इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होय .
इंदिरा गांधी अशा एक
महिला होत्या की ज्याचा केवळ भारतीय
राजकारणाच नव्हे तर जागतिक
राजकारणाच्या क्षितिजावर प्रभाव राहिला आहे.
श्रीमती
इंदिरा गांधींचा जन्म नेहरू घराण्यात
झाला. भारताचे
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल
यांच्या त्या कन्या होत्या. इंदिरा गांधींचा जन्म १९ नोव्हेंबर
१९१७
रोजी उत्तर प्रदेशाच्या इलाहाबादमध्ये संपन्न परिवारात
झाला. त्याचे नाव 'इंदिरा प्रियदर्शिनी' असे होते, तर घरी प्रेमाने त्यांना
‘इंदु’
असे म्हणत. त्यांच्या
वडिलांचे नाव जवाहरलाल नेहरू आणि आईचे नाव कमला
नेहरू होते. इंदिराजीचा
जन्म आर्थिक व बौद्धिकदृष्ट्या
संपन्न कुटुंबात झाला होता.
इंदिराजीच्या शालेय शिक्षणानंतर त्यांनी
रवींद्रनाथ टागोर
यांच्या शांतिनिकेतन मधील 'विश्व-भारती विद्यापीठ' मध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर 1937 मध्ये त्या
ऑक्सफर्डमध्ये शिक्षणासाठी गेल्या. लहानपणापासून इंदिरा गांधी यांना
पत्र, पत्रिका आणि पुस्तके वाचण्याचा खूप
छंद होता . यामुळे त्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर जगातील इतर माहिती प्राप्त झाली. यातून इंदिराजी अभिव्यक्तीच्या कलामध्ये निपुण झाल्या. त्यांची इंग्रजी
भाषेवर
खूप छान पकड होती.
1942 मध्ये इंदिरा गांधी यांचा
प्रेम विवाह फिरोज गांधीं
यांच्याशी झाला. लग्नानंतर
त्यांनी राजीव आणि संजय गांधी यांना जन्म दिला.
इंदिरा गांधी
यांना राजकीय विचारधारा व वातावरण कुटुंबातून वारसा म्हणून मिळाले होते. १९४१
मध्ये भारतात आल्यानंतर त्या भारताच्या स्वातंत्र लढ्यात सामील झाल्या. १९५९
मध्ये त्या कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या. प.
नेहरूंच्या निधनानंतर इंदिराजी
निवडणूक जिंकून सूचना व प्रसारण मंत्री झाल्या.
भारताचे
दुसरे पंतप्रधान श्री.लालबहादूर शास्त्री यांच्या आकस्मित निधनानंतर २४ जानेवारी
१९६६ रोजी इंदिरा गांधी भारताच्या तिसऱ्या व पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
त्यानंतर १९६७-१९७७ सलग तीन वेळा आणि पुन्हा चौथ्या वेळी १९८०-१९८४ त्यांनी
पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्वीकारली.
१६ वर्ष पंतप्रधान राहिलेल्या
इंदिरा गांधी यांच्या शासनकाळात अनेक चढ़- उतार आले. १९७५ मधील आणीबाणी आणि १९८४ मधील शीख दंगे यामुळे
इंदिराजींना खूप विरोध व आलोचना सहन करावी लागली. इंदिरा गांधी यांनी
१९७१ मध्ये जागतिक संघटने पुढे न झुकता पाकिस्तानचा पराभव
करत बांगलादेश ची निर्मिती केली. 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. भारताच्या एकतेसाठी आणि अखंडतेसाठी इंदिराजी शहीद झाल्या. इंदिरा
गांधी या त्यांच्यातील प्रतिभा आणि राजकीय दृढतेसाठी 'जागतिक राजकारणाच्या'
इतिहासामध्ये नेहमी नेहमी लक्षात ठेवल्या जातील.
-संदिप
कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment