्याची" काळजी
मनावर घेऊन एका चांगल्या बदलाची सुरुवात करून आपले भविष्य सुरक्षित करुया. मी झाड़
लावूनच हा अनुभव आपल्या बरोबर शेअर केला आहे. तुम्ही पर्यावरण दिन कसा साजरा करता
मला माहित नाही पण.....
झाड़ लावून बघा...
अच्छा लगता है।
------------------------------------------------------------------------------------------------------------------
© संदिप कोळी
.....
9730410154
sandip.koli35@gmail.com
Excellent
ReplyDeleteExcellent
ReplyDelete