Sunday, 30 August 2020

Teacher's Day ( English Essay)

 

Teacher's Day

'A good Teacher is like a Candle.

It consumes itself to light the way for others.'

            Our teacher is the deity who gives the right turn to the car of life after our first guru, the parents.

             The Guru-Shishya tradition is an integral part of Indian culture. Teachers have been respected and important in our country since ancient times. September 5 is celebrated as Teacher's Day in our country. On the occasion of Former President of India Dr.  Sarvapalli Radhakrishnan's birthday. This day is celebrated as Teacher's Day to pay respect and glorify the teacher.

              Teachers have an important place in each of our lives. There is a special respect for teachers in the society. Teachers have made a valuable contribution in nation building. The journey that started with the teachers after going to school after stepping out of the safe environment at home continues till we stand on our own feet with dignity. Teachers teach us to swim in the ocean of knowledge by removing the fears in our minds and filling our eyes with confidence.

             It starts with A, B, C, D and continues till success in our life. The future of any country is in the hands of the teachers of that country. Teachers are responsible for creating a bright generation for the country by producing many students like doctors, scientists, engineers, lawyers, police, writers, innovative Farmer who are needed for the betterment of the country. Similarly, teachers are creating a powerful and receptive generation for the country.

            After the parents, only the teachers understand us and impart new knowledge. Our teachers are a big part of  our  life. In addition to imparting knowledge to us, our teachers play an important role in shaping our personality, in making us receptive, in disciplining us. Our teachers teach us to stand up to the world with confidence by enriching ourselves with all the virtues.

              Teachers Day is celebrated to understand the importance of teachers in our lives. In many schools, colleges students pay their respects to the teachers by giving them flowers, bouquets, gifts and gift cards. In addition, various cultural events are organized. Students express concerns about teachers. In many places, students become teachers themselves on Teacher's Day and play the role of enlightenment.

              This teacher-students relationship is sacred. Teachers are like parents after parents. Times have changed, new tools have come, but the importance of Gurus and Teachers is not diminishing and will not be. No one can take the place of the teacher in the mind of every student.

              September 5th is a day to express our gratitude to our teachers who shaped us and enlightened us. We cannot be free from the debt of our teachers, but on the occasion of this Teacher's Day, let us remain indebted to them and glorify and respect their work.

 Thank you...

------------------------------------------------------------------

Sandip Koli

sandip.koli35@gmail.com

शिक्षक दिवस (हिंदी निबंध)

 

शिक्षक दिवस

"गुरुविण कोण दाखविल वाट,

आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर-घाट'

            हमारे शिक्षक हमारे प्रथम गुरु, माता-पिता के बाद जीवन की गाडी को सही मोड़ देने वाले देवता हैं।

             गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृति का अभिन्न अंग है। हमारे देश में प्राचीन काल से शिक्षकों का सम्मान और महत्व रहा है। 5 सितंबर हमारे देश में शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है। भारत के पूर्व राष्ट्रपति डॉ। सर्वपल्ली राधाकृष्णन के जन्मदिन के अवसर पर, इस दिन को शिक्षक को आदर अर्पित करने और उन्हें गौरवान्वित करने के लिए शिक्षक दिवस के रूप में मनाया जाता है।

              हमारे प्रत्येक जीवन में शिक्षकों का महत्वपूर्ण स्थान है। समाज में शिक्षकों का एक विशेष सम्मान है। शिक्षकों ने राष्ट्रबनाने और राष्ट्रनिर्माण में अपना बहुमूल्य योगदान दिया है। घर पर सुरक्षित वातावरण से बाहर निकलने और शिक्षकों के साथ जारी रखने के बाद स्कूल जाने तक की यात्रा तब तक जारी रहती है जब तक आप अपने खुद के दो पैरों पर गरिमा के साथ खड़े नहीं होते। शिक्षक आपको अपने मन के भय को दूर करके और आँखों को आत्मविश्वास से भरकर ज्ञान के सागर में तैरना सिखाते हैं।

