Monday, 1 June 2020

नमस्कार सांगा Say Hello

नमस्कार सांगा…..

                 नमस्कार सांगा…… हे शब्द काही जणांनी वापरले असतील, काही जणांनी ऐकले असतील आणि कदाचित काही जणांना माहीत नसतील.

                नमस्कार सांगा’…… फार वर्षांपूर्वी असं मी म्हणणार नाही, पण काही वर्षांपूर्वी वापरात असणारा शब्दप्रयोग. दोन व्यक्ती भेटल्यानंतर आपुलकीने एकमेकांशी बोलल्यानंतर घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींविषयी नक्की विचारपूस हो व त्यावेळी त्यांना माझा नमस्कार सांगा हा शब्दप्रयोग आपोआप तोंडातून येत होता. शिवाय पत्रव्यवहार तर या वाक्यासाठी राखीव जागा असत होती. नवीन फोन आल्यावर सुरुवातील काही काहा शब्दप्रयोग सुरू होता, पण नंतर मात्र हळूहळू तो सगळीकडूनच गायब होत गेला. आता हा शब्द प्रयोग वापरायचे दूर पण ऐकायलाही मिळत नाही.

              तुम्ही म्हणाल हे काय नवीन? आणि याचा संबंध काय?....

सांगतो....... काही शब्द ना आपल्या खूप जवळचे असतात. आपल्या लहानपणापासून किंबहुना आपल्याला कळायला लागल्यापासून त्या शब्दांच्या सहवासात आपण घडत असतो. मोठे होत असतो. आपल्या बोलण्यात, भाषाशैलीत त्याचा वावरमुक्तपणे व नियमित असतो पण कालांतराने असे लक्षात येते की आपल्या बरोबर असणारे हे काही विशेष सोबती शब्द काळाच्या ओघात आपली साथ कधीच सोडून बाजूला गेलेले असतात. कधी-कधी नामशेष झालेले असतात. त्या शब्दावर खूप प्रेम करणारे आपणही नकळत नवीन शब्दांच्या गर्दीत त्यांचा हात सोडून कधीच पुढे आलेलो असतो आणि मग असेच कधीतरी त्यांची आठवण होते आणि मनात या शब्दाविषयी आपलेपणा खूप वाटू लागतो, पण त्याला खूप उशीर झालेला असतो पुन्हा त्यांचा वापर आपल्यालाही अवघडल्यासारखा वाटतो आणि मग या आवडत्या शब्दांच्या आठवणीत रमण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.

                 याप्रमाणे अनेक शब्द भाषा बदलाच्या टप्प्यावर नामशेष झाले आहेत. कदाचित हा भाषा बदल व वापराचा परिणाम असेल, पण असे बरेच शब्दप्रयोग पिढी जोडण्याची दुवे म्हणून कार्यरत होते. बोलण्यासाठी, संभाषणासाठी, लिखाणासाठी त्यांना एक विशिष्ट मानाचे स्थान होते. हे वाचत असताना तुमचे मनात असे काही शब्द, शब्दप्रयोग, म्हणी, वाक्यप्रचार नक्की आले असतील जे तुमच्या सध्या वापरात नसले तरी आठवणीच्या कोपऱ्यात नक्कीच विशेष स्थानी असतील. अशा शब्दांची पुन्हा आठवण करून त्यांना उजाळा देऊया. तुमच्या आठवणीतील तुमच्या जवळचे पण सध्या कालबाह्य शब्द कोणते हे मला नक्की कमेंट करून सांगा........

धन्यवाद.....

------------------------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी

9730410154

sandip.koli35@gmail.com


 


No comments:

Post a Comment

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...