२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन
विज्ञान हा आपल्या आयुष्याचा
अविभाज्य भाग आहे. २८ फेब्रुवारी हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय विज्ञान दिन
म्हणून साजरा करण्यात येतो. नोबेल पारितोषिक विजेत थोर भारतीय शास्त्रज्ञ सर
सी.व्ही.रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी आपले संशोधन सादर केले होते. सर
सी.व्ही.रमण यांच्या ‘रामन परिणाम’ या संशोधनास नोबेल पारितोषिक मिळाले होते
त्याची प्रेरणा सर्व भारतीय विद्यार्थ्यांना व लोकांना मिळावी व भारतात विज्ञानाचा
विकास व्हावा यासाठी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा
केला जातो.
विज्ञान आपल्या दैनदिन जीवनाची गरज
आहे. दिवसातील २४ तास आपल्याला विज्ञानाची गरज आहे. दिवसातील २४ तास आपण
विज्ञानावर अवलंबून आहोत. आजचे युग हे विज्ञानाचे युग आहे. आज सर्वत्र फक्त विज्ञानच वर्चस्व
गाजवत आहे. पेनपासून- लॅपटॉपपर्यंत, घड्याळापासून- फ्रीजपर्यत, सायकलपासून –
विमानापर्यंत सर्व काही विज्ञानाचा परिणाम
आहे. आज आपण विज्ञानावर शंभर टक्के अवलंबून आहोत.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मूळ उद्दीष्ट विद्यार्थ्यांना
विज्ञानाकडे आकर्षित करणे आणि प्रेरित करणे हे आहे. विद्यार्थ्याच्यामध्ये विज्ञान आणि
वैज्ञानिक कृतींबद्दल जागृत करणे हे आहे. विज्ञानाशिवाय
विकासाचा मार्ग वेगाने पुढे जाऊ शकत नाही.
विज्ञानामुळे गैरसमज
आणि अंधश्रद्धा नष्ट होतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रसिद्ध करण्याबरोबरच देशातील
नागरिकांना या क्षेत्रात संधी देऊन नवीन उंची गाठणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे.
देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचारांचा प्रसार आवश्यक आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनासारख्या घटना नक्कीच वैज्ञानिक
दृष्टीकोन पसरविण्यात उपयोगी ठरू शकतात. केवळ
विज्ञानाच्या माध्यमातूनच आपण समाजातील लोकांचे जीवनमान अधिकाधिक सुखी करू शकतो. समाजात
जागरूकता निर्माण व्हावी आणि विज्ञानाच्या फायद्यांविषयी वैज्ञानिक विचार निर्माण
व्हावे या उद्देशाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
या दिवशी राष्ट्रीय व इतर विज्ञान प्रयोगशाळा,
विज्ञान अकादमी, शाळा व महाविद्यालये व प्रशिक्षण संस्था अशा सर्व विज्ञान
संस्थांमध्ये विविध वैज्ञानिक उपक्रमांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. महत्वाच्या घटनांमध्ये भाषण, निबंध,
लेखन, विज्ञान प्रश्नमंजुषा
,
विज्ञान प्रदर्शन, चर्चासत्र आणि वैज्ञानिकांचे मार्गदर्शन यांचा समावेश आहे. विज्ञान क्षेत्रात विशेष योगदानासाठी राष्ट्रीय व इतर पुरस्कारही
जाहीर केले जातात. विज्ञानाची
लोकप्रियता वाढविण्यासाठी विशेष बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत.
मानवाची सुरुवात इतर
प्राण्याच्या बरोबरच झाली पण मानवाने आपली बुद्धी व विज्ञानाच्या जोरावर सर्वाना
मागे टाकून आपली प्रगती केली आहे. जीवनातील प्रत्येक अडचणीवर विज्ञानाने मात करून
स्वतःचे जीवन सुखकर बनवले आहे. विज्ञानामुळे आता अनेक गोष्टी सहज शक्य झाल्या
आहेत. अजूनही विज्ञानाची प्रगती सुरूच
आहे. विज्ञान हा आपल्या समाजाची कणा आहे.
२८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान
दिन हा फक्त एक दिवस साजरा करण्याचा दिवस नसून वर्षभर ३६५ दिवस साजरा करायला हवा.
आपल्या अंगी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारून समाजातील व आपल्यातील अंधश्रद्धा
कायमच्या संपवायला हव्यात. तेव्हाच आपला देश प्रगती करेल व जगातील एक प्रगत आणि
विज्ञाननिष्ठ देश बनेल.
संदिप कोळी
sandip.koli@gmail.com
No comments:
Post a Comment