             यह अ, , , ई से शुरू होता है और हमारे जीवन में सफलता तक जारी रहता है। किसी भी देश का भविष्य उस देश के शिक्षकों के हाथों में होता है। शिक्षकों का दायित्व है कि वे डॉक्टर, वैज्ञानिक, इंजीनियर, वकील, पुलिस, लेखक, सुजान शेतकरी जैसे कई छात्रों को तय्यार करके देश के लिए एक उज्ज्वल पीढ़ी का निर्माण करें, जिनकी देश की भलाई के लिए आवश्यकता है। इसी तरह, शिक्षक देश के लिए एक शक्तिशाली और ग्रहणशील पीढ़ी का निर्माण कर रहे हैं।

            माता-पिता के बाद, शिक्षक हमको समझते हैं और नया ज्ञान प्रदान करते हैं। हमारे शिक्षक हमारे जीवन का एक बड़ा हिस्सा हैं। हमारे लिए ज्ञान प्रदान करने के अलावा, हमारे शिक्षक हमारे व्यक्तित्व को आकार देने में, हमें अनुशासित करने में, हमें ग्रहणशील बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। हमारे शिक्षक हमें सभी गुणों के साथ खुद को समृद्ध करके विश्वास के साथ दुनिया के लिए खड़े होना सिखाते हैं।

              हमारे जीवन में शिक्षकों के महत्व को समझने के लिए शिक्षक दिवस मनाया जाता है। कई स्कूलों, कॉलेजों और महाविद्यालयो में, छात्र अपने शिक्षकों को फूल, गुलदस्ते, उपहार और उपहार कार्ड देकर उनका सम्मान करते है । इसके अलावा, विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित किए जाते हैं। छात्र शिक्षकों के बारे में अपनी भावनाए व्यक्त करते हैं। कई स्थानों पर, छात्र शिक्षक दिवस पर स्वयं शिक्षक बन जाते हैं और अध्यापन की भूमिका निभाते हैं।

              यह गुरू-शिष्य का रिश्ता पवित्र है। माता-पिता के बाद शिक्षक माता-पिता की तरह होते हैं। समय बदल गया है, नए उपकरण आ गए हैं, लेकिन गुरुओं और शिक्षकों का महत्व कम नहीं है और न ही होगा। हर छात्र के मन में शिक्षक की जगह कोई नहीं ले सकता।

              5 सितंबर, हमारे शिक्षकों के प्रति आभार व्यक्त करने के लिए एक दिन है जिन्होंने हमें आकार दिया और हमें प्रबुद्ध किया। हम अपने शिक्षकों के ऋण से मुक्त नहीं हो सकते हैं, लेकिन इस शिक्षक दिवस के अवसर पर, हम हमेशा उनके ऋण में रहें और उनके कार्यों का गौरव और सम्मान करें।

 धन्यवाद....

..........................................................................................................................................

संदिप कोळी.

sandip.koli35@gmail.com

शिक्षक दिन (मराठी निबंध )Teachers Day

 

शिक्षक दिन

"गुरुविण कोण दाखविल वाट,

आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर-घाट"

               आई-वडील या आपल्या पहिल्या गुरु नंतर आयुष्याच्या गाडीला योग्य वळण देणारी देवता म्हणजे आपले शिक्षक होय.

             गुरु-शिष्य परंपरा हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासून शिक्षकांना मानाचे व महत्त्वाचे स्थान आहे. 5 सप्टेंबर हा दिवस आपल्या देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त शिक्षकाप्रति आदर व्यक्त करण्यासाठी व त्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.

              आपल्या प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकांचे एक महत्त्वाचे स्थान आहे. समाजामध्ये शिक्षकाविषयी एक विशेष आदर आहे. राष्ट्र घडविण्यामध्ये व राष्ट्रनिर्माणयामध्ये शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. घरातील सुरक्षित वातावरणातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर शाळेत गेल्यापासून शिक्षकांबरोबर घडण्याचा सुरू झालेला हा प्रवास स्वतःच्या पायावर सन्मानाने उभे राहण्यापर्यंत सतत सुरू असतो. आपल्या मनातील भीती दूर करून आपल्या नजरेत आत्मविश्वास भरून ज्ञानसागरामध्ये तरुन राहायला शिक्षक आपल्याला शिकवतात.

