स्वामी
विवेकानंद
“आपण जे विचार करता ते व्हाल. आपण स्वत: ला कमकुवत समजले तर कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण
सामर्थ्यवान व्हाल.”
ज्या काळात धर्म म्हणजे काय हे
सोप्या भाषेत सांगणारे कोणी नव्हते त्या काळात हिंदू धर्म व हिंदू धर्माची शिकवण
आपल्या ज्ञानाद्वारे सर्व जगाला करून देणारे, आपल्या तेजस्वी विचाराने अज्ञानाचा अंधकार
दूर करणारे, तरुणाईला प्रेरणादायी विचारांची नवसंजीवनी देणारे, भारतीय अध्यात्माची उंची
वाढवणारे, रामकृष्ण मिशन च्या माध्यमातून समाजात वैचारिक जागृती आणणारे थोर
समाजसेवक , तरुण संन्यासी व महान विचारवंत म्हणजेच स्वामी विवेकानंद होय.
स्वामी विवेकानंद यांचे पूर्ण
नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त होय. त्यांचा जन्म कलकत्त्यातील प्रसिद्ध वकील विश्वनाथ
दत्त यांच्या घरी 12 जानेवारी 1863 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. स्वामी
विवेकानंदांचे आजोबा दुर्गाचरण दत्त हे "संस्कृत" व "परीक्षण' भाषेचे एक विद्वान होते.
अशा एका संपन्न घरात स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला होता.
नरेंद्र हा बालवयात
स्पष्टवक्ता होता. शाळेतही तो फार खोड्या
काढत असे, पण पुढे त्याच्यात पूजाअर्चा, भक्तिभाव यांची आवड निर्माण झाली.
नरेंद्रला तीव्र बुद्धिमत्तेचे वरदान लाभले होते. नरेंद्रनाथ यांच्यावर
लहानपणापासूनच महाभारत, रामायण व भक्तिभावा चा
प्रभाव होता. स्वामी विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती आणि ते शाळेत सुद्धा
सर्वात हुशार विद्यार्थी होते.
फक्त अभ्यासातच नाही तर ते खेळण्यात हि तितकेच तरबेज होते. शाळेमध्ये प्रत्येक
गोष्टी मध्ये ते भाग घेत असत . नित्यनियमाने व्यायामशाळेत
जाऊन त्याने आपले शरीर सदृढ बनवले होते.
स्वामी
विवेकानंद यांना वाचनाची खूप आवड होती त्यांनी अनेक धार्मिक पुस्तकांचे ज्ञान
मिळवले होते. इतकेच नाही
तर त्यांनी भारतीय गायन सुद्धा शिकले होते. स्वामी विवेकानंदांनी १८८४ ला आपले
शिक्षण पूर्ण करून "आर्ट्स" ची डिग्री मिळवली होती. त्यानंतर त्यांनी संस्कृत
आणि बंगाली संस्कृतीचा अभ्यास केला होता.
नरेंद्र मोठे होत
असतानाच त्याच्या मनात देवाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले. खरोखरच देव आहे की
नाही?, देव असेल तर तो कोठे भेटेल? देव कसा असतो?अशा प्रश्नांनी ते बैचेन झाले
होते. नरेंद्र ज्याला त्याला हे प्रश्न विचारत असत. त्यादरम्यान त्यांची भेट स्वामी
रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली आणि तेच नरेंद्रांचे गुरु झाले. परमेश्वर सर्वत्र
आहे आणि तो मानवता ही आहे ही शिकवण परमहंस यांनी नरेंद्राला दिली. परमहंस यांच्या
शिकवणुकीतून हे सत्य नरेंद्राला प्रतीत झाले.
1893 मध्ये
नरेंद्र अमेरिकेतील सर्वधर्मीय परिषदेला उपस्थित राहिले. लोक त्यांना स्वामी
विवेकानंद म्हणून ओळखू लागले. त्या जागतिक परिषदेत विवेकानंदांनी भाषणाला सुरुवात
करताना सभ्य स्त्री पुरुष हो असे न संबोधता माझ्या बंधू-भगिनींनो असे संबोधून
उपस्थितांची मने जिंकली. त्या सभेत विवेकानंदांनी हिंदू धर्माचे महात्मा सर्वांना
पटवून दिले. आपले उर्वरित आयुष्य ही या महान कार्यासाठी त्यांनी वेचले.
अमेरिके वरून परतल्यानंतर
त्यांनी संपूर्ण भारत फिरण्याचा निर्णय घेतला आणि आपले विचार लोकांना सांगायला
सुरु केले. हिंदू धर्माचा प्रचार करण्यासाठी व भारतीय समाजात वैचारिक जागृती
करण्यासाठी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यांनी आपल्या ज्ञानाने लोकांना जागृत केले.
स्वामी विवेकानंदानी ४ जुलै १९०२
रोजी कलकत्त्याजवळील बेलूर मठात वयाच्या ३९ व्या वर्षी समाधी घेतली. स्वामी
विवेकानंद यांचे कन्याकुमारी येथे भव्य स्मारक बांधण्यात आले आहे.
स्वामी विवेकानंदानी आपल्या कार्याने व विचाराने सर्व भारतीयांसाठी सदैव प्रेरणा
दिली. त्यांनी युवकांना उठा, जागे व्हा आणि
उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका. हा संदेश दिला. त्यांचा १२ जानेवारी हा जन्म दिन ‘राष्ट्रीय
युवक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
-संदिप
कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment