गणेश उत्सव
आयुष्याचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर आपल्याला एखादा छंद जरूर असावा.अस माझ
पक्क मत आहे. कारण जगण्याच्या पळापळीत आणि धावपळीत हेच छंद आपल्याला विरंगुळा
मिळवून देतात. सध्या कोविड १९ मुळे आपल्याकडे वेळच –वेळ आहे त्यामुळे आपल्या
छंदांना आणखी खतपाणी मिळाले आहे तर काही नवीन छंदाची भर ही पडली असेल.
कळायला
लागल्या पासून दिवाळी नंतर चा सर्वात मोठा सण आणि उत्सव म्हणजे 'गणपती'. हळू-हळू वय वाढेल तसे व विज्ञानाच्या प्रभावामुळे मोठ्या
गणपतीचे आकर्षण कमी झाले व पर्यावरणपूरक गणपती उत्सव असावा अशी इच्छा वाढू लागली. काळाबरोबर
विचार व निर्णयाचे स्वातंत्र व अधिकार स्वतःकडे आले व वाटू लागले की आपण हि
गणपतीची मूर्ती घरीच करूया
गेल्या काही वर्षापासून
हे वाटने प्रत्यक्षात उतरवायचे ठरवले. नेहमी प्रमाणे याही वर्षी गणपतीची मूर्ती घरी करायची हे नक्की होते. सतत
होणारे लॉक डाऊन ,कधी बंद कधी सुरु यामुळे साहित्याच्या उपलब्धतेसाठी धावपळ नको
म्हणून लवकर सुरुवात केली. लागणारी माती, रंग व इतर साहित्य जुलै महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात एकत्र केले. यावर्षी वेळ खूप होता त्यामुळे लवकर सुरुवात केली.
मूर्ती तयार झाली. 'चुकातून शिका' या
सूत्राने मागीलवर्षी राहिलेल्या गोष्टी या वर्षी आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न
केला आहे. पूर्ण पणे आकर्षक नैसर्गिक रंगात रंगवून तयार झाली आहे. मनाला भावेल अशी सुंदर मूर्ती तयार झाली.
गणपती तयार करतानाचा
व्हिडीओ करायचा होता पण काही कारणाने शक्य होत नव्हते पण यावर्षी ते ही शक्य झाले.
https://www.youtube.com/playlist?list=PLQOadBXrhXFR1a7i446uRhKehHeRdsb2R
YouTube वर त्याला
चांगली पसंती मिळाली. याचा फायदा असा झाला की यावर्षी अनेक जणांनी प्रयत्न करून
घरी गणपतीची मूर्ती बनवली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीसाठी
आपण निमित होणे ही बाब सुखावणारी आहे.
पण यासगळ्या प्रक्रियेमध्ये
मिळणारा आनंद मोठा होता. आपल्याकडे आता इको-फ्रेंडली मूर्ती उपलब्ध होतात. गोष्ट
पैशाची नसते वा असणार ही नाही. ही सर्व प्रक्रिया घडण्यापर्यंतची भावना व
स्वनिर्मितीतून मिळणार आंनद हे शब्दात नाही मांडता येत. ते फक्त अनुभवता येते.
म्हणून तुम्ही ही प्रयत्न करा.. 'करके देखो अच्छा लगता है....'
संदीप कोळी
9730410154
It's really fantastic efforts
ReplyDeleteCharity begins at home.
In the same way you are serving the environment.
Such eco-friendly initiative are very necessary in present. Well done and best wishes to you Sandip