Friday, 17 October 2025
मन ही आवरायला घेऊया
Monday, 26 May 2025
संवेदनशील मन
Saturday, 24 May 2025
भावनाशून्यतेच्या जगात Emotionless World
Digital Disconnect (डिजिटल डिस्कनेक्ट)
नात्याची घट्ट गाठ (Relationship Bond)
Tuesday, 31 December 2024
आज : Today
Sunday, 30 June 2024
Leave while you are at the top of the game
Thursday, 13 June 2024
जरा विसावू या वळणावर......
जरा विसावू या वळणावर......
दररोज आपल्याला जाग येते ती
मोबाईलच्या गजरने... डोळे चोळत उठता उठता कधी मोबाईलचा डेटा On होतो कळत ही नाही. मग रात्री 11-12 ला बंद
झालेली नोटिफिकेशनची टिक- टिक पुन्हा भरभर वाजू लागते. सगळी शोधा शोध झाल्यावर
लक्षात येते की रात्रीत फारसं नवीन काही झालेलच नाही. मग थोडेसे हायसे वाटते.
कोणाचा वाढदिवस? कोणाला शुभेच्छा? कोणाचे अभिनंदनाचे स्टेटस ठेवल्यावर आपल्याला प्रवाहात आहे याचे कौतुक
वाटते आणि दिवसाचा प्रवास सुरू होतो.
सकाळचे आपले
आवरून 15 - 20 मिनिटांपूर्वी ठेवलेला फोन पुन्हा हाती
येतो व आपण जगाशी जोडले जातो. स्टेटस, मेसेज आणि
नोटिफिकेशनच्या माध्यमातून मित्र, परिवार आणि दुनिया
आपल्या डोळ्यासमोर दिसते. दिवसभर काम, प्रवास, भेटी, कार्यक्रम या ना अशा अनेक कामात आपण सतत
व्यस्त असतो.
कोणाची भेट झाली की... काय?
काय? च्यापुढे आपला संवाद जात नाही.
आपल्याला गडबड असते. नंतर भेटतो. जरा गडबड आहे. अशा सबबी सांगून आपण काढता पाय
घेतो. समोर असणाऱ्या किंवा आपल्याला भेटावेसे
वाटणाऱ्या व्यक्तीला आपल्याला वेळ देता येत नाही.
जगण्याच्या प्रवासात आपण
इतके व्यस्त झालोय की समोर आहे त्याकडे इच्छा असूनही दुर्लक्ष करून आपण पुढे
जातोय. एक आयुष्य आहे व आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत हे 100% मान्य, पण हे So Called सगळे मिळवण्यात आपली स्वतःची ओढाताण तर होते, पण
ज्याच्यासाठी आपण धावतोय ते सर्व आपल्याला सापडतही नाही आणि सापडलेच तरी आपले
समाधान होत नाही.
जगण्याच्या
धावपळीत कुठेतरी थोडं थांबून, थोडा विसावा हा तितकाच
गरजेच आहे. जगाचे चक्र हे कायम सुरूच असणार आहे. कितीही जोरात धावलो तरी सर्वच
ठिकाणी असणे व मिळणे कठीणच. फक्त या धावपळीत आपली फरपट होऊ नये इतकेच महत्त्वाचे.
पुढे जाणे हे आपल्या
आयुष्याचे ध्येय असले तरी आपल्या सोबतच्यांना पुढे घेऊन जाणे किंवा आपल्याबरोबर
असणाऱ्यांसाठी वेळ देणं ही तितकच महत्त्व आहे. नंतर फोन करतो. नंतर भेटूया. नंतर
बघूया.
सध्या
गडबडीत आहे, वेळ नाही ही कारणे बाजूला ठेऊया.
जगण्याच्या या शर्यतीत नंतर कुणालाच वेळ मिळत नाही व ती वेळ गेल्यावर अपराधीपणाची
भावना कायम आपल्या सोबत राहते म्हणून नंतरपेक्षा आत्ता बोलूया, आत्ता भेटूया, आत्ता बघूया हे महत्त्वाचे आहे.
