२७ फेब्रुवारी राजभाषा मराठी दिन
"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
"जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी"
या ओळींचा गोडवा जितका तितकाच आपल्या मातृभाषेचा गोडवा.....
ज्ञानोबांच्या शब्दात
"माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।"
अशी अमृताशी पैजा घेणारा गोडवा असणारी आपली, माझी मातृभाषा
मराठी.
२७ फेब्रुवारी ज्ञानपीठ विजेते लेखक विष्णू वामन शिरवाडकर
अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिन म्हणजेच मराठी राजभाषा दिवस.....
मराठी ही भारतातील एक महत्वाची भाषा आहे. संस्कृत ही मराठीची जननी आहे. मराठी
भाषेचा उदय संस्कृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला, असे बहुतांशी मानले जाते. मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. सातवाहन साम्राज्याने महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज च्या काळात ती आणखी समृद्ध
झाली नंतर त्यामध्ये आणखी भर पडत गेली.
मराठी ही भाषा देवनागरी लिपी वापरून लिहिली जाते.
मराठी ही भारतातील २२ अधिकृत
भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. भारतातील
मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९
कोटी च्या जवळपास आहे.
मराठी मातृभाषा
असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी
भाषा भारतातील प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.
मराठी भाषा
मुख्यत्वे भारतातील महाराष्ट्र राज्यात बोलली जाते. महाराष्ट्राबरोबर गोवा,
उत्तर कर्नाटक , गुजरात राज्याच्या काही भागात, हैदराबाद, मध्यप्रदेशातील इंदूर, ग्वाल्हेर, तामिळनाडू मधील तंजावर व दमण आणि दीव, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशांतील काही भागातही मराठी बोलली जाते. देशातील अनेक
राज्यात व जगातील अनेक देशात मराठी भाषिकांची वस्ती आहे. या ठिकाणी मराठी भाषा
बोलली व समजली जाते.
मराठी भाषेचे वय हे साधारणपणे १५००
वर्ष मानले जाते. या
काळात समाज जीवनातल्या बदलानुसार ही भाषा सतत बदलत राहिली.
तरीही सर्वसाधारणपणे मराठी भाषेत ठळक फरक आद्यकाळ, यादवकाळ,
बहामनी काळ,
छत्रपती शिवाजी
महाराजांच़ा काळ, पेशवे काळ,
इंग्रजी कालखंड,
स्वातंत्रोत्तर कालखंड या काळात झाला.
मराठी ही साहित्यिक दृष्ट्या एक समृद्ध भाषा
आहे. मराठी मध्ये प्राचीन काळापासून अनेक महान संत,
ऋषी,
साहित्यिक,
लेखक यांनी विपुल असा
साहित्य ठेवा निर्माण केला आहे. 'लीळाचरित्र'
हा महान ग्रंथ म्हाइंभटांनी लिहून मराठी भाषेचा पाया रोवला. मराठी भाषेत आजवर विविध विषयांवर विस्तृत लेखन प्रकाशीत
झाले असून , त्यातील अनेक साहित्य जागतिक साहित्यात महत्वाचे साहित्य
आहेत. मराठी भाषेत दरवर्षी हजारो नवीन पुस्तके प्रकाशित होतात.
याबरोबर शेकडो दिवाळी
अंक, अनेक नामांकित वृत्तपत्रे,
मासिके,
पाक्षिके, साप्ताहिके
प्रकाशित होत असतात. देशभरातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या
महाराष्ट्रात आहेत.
कथा, कादंबरी,
ललित लेख,
कविता,
समीक्षण,
प्रवास वर्णने,
नाटक,
एकांकिका,
विनोदी साहित्य,
चरित्र,
आत्मचरित्र,
विज्ञान कथा,
बालसाहित्य,
मुलाखती,
चारोळी, गझल, ओवी, अभंग, भजन, कीर्तन, पोवाडा, लावणी, भारूड, बखर, पोथी, आरती, लोकगीत, गोंधळ, उखाणे, वाक्प्रचार, म्हणी
यासारख्या अनेक साहित्य प्रकारांचे विपूल लेखन मराठी भाषेत झाले आहे.
अशा वैविध्यपूर्ण
साहित्याने मराठी भाषेची भरभराट करण्यामध्ये मराठी लेखकांचा खूप मोठा वाट आहे.
मराठी भाषेच्या कोकणी, अहिराणी, माणदेशी, पुणेरी, मालवणी, वऱ्हाडी, कोल्हापुरी,
तमिळनाडू राज्यातील तंजावर यासारख्या अनेक बोली भाषा आहेत. ज्या महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ही बोलल्या जातत.
भाषा ही संवादाचे एक माध्यम आहे. प्रत्येक भाषेची आपली वैशिष्ठे व साहित्यिक समृद्धता आहे.
मराठी ही त्यातीलच एक
प्रमुख भाषा आहे. मराठी भाषेच्या या दिनाच्या निमित्ताने चला मराठी भाषेचा
गोडवा टिकवूया व मराठी भाषा वाढवूया.
संदिप कोळी
sandip.koli@gmail.com
खूप छान. वास्तविकता mandlit
ReplyDelete