Sunday, 16 August 2020

एम.एस धोनी-द लीडर M.S.Dhoni The Leader

एम.एस धोनी द टोल्ड स्टोरी  M.S.Dhoni The Told Story

काय राव, ह्येला काय अर्थ हाय.......

                अस कुठ असतंय व्हय........ हे २०२० वरीस लय बाद राव. एक वाईट बातमीतून बाहीर पडत नाय तवर दुसरी त्येच्या पेक्षा बाद बातमी इतिया. आता कालची धोनीच्या रिटायरमेंटची बातमी बघा की राव......

               काल ह्याच येळेला इस्टाग्राम वर धोनीचा व्हीडीओ आला आणि राहिलेल्या दिलाचे पण हजार तुकडे झाले राव....... याला आता २४ तास होत आलं तरीबी अजून खर वाटत नाय.

                किरकेट मधी कितीबी बाप हून गेली, आता असली अन पुढ बी आली तरी धोनी भारी अन येगळा होता हे समद्यास्नी मान्य करावच लागल. तस किरकेट बगायला अन कळायला लागल तवा लय मातब्बर किरकेटर हुती आपल्यात, पण २००३ ला पोंटिंग च्या स्प्रिंगच्या ब्याटनं आपल्याला घुमिवल तवा पसन किरकेट वरच लव्ह जरा कमीच होत.

               २००४ मधी धोनी आला तवा बी लय काय वाटल नव्हत, तेच्या केसामुळ आणि १८३ रनच्या मूळ वेगळ वाटला हुता पण त्यावेळी लय येत हुती आणि जात हुती. आपण धोनीच फ्यान झालो ते २००७ च्या २०-२० वल्ड-कप वेळी. पहिल्यापासूनच आपण जिकू अस वाटत हुत पण फायनल ला फायनल ओव्हर जोगिंदर ला दिल्यावर तुमच्यासारख आम्ही बी शिव्या घातल्या हुत्या पण आपण वल्ड-कप जिकला आणि धोनी क्याप्टन कुल झाला.

              नवीन फॉर्माट त्यात धोनी बाप माणूस झाला. त्यातच IPLआलं आणि किरकेट ची क्रेझ वाढली त्यात CSK तर टीम = धोनी हेच गणित आजपर्यंत सुरु हाय. २००७ पासन भारतीय टीम मधी कमालीच बदल झाल. मैदानावर आल्यावर जिंकणारच हेच वाटू लागलं यामाग धोनी नावाचा करिश्मा होता. २०११ ला तर चमत्कारच झाला. २८ वर्षाचा दुश्काळ धोनीच्या त्या सिक्स न मिटला अन आपण वल्ड-कप जिकला. त्यानंतर च्याम्पियान ट्रॉफी पण आपण खिशात घातली. एक एक करून धोनी ने यशाची शिखर पार केली व हळूच उतरली पण, पहिल्यांदा टेस्ट, नंतर कप्टनसी अन आता रिटायरमेंट.

             १६-१७ वर्षाच्या या त्याच्या खेळात कायम नवीनत दिसली. त्याला किरकेट च्या खेळाच्या पुस्तकातील शॉट खेळता येत नसले तरी त्याच्या हेलीकोप्टरसाठी अनेक जण मैदानात व टीव्ही समोर बसत होते. जिंकायला शेवटी किती बॉल अन किती रना यापेक्षा धोनी हाय म्हंटल्यावर आपण जीकणार हे शेवटपर्यत वाटायचं अन धोनीन बी अशा लय जिकून दिलत्या. धोनीला ला विकेट कीपिंग येत नाय अस म्हणणारी आता त्याच्या कीपिंगच मोठ्मोत्याने कौतुक करतायत. स्टम्पच्या माग जादू करावी ती धोनीनच . कॅप्टन धोनी हा जगात खास हुता अन हाय. त्याच्या विचित्र निर्णयावर टीका व्हायची पण ते खरे करायची क्षमता त्याच्याकडे होती.

                 धोनी काल रिटायर झाला असला तरी त्यान आपल्या सारख्या सामान्य लोकांना लय मोठ्या गोष्टी शिकवल्या. धोनीन मोठी स्वप्न बघायला शिकवलं. तिकीट कलेक्टर ते आज जगातला एक मोठा खेळाडू हा प्रवास थक्क करणारा हाय. कितीबी कठीण परिस्थितीत शांत राहून आपन घेतलेलं  निर्णय खर करायला शिकवलं. लय टीका झाली तरी आपण टिच्चून खेळायचं हे धोनीन शिकवलं. एवढ्या मोठ्या करियर मधी फिट कस राहायचं हे बी धोनी कडून  शिकायला हव त्यासाठी लय कौतुक बी कधी केल नाय. खेळात जिकायची सवय धोनीन लावली. नवीन नवीन मार्ग शोधायचं हे त्यांनाच आपल्याला शिकवलं. keep it Simple https://thesandipkoli.blogspot.com/2019/07/keep-it-simple.htmlम्हणत साध राहून मुसंडी मारायला त्यांनाच शिकवलं. टीमवर्क काय असत व टीम चालवायची कशी ते बी त्यान दाखवल. लीडर कसा असावा हे त्याच्याकड बघितल की कळत. साध्या गावातून पण मोठा खेळाडू होता येत हे त्यान दाखवून दिल.  

                 आता लय जण त्याची माप काढत्यात. ती काय सगळ्याचीच काढता येतात. त्यात लांबड लावायची गरज नाय हाय परतेकाच वेगळ महत्व हाय. धोनी ब्याटसमन, धोनी विकेट कीपर अन धोनी कॅप्टन म्हणून भारतीय किरकेट ला दिलेलं योगदान आपण विसरू शकत नाय. तो जगात भारी आणि वल्ड फेमस हाय हे नक्की.

                 धोनीच्या या कारकिर्दीत त्याने आपल्याला अनेक आनंदाचे व अविस्मरणीय क्षण दिले ते कोणताही क्रिकेट रसिक विसरणार नाही. त्याच्या पुढच्या इनिगला खूप शुभेच्छा...

                 आपल्याला रवी शास्त्री सारख इंग्लिश येत नाय पण शेवटी Dhoni finishes off in Style. तो आला, तो खेळला,  तो जिंकला आणि शांत पणे तो निघून गेला.

Miss You Mahi........

धोनीचे स्केच पाहण्यासठी क्लिक करा 

https://youtu.be/qOSzsNKwLDE

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

संदिप कोळी

9730410154

sandip.koli35@gmail.com 


 

 

            

13 comments:

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...