गीतकार सुधीर मोघेंच्या गीताच्या
सुंदर ओळी मला खूप आवडतात...
'भले बुरे जे घडून गेले'
'विसरून जाऊ सारे क्षणभर'
'जरा विसावू या वळणावर....
'जरा विसावू या वळणावर....
जगण्याच्या प्रवासात कुठेतरी
थोडासा स्वल्पविराम घेऊन थोडसं थांबून स्वतःसाठी व जवळच्यांसाठी विसावा घ्यायला
नक्कीच हरकत नाही.
संदीप कोळी
Sunday, 23 April 2023
थांबा : सिग्नल सायकलसाठीही लागू असतो.
थांबा : सिग्नल सायकलसाठीही लागू असतो.
कोणत्याही गोष्टीची नवलाई ही चार दिवस असते. त्यानंतर ती गोष्ट सवयीची व नंतर ती अंगवळणी पडते. त्याचप्रमाणे इचलकरंजी शहरातील सिग्नलचे नव्याचे नऊ दिवस संपून आता ते सर्व सिग्नल आपल्या सवयीचे झाले आहेत पण अजूनही ते अंगवळणी पडले नाहीत.
सिग्नल ही वाहतुकीच्या नियंत्रणासाठी व शिस्तीसाठी आवश्यक गोष्ट आणि इचलकरंजीसारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी तर ती अत्यावश्यकच. त्यानुसार काही महिन्यापासून इचलकरंजीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही व्यवस्था नियमित कार्यान्वित आहे. ही व्यवस्था वाहनधारकांच्या सवयीची झाली आहे, पण यात सर्वात महत्त्वाची आणि गंभीर बाब म्हणजेच सिग्नल सायकलसाठी असतो हे बाकी सायकलधारकांना पटतच नाही. यात लहानांपासून- थोरांचा समावेश आहे.
इचलकरंजीत सायकल नियमित वापरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यामध्ये कामगार, विद्यार्थी हे संख्येने जास्त आहेत, पण सिग्नलला आपल्या लक्षात येते की सायकल वापरणारे कोणत्याही वयातले असले तरी सिग्नलला मात्र कोणीच थांबत नाही. सिग्नल हा सायकलसाठी नसतोच असा एक गोड गैरसमज आपण सोबत घेऊन जगत आहोत. शिवाय सायकलला सिग्नल मोडल्याचा काही दंड पण होऊ शकत नाही. याचा परिणाम वाहतुकीला अडथळा तर निर्माण होतोच, पण सिग्नल संपल्यानंतर प्रत्येक जण वेगाने जात असतो आणि त्यामुळे भीषण अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. असे जर झाले तर दोष कोणाला देणार????
बाकी सिग्नलच्या एका डाव्या बाजूने जाऊन दुसऱ्या डाव्या बाजूला हळूच निघून जाणे यात वेगळी हुशारी दाखवणाऱ्याची, इतर कारणांनी सिग्नल मोडणाऱ्यांची व वाहतुकीचे नियम विसरणाऱ्याची संख्या कमी नाही.
ते काही असले तरी नियम हे आपल्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी आहेत आणि ते पाळायला हवेत. सायकल ही एक वाहन आहे व रेड सिग्नलला सायकलही थांबणे हे सुरक्षिततेसाठी व अपघात टाळण्यासाठी गरजेचे आहे. शेवटी कोणत्याही कामापेक्षा आपण स्वतः खूप मौल्यवान आहोत.
🖋️ संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
Wednesday, 11 January 2023
प्रेरणादायी जिजाऊ चरित्र
Tuesday, 27 December 2022
आयुष्य समृद्ध करणारा अनुभव....
Wednesday, 30 November 2022
आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत?? - जपानकडून शिकूया
Sunday, 23 October 2022
संयम = विराट कोहली
Tuesday, 18 October 2022
🌈 स्व:अवलोकन : Self Observation
Wednesday, 1 June 2022
And the nest is empty again : आणि घरटं पुन्हा रिकामं झालं.....
