Wednesday, 24 June 2020

हम हिंदुस्तानी We Are Indians

हम हिंदुस्तानी

 

छोडो कल की बाते

कल की बात पुरानी

नये दौर में लिखेंगे

मिलकर नयी  कहानी

हम हिन्दुस्तानी

                            हे गाणं आपल्याला नेहमीच प्रेरित करते. या गाण्याचे शब्द आपल्या चेहर्‍यावर अभिमान आणि अंगावर रोमांच उभे करतात. आपल्या कार्यानेकर्तृत्वाने आपण सामर्थ्याच्या जोरावर आधुनिक भारताची बांधणी करून नवनिर्माण करू शकतो हा विश्वास निर्माण करतात. नव्या व आधुनिक भारताचे आपण शिल्पकार आहोत ही भावना वाढीस लावतात. आपले रक्त देशभक्तीच्या भावनेने सळसळू लागते व देशासाठी आपल्या जीवाची बाजी लागली तरी हरकत नाही याचा अभिमान वाटू लागतो.

                        आपण भारतीय असण्याच्या ओळखीला पूर्ण जगभरात आदराने पाहिले जाते. आपली गुणवत्ता व कौशल्य या गुणांची दखल संपूर्ण जगाने घेतली व अनुभवली आहे.

      आता आपल्याला प्रश्न पडला असेल हे आजका ?

 देशभक्ती सारख्या एकदम जिव्हाळ्याच्या विषयावर का?

                      उत्तर सोपे आहे. सध्या दोन युद्धजन्य व तणावजन्य परिस्थिती सुरू आहेत.  एक भारत-चीन सैनिकांमध्ये दोन्ही देशांच्या सरहद्दीवर तर दुसरे आपल्या-आपल्यातच म्हणजे व्हाट्सअप,फेसबुक, ट्विटर यासारख्या सोशल माध्यमावर. आता तुम्हाला विषय व संदर्भ दोन्ही लक्षात आले असेल. आतापर्यंत खूप सार्‍या चर्चेतून हा विषय ढवळून निघाला आहे, पण या सर्वात आपली भूमिका काय हे खूप महत्त्वाचे आहे.

                           आपल्याकडे गुणवत्ता, मेहनत, सचोटी, निष्ठा यासारख्या गुणांची अजिबात कमतरता नाही, पण यशाचे शिखर आपण अजून गाठले नाही. यातच चीन  सारखे महत्त्वाकांक्षी शेजारी सुसाट वेगाने पुढे चालले आहे. आता गरज आहे आपली देशभक्ती दाखवण्याची आणि देशभक्ती जगण्याची. शाहरुख खानच्या ‘चक दे’ सिनेमातील एका प्रसंगाप्रमाणे आपण राज्याचे, गावाचे प्रतिनिधी नसून प्रथम भारताचे आहोत हे दाखवून देण्याची. राष्ट्रसेवेला पूर्णवेळ वाहून घेणे किंवा बॉर्डरवर जाऊन सैनिकाप्रमाणे लढणे प्रत्येकाला शक्य नाही, पण आपण करत असलेले काम व आपली कृती राष्ट्राच्या हितासाठी असणे खूप महत्त्वाचे आहे.

                         आपल्या प्रत्येक काम हे राष्ट्राच्या सदुपयोगी पडेल याकडे आपण सर्वांनी लक्ष दिले पाहिजे. आपल्या बुद्धीच्या व गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्राला पुढे नेण्यासाठी झटले पाहिजे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ ते फक्त प्रतिज्ञासाठी लक्षात न ठेवता ते आचरणात आणले पाहिजे. शक्य तितक्या स्वदेशी गोष्टींचा वापर व कमीत-कमी विदेशी वस्तू वापरायला हव्यात. अशा विदेशी वस्तूला पर्यायी स्वदेशी वस्तू निर्माण करायला हव्यात.

                           देशभक्ती हा साजरा करायला काही Event,उत्सव नाही तर ती आपल्या जगण्याची सवय बली पाहिजे. कधीतरी अशा युद्धजन्य व तणावजन्य परिस्थितीत दिवाळी-ईद सणाप्रमाणे ती उफाळून  येण्यापेक्षा ती आपल्या आचरणात आणली पाहिजे.जपान सारख्या देशाच्या प्रगतीचे जेव्हा आपण दाखले देतो, त्यावेळी त्यांच्या यशाचा खरा पाया हा देशभक्ती व प्रचंड देशप्रेम हाच आहे.

                          दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा आपण आपली योग्यता वाढवणे हाच खरा उपाय आहे. दुसऱ्याचा वेग कमी करण्यापेक्षा आपली गती वाढवणे हे यशस्वी देशाचे लक्षण आहे. सर्वात तरुण देश म्हणून जग आपल्याकडेच पाहते तो विश्वास आपण खरा करून दाखवला पाहिजे. देशभक्तीची ज्योत आपल्यात कायम तेवत ठेवली पाहिजे.

                   शेवटी देशभक्ती म्हणजे देशाच्या हितासाठी व त्याच्या सार्वभौमत्वासाठी सदैव तत्पर राहणे हाच खरा राष्ट्रधर्म आहे. फक्त सोशल मीडियावर भांडून, पोस्ट फॉरवर्ड करून देशभक्ती दाखवण्यापेक्षा आपल्या आचरणातून ती जगली पाहिजे. कारण देशभक्ती ही दाखवण्याची नाही तर जगण्याची बाब आहे. बाकी आपण भारतीय एक आहोच.

 ------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदीप कोळी.

9730 410154

sandip.koli35@gmail.com


 

2 comments:

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...