             , , , ई पासून सुरू झालेली ही सुरुवात आपल्या आयुष्यात यशस्वीते पर्यंत चालूच असते. कोणत्याही देशाचे भवितव्य हे देशातील शिक्षकांच्या हाती असते.  देशाच्या उन्नतीसाठी लागणारे डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनीअर, वकील, पोलिस, लेखक, सुजान शेतकरी यासारखे अनेक विद्यार्थी घडवून देशासाठी उज्वल पिढी घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्यावर असते. त्याप्रमाणे शिक्षक देशासाठी सामर्थ्यवान व संस्कारक्षम पिढी घडवीत असतात.

            आई-वडिलांच्यानंतर शिक्षकच आपल्याला समजावून घेऊन नवनवीन ज्ञान देत असतात. आपल्या जडणघडणीमध्ये आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो. आपल्याला ज्ञान देण्याबरोबरच आपले व्यक्तिमत्व घडविण्यामध्ये, आपल्याला संस्कारक्षम बनविण्यामध्ये, आपल्याला शिस्त लावण्यामध्ये आपल्या शिक्षकांचा मोलाचा वाटा असतो.  सर्व गुणांनी संपन्न बनवून जगासमोर आत्मविश्वासाच्या ताकदीने उभे राहण्यास आपले शिक्षक आपल्याला शिकवतात.

              आपल्या जीवनातील शिक्षकांचे हेच महत्व समजून घेण्यासाठी शिक्षक दिन साजरा करतात. अनेक शाळा, कॉलेज, महाविद्यालयांमध्ये शिक्षकाप्रति आदर व सदभावना व्यक्त करण्यासाठी या दिवशी विद्यार्थी शिक्षकांना फुल, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, भेट कार्ड देऊन त्यांचा सन्मान करतात. त्याबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतात. शिक्षकांविषयी विद्यार्थी मनोगते व्यक्त करतात. अनेक ठिकाणी विद्यार्थी शिक्षक दिनाच्या दिवशी स्वतः शिक्षक होऊन ज्ञानदानाचे काम बजावतात.

              गुरू-शिष्याचे हे नाते पवित्र आहे. आई-वडिलांच्या नंतर शिक्षक हे पालकासमान असतात.  काळ बदलला, नवनवीन साधने आली तरी गुरुचे,  शिक्षकांचे महत्त्व कमी होत नाही व होणार नाही.  प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनातील शिक्षकाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही.

              5 सप्टेंबर हा आपल्याला घडवणाऱ्या व आपल्याला ज्ञानामृत देणाऱ्या आपल्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण आपल्या शिक्षकाच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण या शिक्षक दिनाच्या निमित्ताने कायम त्यांच्या ऋणात राहून त्यांच्या कार्याचा गौरव व  आदर नक्की करूया.

 धन्यवाद...

--------------------------------------------------------------------------------

संदिप कोळी.

sandip.koli35@gmail.com


Friday, 21 August 2020

गणेश उत्सव Ganpati Festival

 

गणेश  उत्सव

                   आयुष्याचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर आपल्याला एखादा छंद जरूर असावा.अस माझ पक्क मत आहे. कारण जगण्याच्या पळापळीत आणि धावपळीत हेच छंद आपल्याला विरंगुळा मिळवून देतात. सध्या कोविड १९ मुळे आपल्याकडे वेळच –वेळ आहे त्यामुळे आपल्या छंदांना आणखी खतपाणी मिळाले आहे तर काही नवीन छंदाची भर ही पडली असेल.

   कळायला लागल्या पासून दिवाळी नंतर चा सर्वात मोठा सण आणि उत्सव म्हणजे 'गणपती'.  हळू-हळू वय वाढेल तसे व विज्ञानाच्या प्रभावामुळे मोठ्या गणपतीचे आकर्षण कमी झाले व पर्यावरणपूरक गणपती उत्सव असावा अशी इच्छा वाढू लागली. काळाबरोबर विचार व निर्णयाचे स्वातंत्र व अधिकार स्वतःकडे आले व वाटू लागले की आपण हि गणपतीची मूर्ती घरीच करूया


                    गेल्या काही वर्षापासून हे वाटने प्रत्यक्षात उतरवायचे ठरवले. नेहमी प्रमाणे याही वर्षी गणपतीची मूर्ती घरी करायची हे नक्की होते. सतत होणारे लॉक डाऊन ,कधी बंद कधी सुरु यामुळे साहित्याच्या उपलब्धतेसाठी धावपळ नको म्हणून लवकर सुरुवात केली. लागणारी माती, रंग व इतर साहित्य जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एकत्र केले. यावर्षी वेळ खूप होता त्यामुळे लवकर सुरुवात केली.

                  मूर्ती तयार झाली. 'चुकातून शिका'  या सूत्राने मागीलवर्षी राहिलेल्या गोष्टी या वर्षी आवर्जून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. पूर्ण पणे आकर्षक नैसर्गिक रंगात रंगवून तयार झाली आहे.  मनाला भावेल अशी सुंदर मूर्ती तयार झाली.


                       गणपती तयार करतानाचा व्हिडीओ करायचा होता पण काही कारणाने शक्य होत नव्हते पण यावर्षी ते ही शक्य झाले. https://www.youtube.com/playlist?list=PLQOadBXrhXFR1a7i446uRhKehHeRdsb2R

YouTube वर त्याला चांगली पसंती मिळाली. याचा फायदा असा झाला की यावर्षी अनेक जणांनी प्रयत्न करून घरी गणपतीची मूर्ती बनवली. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. चांगल्या गोष्टीसाठी आपण निमित होणे ही बाब सुखावणारी आहे.

                 पण यासगळ्या प्रक्रियेमध्ये मिळणारा आनंद मोठा होता. आपल्याकडे आता इको-फ्रेंडली मूर्ती उपलब्ध होतात. गोष्ट पैशाची नसते वा असणार ही नाही. ही सर्व प्रक्रिया घडण्यापर्यंतची भावना व स्वनिर्मितीतून मिळणार आंनद हे शब्दात नाही मांडता येत. ते फक्त अनुभवता येते. म्हणून तुम्ही ही प्रयत्न करा.. 'करके देखो अच्छा लगता है....'

 -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

संदीप कोळी

9730410154

sandip.koli35@gmail.com


 

Sunday, 16 August 2020

एम.एस धोनी-द लीडर M.S.Dhoni The Leader

एम.एस धोनी द टोल्ड स्टोरी  M.S.Dhoni The Told Story

काय राव, ह्येला काय अर्थ हाय.......

                अस कुठ असतंय व्हय........ हे २०२० वरीस लय बाद राव. एक वाईट बातमीतून बाहीर पडत नाय तवर दुसरी त्येच्या पेक्षा बाद बातमी इतिया. आता कालची धोनीच्या रिटायरमेंटची बातमी बघा की राव......

               काल ह्याच येळेला इस्टाग्राम वर धोनीचा व्हीडीओ आला आणि राहिलेल्या दिलाचे पण हजार तुकडे झाले राव....... याला आता २४ तास होत आलं तरीबी अजून खर वाटत नाय.

                किरकेट मधी कितीबी बाप हून गेली, आता असली अन पुढ बी आली तरी धोनी भारी अन येगळा होता हे समद्यास्नी मान्य करावच लागल. तस किरकेट बगायला अन कळायला लागल तवा लय मातब्बर किरकेटर हुती आपल्यात, पण २००३ ला पोंटिंग च्या स्प्रिंगच्या ब्याटनं आपल्याला घुमिवल तवा पसन किरकेट वरच लव्ह जरा कमीच होत.

               २००४ मधी धोनी आला तवा बी लय काय वाटल नव्हत, तेच्या केसामुळ आणि १८३ रनच्या मूळ वेगळ वाटला हुता पण त्यावेळी लय येत हुती आणि जात हुती. आपण धोनीच फ्यान झालो ते २००७ च्या २०-२० वल्ड-कप वेळी. पहिल्यापासूनच आपण जिकू अस वाटत हुत पण फायनल ला फायनल ओव्हर जोगिंदर ला दिल्यावर तुमच्यासारख आम्ही बी शिव्या घातल्या हुत्या पण आपण वल्ड-कप जिकला आणि धोनी क्याप्टन कुल झाला.

              नवीन फॉर्माट त्यात धोनी बाप माणूस झाला. त्यातच IPLआलं आणि किरकेट ची क्रेझ वाढली त्यात CSK तर टीम = धोनी हेच गणित आजपर्यंत सुरु हाय. २००७ पासन भारतीय टीम मधी कमालीच बदल झाल. मैदानावर आल्यावर जिंकणारच हेच वाटू लागलं यामाग धोनी नावाचा करिश्मा होता. २०११ ला तर चमत्कारच झाला. २८ वर्षाचा दुश्काळ धोनीच्या त्या सिक्स न मिटला अन आपण वल्ड-कप जिकला. त्यानंतर च्याम्पियान ट्रॉफी पण आपण खिशात घातली. एक एक करून धोनी ने यशाची शिखर पार केली व हळूच उतरली पण, पहिल्यांदा टेस्ट, नंतर कप्टनसी अन आता रिटायरमेंट.

             १६-१७ वर्षाच्या या त्याच्या खेळात कायम नवीनत दिसली. त्याला किरकेट च्या खेळाच्या पुस्तकातील शॉट खेळता येत नसले तरी त्याच्या हेलीकोप्टरसाठी अनेक जण मैदानात व टीव्ही समोर बसत होते. जिंकायला शेवटी किती बॉल अन किती रना यापेक्षा धोनी हाय म्हंटल्यावर आपण जीकणार हे शेवटपर्यत वाटायचं अन धोनीन बी अशा लय जिकून दिलत्या. धोनीला ला विकेट कीपिंग येत नाय अस म्हणणारी आता त्याच्या कीपिंगच मोठ्मोत्याने कौतुक करतायत. स्टम्पच्या माग जादू करावी ती धोनीनच . कॅप्टन धोनी हा जगात खास हुता अन हाय. त्याच्या विचित्र निर्णयावर टीका व्हायची पण ते खरे करायची क्षमता त्याच्याकडे होती.

                 धोनी काल रिटायर झाला असला तरी त्यान आपल्या सारख्या सामान्य लोकांना लय मोठ्या गोष्टी शिकवल्या. धोनीन मोठी स्वप्न बघायला शिकवलं. तिकीट कलेक्टर ते आज जगातला एक मोठा खेळाडू हा प्रवास थक्क करणारा हाय. कितीबी कठीण परिस्थितीत शांत राहून आपन घेतलेलं  निर्णय खर करायला शिकवलं. लय टीका झाली तरी आपण टिच्चून खेळायचं हे धोनीन शिकवलं. एवढ्या मोठ्या करियर मधी फिट कस राहायचं हे बी धोनी कडून  शिकायला हव त्यासाठी लय कौतुक बी कधी केल नाय. खेळात जिकायची सवय धोनीन लावली. नवीन नवीन मार्ग शोधायचं हे त्यांनाच आपल्याला शिकवलं. keep it Simple https://thesandipkoli.blogspot.com/2019/07/keep-it-simple.htmlम्हणत साध राहून मुसंडी मारायला त्यांनाच शिकवलं. टीमवर्क काय असत व टीम चालवायची कशी ते बी त्यान दाखवल. लीडर कसा असावा हे त्याच्याकड बघितल की कळत. साध्या गावातून पण मोठा खेळाडू होता येत हे त्यान दाखवून दिल.  

                 आता लय जण त्याची माप काढत्यात. ती काय सगळ्याचीच काढता येतात. त्यात लांबड लावायची गरज नाय हाय परतेकाच वेगळ महत्व हाय. धोनी ब्याटसमन, धोनी विकेट कीपर अन धोनी कॅप्टन म्हणून भारतीय किरकेट ला दिलेलं योगदान आपण विसरू शकत नाय. तो जगात भारी आणि वल्ड फेमस हाय हे नक्की.

                 धोनीच्या या कारकिर्दीत त्याने आपल्याला अनेक आनंदाचे व अविस्मरणीय क्षण दिले ते कोणताही क्रिकेट रसिक विसरणार नाही. त्याच्या पुढच्या इनिगला खूप शुभेच्छा...

                 आपल्याला रवी शास्त्री सारख इंग्लिश येत नाय पण शेवटी Dhoni finishes off in Style. तो आला, तो खेळला,  तो जिंकला आणि शांत पणे तो निघून गेला.

Miss You Mahi........

धोनीचे स्केच पाहण्यासठी क्लिक करा 

https://youtu.be/qOSzsNKwLDE

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- 

संदिप कोळी

9730410154

sandip.koli35@gmail.com 


 

 

            

आज : Today

📝 आज.......       आज 31 डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस. आजच्या दिवसाची प्रत्येकाची feeling वेगळी असते. काही जणांच्या मते आणखी एक वर्ष सरले असे...