आणि
घरटं पुन्हा रिकामं झालं.....
१९ फेब्रुवारी २०२२
पहिल्यांदा गवताची काडी घेऊन ती आली. तसे तर घराच्या अंगणात आम्ही तयार केलेले
लाकडी घरे आहेत, पण ती मोठी स्वाभिमानी, स्वतःचा संसार स्वतः उभा करायचा हा तिचा निश्चय मोठा...
दररोज काड्या, गवत, कापूस अशा तिच्या गरजेचे व घरट्यासाठी लागणाऱ्या
वस्तूने त्या दोघांची धडपड सुरू झाली. दररोज दिवसभर ती दोघे साहित्य आणून आपले
नवीन घरटे गुंफत होते. बघता- बघता ६-७ दिवसात काडी - काडी जोडून त्यांनी छोटीसे
इमले बांधले. एकटी चिमणी बसू शकेल एवढ्या आकाराचे ते छोटेसे घरटे आतून मात्र अगदी
कापसासारखे होते.
चिमणी आता आमच्या घरची झाली होती. दिवसभर बाहेर फिरायची व संध्याकाळ
झाली की एकटीच घरट्यात येऊन बसत होती. या दरम्यान तिने घरट्यात दोन अंडी घातली.
हाच दिनक्रम काही दिवस चालू होता. घरट्यात बसल्यावर चिमणीचे फक्त तोंडच बाहेर दिसत
असे.
अचानक एक दिवस पिल्लांचा चिव-चिवाट ऐकू येऊ लागला. दोन छोटी-छोटी
पिल्लं घरट्यातून हळूच डोकावू लागली. छोटे शरीर, गुलाबी
रंग, छोटी चोच, ती उघडल्यावर लाल
रंगाचे दिसणारे अंतरंग...... पिल्लांचे आई व बाबा दोघे आळीपाळीने येऊन पिलांना
भरवून जात होते.
दिवसभर फक्त पिल्लांचा चिव-चिवाट सुरू असे. आई-बाबा
आल्यावर तर अगदीच गोंधळ.... ओरड.... संध्याकाळी त्या दोन पिल्लांसह चिऊताई त्या
इवल्याशा घरट्यात अगदी निवांत बसायची. सकाळ झाली की रोजचा दिनक्रम सुरू.....
दिवसामागून दिवस पुढे सरकत होते. पिल्ले मोठी होऊ लागली
आणि 20 एप्रिल च्या दरम्यान अचानक सगळं बंद झालं. एक-दोन
दिवस बघितलं पण शांतता.......
ती चिमणी आपल्या दोन लेकरांच्या पंखांना बळ देऊन घरटं रिकामं सोडून निघून
गेली. अवघ्या दोन महिन्यात घरटं रिकामं झालं...
निसर्गाचा काय करिष्मा आहे ना? त्या इवल्याशा
चिमणीने इवलसं घरटं बांधून त्या इवल्याशा घरात दोन इवल्याशा पिलांना जन्म देऊन,
वाढवून त्यांच्या इवल्याशा पंखात आकाश कवेत घेण्याचे स्वप्न
दाखवून त्या इवल्याशा पिल्लांना घेऊन घरटं पुन्हा
रिकामं करून ती कायमची निघून गेली.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
✍️ संदिप...
Sandip.koli35@gmail.com
Tuesday, 11 January 2022
राष्ट्रीय युवक दिन : National Youth Day
आज राष्ट्रीय युवक दिन...
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दिवस....
"दिवसभरात तुमच्या पुढे एकहि समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकहि प्रश्न
पडला नाही तर तुमच्या आयुष्याच्या प्रवास चुकीच्या रस्त्यावरुन सुरु आहे अस
समजायला हरकत नाही"....
हे स्वामी विवेकानंद यांचे
वाक्य पण आजच्या आमच्या पिढीला हे आवडत नाही कारण आम्हाला समस्या नको असतात सगळ्या
गोष्टि झाल्या पाहिजेत आणि त्याही सहज आणि कोणत्याही त्रासाशिवाय मग ती कोणतीही
गोष्ट असो…..
