26 जानेवारी प्रजासत्ताक दिन
भारत
हा जगातील एक सर्वात मोठी लोकशाही असणारा देश आहे. आपण देशात अनेक उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे करतो. प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे दोन मोठे राष्ट्रीय समारंभ
आपण साजरे करतो.
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीला साजरा केला जातो. संपूर्ण देशात
मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा
केला जातो. याच दिवसाला गणतंत्र दिवस म्हणून ही ओळखले जाते.
२६
जानेवारी १९५० ला भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले आणि संविधानाची अमलबजावणी प्रत्येक्ष रूपाने सुरु झाली. प्रजासत्ताक दिनाचा इतिहास १९२९
सालापासून सुरु होतो. लाहोरच्या
अधिवेशनात संपूर्ण
स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला. रावी
नदीच्या किनाऱ्यावर २६ जानेवारी रोजी
नेहरूंनी स्वातंत्र्याचा ध्वज फडकविला. देशाला उद्देशुन
संपूर्ण स्वातंत्र्य प्राप्त करण्याची घोषण केली. त्यादिवशी सर्व प्रतिनिधींनी भारतमातेला
गुलामगिरीच्या साखळ्यांतून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. अशा प्रकारे हा दिवस सर्व भारतीयांसाठी अविस्मरणीय बनला.
त्यानंतर दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस स्वातंत्र्याचा दिवस म्हणून साजरा होऊ लागला. यामुळे
स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व गती मिळाली. व
१५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर देशाच्या घटना निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली ती २६ नोव्हेबर १९४९ ला
पूर्ण झाली. पण २६ जानेवारी या
दिवसाचे महत्व कायम राहावे यासाठी संविधानाची अमलबजावणी २६ जानेवारी १९५० पासून
सुरु झाली व त्यानंतर भारत प्रजासत्ताक देश बनला. भारताला सार्वभौमत्व
मिळाले. आपण लोकशाही शासनपद्धतीचा स्वीकार केला. २६ जानेवारी हा राष्ट्रीय सणम्हणून साजरा होऊ लागला.
२६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी संपूर्ण देशात सार्वजनिक
सुट्टी असते. सर्व संस्था, खाजगी व सरकारी कार्यालये, शाळा, कॉलेज इत्यादी बंद असतात. २५ जानेवारीला संध्याकाळी
राष्ट्रपती संपूर्ण देशाला उद्देशून संदेश देतात.
२६ जानेवारीला पंतप्रधान हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना
श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ होतो. ध्वजारोहणा नंतर या समारंभाचा मुख्य कार्यक्रम दिल्ली
येथे होतो. या कार्यक्रमात भारताती सर्व घटकराज्ये भाग घेतात. भारताच्या सर्व
क्षेत्रातील वैभवाचे दर्शनघडविणारी भली मोठी मिरवणूक काढतात. त्यातून राष्ट्रीय ऐक्य, संस्कृती, इतिहास आणि समृद्धीचे दर्शन घडते. प्रादेशिक लोकनृत्ये सादर
केली जातात. नंतर सेनेच्या तिन्ही विभागांच्या तुकड्यांची परेड होते. त्यानंतर
भारतात तयार झालेल्या तोफा, रणगाडे, क्षेपणास्त्रांचे
प्रदर्शन होते. हजारो लोक हे सर्व पाहण्यासाठी आलेले असतात.
हा दिवस भारतात सर्वत्र साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात,
शहरांत आणि गावागावातून ‘प्रजासत्ताक दिन’
साजरा होतो. शाळांतून, सरकारी कार्यालयांतून व
अन्यत्रही सकाळी ध्वजवंदन व अन्य मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. ठिकठीकाणी प्रभातफेऱ्या
, भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शन यांचे आयोजन केले
जाते.
शाळांमध्ये
तोरणे-पताका लावली जातात. विद्यार्थी मोठ्या उत्साहाने भारत मातेचा जयघोष करीत
प्रभात फेरीत भाग घेतात. सर्वांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले जाते. शाळेतील, एन. सी. सी. व स्काउट चे विध्यार्थी सुंदर
संचलन करतात. विद्यार्थी आपापल्या आवडीची
राष्ट्रगीते गातात. भाषणे करतात. शाळेकडून गुणी विध्यार्थ्यांचे कौतुक होते व
त्यांना सम्मान पत्रे दिली जातात. शाळांतून मुलांना खाऊ वाटून आनंद साजरा केला
जातो.
या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ
उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. हा आपल्यासाठी प्रतीज्ञेचा
दिवस आहे. लोकशाहीच्या संवर्धनाचा दिवस आहे. प्रत्येक भारतीयाने देशहितकारक कार्य करून
त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र
प्रेम अधिक उसळून, उजळून
निघते. आपल्या राष्ट्रीय ऐक्य, भावनात्मकता, अखंडतेला बळ मिळते.
-संदिप कोळी
sandip.koli35@gmail.com
No comments:
Post a Comment