आमच्या तरुण्याला आणखी एक शाप आहे तो
म्हणजे वाट न बघण्याचा. आम्हाला सगळ्या गोष्टी इंस्टेंट लागतात. "सब्र का फल
मीठा होता है।" पण हे 'सब्र'
नावाच फळ पण आम्हाला लगेच हव असते. आणि या साठी आम्ही
काहीही करू शकतो( काहीही चा अर्थ कहिहिच ) मग तो मार्ग so
called सन्मार्ग असो वा नसों.
आजचा युवक हा देशाचा भावी आधारस्तंभ असतो. आणि भारतात
युवकांची संख्या सर्वाधिक आहे. या शक्तीचे केंद्रीकरण होणे गरजेचे आहे. केंद्रीकरण
झाले तर आणि तरच त्या शक्तीचे विधायक कार्यात रूपांतर होऊ शकते. नाही तर सध्या आपण
बघतो की हीच शक्ती कुठल्या मार्गाने आणि
कशी वापरली जाते.
असो आजचे आम्ही तरुण हुशार आहोत, शिक्षित आहोत, (संस्कारित आहोत) त्यामुळे आम्हाला या गोष्टी कळतात पण 'वळत नाहीत'. आम्हाला फ़क्त त्या वळवुन घ्यायाचा प्रयत्न करायचा आहे.
स्वामी विवेकानंद यांना विनम्र अभिवादन व सुधारण्याचे
अभिवचन.....
© संदिप
Tuesday, 14 September 2021
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची....
तू
चाल पुढं तुला र गड्या भीती कुणाची....
इचलकरंजी शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरत असताना दोन दृष्टिहीन दिव्यांग
मुलगा- मुलगी आपल्या चटकन नजरेत आली असतील. अगरबत्ती व कापूर विकणारी ही जोडी
म्हणजे करीम आणि अनिशा. चंदूरला राहत
असणारी ही जोडी दररोज सकाळी 8 वाजल्यापासून
सायंकाळी 5 - 6 वाजेपर्यंत इचलकरंजी शहराच्या मुख्य रस्त्यावर फिरून
अगरबत्ती व कापूर विकून सन्मानाने जगत आहे. अगरबत्ती 15 रुपये व कापूर 10 रुपये या फिक्स दराने या
दोनच वस्तू ते दिवसभर विकतात. स्टँड पासून डेक्कन पर्यंत, तर कधी शाहू पुतळा-ASC कॉलेज पर्यंत, तर कधी जनता चौक, महात्मा गांधी पुतळयापर्यंत,
एकमेकांना आधार देत- एकमेकांचा आधार होत या रहदारीच्या रस्त्यावर
त्यांचा उद्योग मोठ्या आनंदात व उत्साहात सुरू असतो.
करीम पदवीच्या पहिल्या वर्षात तर अनिशा बारावी
कॉमर्स झाली आहे. बोलताना विनम्र व सभ्य बोलणारी ही जोडी जगण्याचा नवा उत्साह
देते.
दोन मिनिटे अंधार झाला तरी आपल्याला
चाचपडायला होते पण आयुष्याच अंधारमय असताना करीम व अनिशा त्यावर मात करून जगण्याचा
नवा मंत्र देतात. सर्व काही असताना एखादी गोष्ट करताना अडचणींचा भला मोठा पाढा
आपल्याला तोंडपाठ असतो. नकाराची इतकी कारणे आपण तयार केलेली असतात की त्या नकाराचे
ओझे आपल्या मानगुटीवर बसलेले असते.
आपल्या सभोवती करीम-अनिशा सारखे
उर्जास्त्रोताचे अखंड झरे पाहिले की
आपल्या नकाराचे मुखवटे आपोआप गळून पडायला हवेत. अडचणी पाहून नकाराची घंटा वाजवत
पळून जाण्यापेक्षा याच अडचणीच्या छाताडावर नाचून त्यावर मात करायला अशी ऊर्जा
स्त्रोत प्रेरणा देतात.
" ये मत कहो खुदा से
मेरी मुश्किलें बड़ी हैं।
इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा
है।"
त्या दोघांकडे बघितले की आपल्या काही अडचणी व समस्या शुल्लक वाटू लागतात.
आयुष्य आव्हानांनी भरलेले असावे आणि अशी सर्व आव्हाने आपल्याला पेलता यावेत ही
सकारात्मक ऊर्जा ही मुलं देतात.
"जो वळखीतसे औक्ष म्हणजी मोठी लडाई
अन
हत्याराच फुलावानी घाव बी खाई
गल्यामंदी
पडल तिच्या माळ इजयाची
तु
चाल पुढ तुला र गड्या भीती कशाची, पर्वा
बी कोणाची"
(टीप- सदर पोस्ट ही आपण त्या दोघांना मदत
करावी म्हणून नाही तर आपल्याला ऊर्जा मिळावी म्हणून लिहिली आहे. बाकी दोघे आत्मनिर्भर,
प्रचंड उत्साही व आपल्या कष्टात व कामात आनंदी आहेत)
---------------------------------------------------------------------------------------------------
संदिप कोळी
Sandip.koli35@gmail.com
(सदर छायाचित्र दोघांची परवानगी घेऊन घेतले आहे.)
Tuesday, 11 May 2021
Such innocence must last : इतकी निरागसता टिकायला हवी
इतकी निरागसता टिकायला हवी....
लॉकडाऊन म्हणजे
सक्तीची सुट्टी. वेळ जात नव्हता म्हणून
शेतात फेरफटका मारायचा बेत ठरला. फिरत असताना सायंकाळी 6 च्या सुमारास शेताच्या एका कोपऱ्यात पक्षांचा गलका सुरू
होता. थोडं बारकाईने बघितल्यावर लक्षात आले की ससाणा खाली बसला होता. सुरुवातीला
वाटले त्याला इजा झालीय म्हणून तो बसला आहे पण पक्ष्याच्या गोंधळामुळे तो उडून जाऊ
लागला पण पायात काहीतरी होते त्यामुळे त्याला उडता येईना. शेवटी पक्ष्याच्या
गोंधळा मुळे तो ससाणा उडून गेला.
उत्सुकतेपोटी अर्णव
आणि मी त्या जागेवर पोहचलो. आमचा अंदाज खरा ठरला. त्या ससाण्याने छोटा ससा पकडला
होता पण तो त्याला घेऊन जाता आला नाही. तो ससा तिथेच पडला होता. ते पाहून
अर्णवच्या डोळ्यात पाणी आले. "बाबा तो जिवंत आहे त्याला वाचवूया,
त्याला पाणी देऊया, त्याला घरी नेऊया, मी त्याला गवत देतो" अशी त्याची केविलवाणी धडपड सुरू होती.
मी त्याला समजावले त्या पक्ष्याने चोचीने त्याला इजा केली आहे,
ते पिल्लू छोटे आहे, घरी घेऊनही ते जगणार नाही. आपण त्याला फार काही मदत करू
शकणार नाही.
अर्णव मात्र ऐकायला तयार नव्हता,
शेवटी त्याचा केविलवाणा चेहरा,
त्याची संवेदनशीलता व त्याची निरागसता पाहून त्याला पाणी
पाजून,
हळद लावूया व पुन्हा त्याला त्या ठिकाणी सोडुया यावर या
माझ्या सल्ल्यावर तो जड मनाने तयार झाला.
आम्ही त्याला
थोडे पाणी पाजले, काही ठिकाणी रक्त येत होते तिथे हळद लावली. मात्र त्या सस्याला खूप इजा झाली
होती त्याची मान सरळ होत नव्हती. काही वेळ त्याने धडपड केली पण थोड्या वेळातच
त्याचा जीव गेला.
अर्णवच्या डोळ्यात
त्याला वाचवता आले नाही याचे दुःख व त्या ससाण्याविषयी प्रचंड राग होता. पण हाच
निसर्ग आहे व त्याचे नियम सर्वांना लागू असतात हे त्याला पटत नव्हते. अंधार झाला
तरी तो घरी यायला तयार नव्हता.
एखाद्याला
इतक्या सहज मदत करावी ही त्यांच्यातील भावना पाहून बाप म्हणून अभिमान वाटला.
आयुष्यात प्रत्येक प्रसंगी इतकं निरागस राहून इतरांना मदत करायला यायला हवे. अर्णव
ची इतकी निरागसता वाढत्या वयाबरोबर टिकून
रहावी हीच इच्छा....
( टीप
: छायाचित्र यासाठी की अर्णवच्या
डोळ्यात दिसणारी मदतीची तळमळ सुखावणारी
होती )
संदीप कोळी
sandip.koli35@gmail.com
Tuesday, 27 April 2021
Everything has to be done by me : सगळं ‘मी’ च करायला हवे
सगळं ‘मी’ च करायला हवे
एक दिवस उजाडतो. आपल्या समोर
कामाचा डोंगर अचानक उभा राहतो. हे काम करू, का ते काम करू का ते करू, सगळा गोंधळ
उडतो. क्रम ठरवायला गेलो तर सर्वच कामे
महत्वाची वाटू लागतात. मग कोणते काम प्राधान्याने करायचे व कोणते नंतर करायचे हेच
लवकर ठरत नाही.
मनाचा
गोंधळ उडतो. धावपळ व्हायला लागते. हे करू कि ते करू यात कोणतेच काम धड्से होत
नाही. प्रथम कोणते काम करायचे हे ठरवायला
व आपले काम तर ठरतच नाही व आपले काम न
ठरता आपला बराच वेळ फक्त ठरवण्यात जातोय हेच समजायला बराच वेळ जातो.
तसे
बघायला गेले तर हा सर्व पसारा व कामाचा डोंगर आपणच उभा केलेला असतो. फक्त
त्या-त्या वेळी आपल्या कामाचा योग्य पाठपुरावा करून काम पूर्ण न केल्यामुळे ती
कामे आपल्या पुढे ब्रह्म म्हणून अचानक उभी राहतात आणि मग आपल्याला त्याचा त्रास
होतो.
मुळातच प्रत्येक गोष्ट आपल्या साठीच आहे , प्रत्येक
वेळी ती आपणच करायला हवी व आपल्यालाच मिळायला पाहिजे. कदाचित या सर्वाचा एकत्रित
परिणामातून अनेक प्रश्न निर्माण होत असतील. बहुतेक वेळा आपल्या अतिमहत्वकांक्षेचा हा
त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो व आपल्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होतो.
आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला
हवी. निसर्गाचा एक अंतिम नियम आहे. आपण नव्हतो त्यावेळीही जगाच्या सर्व क्रिया
सुरळीत सुरु होत्या, सध्या आपण काहीही
केले नाही तरीहि हे सर्व सुरळीत असणार आहे व उद्या आपण नसल्यावरही हे सुरूच राहणार
आहे.
फक्त आपला एक मोठा गैरसमज आहे कि “सगळं
मी च करायला हवे.”
कदाचित हाच आपल्या समोरील
प्रश्न व हेच आपल्या प्रश्नाचे उत्तर असू शकेल!!!
संदिप कोळी
मन ही आवरायला घेऊया
वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...
-
वातावरणात बदलाचे वारे वाहू लागले आहे. आजूबाजूला उत्साहाचे उधाण आले आहे आणि मनामनात आनंदाच्या लहरी उमटत आहे. दिवाळी तोंडावर आली आह...
-
आपल्या लक्षातही येत नाही ...... आपल्या दररोज पाहण्यातील झाडांची शरद ऋतूत पानगळ होऊन वसंतात नवी पालवी येऊन ती झाडे पुन्हा...
-
नात्याची घट्ट गाठ दोन सामान्य शेतकरी. सख्खे शेजारी. आपल्या कामात प्रचंड प्रामाणिक उत्साही. दोघे एक दिवस ठरवतात की आपण आपल्या परस...

